Election :अहमनदरच्या राजूरमध्ये विशेष मतदान कशासाठी, विहीर खोदण्यासाठी, निकाल कुणाच्या बाजूनं?
महाराष्ट्रात गेल्या महिन्यात नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी पार पडलीय. महापालिका निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील राजूर (Rajur) गावात विशेष निवडणूक पार पडलीय.
अहमदनगर : महाराष्ट्रात गेल्या महिन्यात नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी पार पडलीय. महापालिका निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील राजूर (Rajur) गावात विशेष निवडणूक पार पडलीय. ग्रामंपचायतीच्या ग्रामसभेत विशेष मतदान (Special Voting) दहा वर्षापूर्वी बुजवलेली विहीर खुली करण्यासाठी पार पडलंय. अहमदगर जिल्ह्यातील राजूर गावकऱ्यांमध्ये विहीर पुन्हा खोदण्यासंदर्भात मतांतरे होती. अखेर ग्रामंपचायंतीनं विशेष ग्रामसभा बोलावली. या विशेष ग्रामसभेत मतदान पार पडलं. विहीर खोदण्याच्या बाजूनं आणि विरोधात गावकऱ्यांनी मतदान केलं. अखेर, गावकऱ्यांनी विहीर खोदण्याच्या बाजूनं मतदान केलं. विशेष म्हणजे मतदानामध्ये महिला ग्रामस्थांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. विहीर खोदण्याच्या बाजूनं गावकऱ्यांचा कौल असल्यानं राजूर गावाच्या पाण्याचा प्रश्न सुटण्याच्या दिशेनं वाटचाल सुरु झालीय, असं मत ग्रामस्थांच्यावतीनं व्यक्त करण्यात आलंय.
विहीर खोदायची की नाही,मतदानातून निकाल
अहमदनगर जिल्ह्यातील राजूर गावात आज विहीरीसाठी विशेष मतदान घेण्यात आलय. गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर दहा वर्षापूर्वी बुजवण्यात आली होती. बुजवलेली विहीर पुन्हा खुली करावी किंवा न करावी याबद्दल मतमंतातरे असल्याने आज मतदान घेऊन याचा निकाल लावण्यात आलाय.
26 जानेवारीला ठराव आज मतदान
अकोले तालुक्यातील राजूर येथे महादेव मंदिर चौकातील विहीर 2011 साली तत्कालीन सरपंच आणि पदाधिकारी यांनी सर्वानुमते बुजविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र तब्बल 11 वर्षांनी बुजविलेली विहीर पुन्हा सुरू करावी असा विषय 26 जानेवारी 2022 ला झालेल्या ग्रामसभेत पुढे आला. सदर विषयावर मोठा गदारोळ झाल्यानंतर सर्वानुमते विशेष ग्रामसभा घेऊन मतदान घेण्याचे ठरविण्यात आले होते. त्यानुसार आज मंगळवारी ग्रामसभेत गुप्त मतदान घेण्यात आले.
गावकऱ्यांचा कौल विहीर खोदण्याच्या बाजूनं
काही कारणांमुळं बुजवण्यात आलेली विहीर पुन्हा खोदण्यासाठी मतदान घेण्यात आलं. गावकऱ्याचं विशेष मतदान आज झालं. आज मतदानासाठी महिला आणि गावातील मतदारांनी मतदानासाठी मोठी गर्दी केल्याच पहायला मिळाले.यात विहीर उकरण्यात यावी या बाजूने बहुमत मिळालंय.
इतर बातम्या :
संपामुळे झालेले नुकसान कामगारांकडून वसूल नाही करणार, महामंडळ काय म्हणालं?
VIDEO: नक्षलवाद्यांच्या धमक्या येतात, माझ्यावर परिणाम होत नाही, मी फक्त काम करत राहतो: एकनाथ शिंदे