Pankaja Munde | पंकजा ताई प्रचंड आर्थिक विवंचनेत, कार्यकर्ते लाखोंच्या मदतीला तयार, फेसबुक पोस्ट व्हायरल

भाजप नेत्या पंकजा मुंडे सध्या प्रचंड आर्थिक विवंचनेतून जात आहेत. त्यांची व्यथा पाहून कार्यकर्ते देखील भावनिक झाले आहेत. विशेष म्हणजे कार्यकर्ते पंकजा मुंडे यांना मदत करणार आहेत. याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.

Pankaja Munde | पंकजा ताई प्रचंड आर्थिक विवंचनेत, कार्यकर्ते लाखोंच्या मदतीला तयार, फेसबुक पोस्ट व्हायरल
Follow us
| Updated on: Sep 30, 2023 | 8:03 PM

कुणाल जायकर, Tv9 मराठी, अहमदनगर | 30 सप्टेंबर 2023 : भाजप नेत्या पंकजा मुंडे सध्या प्रचंड आर्थिक अडचणीतून जात आहेत. त्यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्यावर जीएसटी विभागाने नोटीस पाठवत कारवाई केल्याची माहिती समोर आलीय. याशिवाय त्यांच्या साखर कारखान्यावर यूनियन बँकेने याआधीच 1200 कोटींचं कर्ज थकवल्याप्रकरणी जप्तीची कारवाई केलीय. त्यानंतर आता जीएसटी विभागाने नोटीस पाठवत 19 कोटींचा कर भरला नसल्याचा ठपका ठेवलाय. पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे आपल्या कारखान्याला मदत व्हावी यासाठी विनंती केली होती. पण त्यांना कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही. त्यामुळे पंकजा यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर पंकजा यांच्यासाठी त्यांचे समर्थक एकवटत असल्याची माहिती समोर येत आहे.

पंकजा मुंडे यांच्या बीड येथील परळी वैद्यनाथ साखर कारखान्यावर नुकतीच जीएसटी विभागाकडून कारवाई करण्यात आलीय. या कारखान्या संदर्भात भावनिक नातं असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलं होतं. यावरून आता अहमदनगरला पाथर्डी येथील पंकजा समर्थक अमोल गर्जे यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट केली आहे. “मुंडे साहेबांच्या वैद्यनाथ साखर कारखान्याला ताई साहेबांचा आदेश आल्यास आपण किती मदत करू शकतो” अशा आशयाची पोस्ट अमोल गर्जे यांनी केलीय.

पंकजांच्या समर्थकांची लाखोंची मदत करण्याची तयारी

अमोल गर्जे यांच्या पोस्टला पंकजा समर्थकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. जर ताईंचा आदेश आला तर लाखो रुपयांपर्यंत मदत करू अशा कमेंट्स पंकजा समर्थकांनी केल्या आहे. तसेच अनेकांनी कमेंट्समध्ये आपण किती मदत करू शकतो, याची आकडेवारी देखील दिली आहे. सध्या ही पोस्ट बीड आणि अहमदनगर मध्ये चांगलीच व्हायरल होत आहे.

अमोल गर्जे यांच्या पोस्टवर पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी मोठमोठ्या आकडी रकमेची मदत जाहीर केलीय. पंकजा मुंडे यांनी हाक दिली तर काही समर्थकांनी 1 लाख रुपयांची मदत करु, असं सांगितलं आहे. “प्रत्येकाने मदत केली जर 100 कोटी रुपये तरी जमतील’, असं एका समर्थकाने म्हटलं आहे. तर “19 कोटी चिल्लर आहे. 119 कोटी रुपये जमा होतील. फक्त निर्णय घेतला पाहिजे. आदेश दिला पाहिजे”, असं पंकजा यांच्या एका समर्थकाने म्हटलं आहे.

“काही जणांनी तर आपण पंकजा यांच्या आदेशाची वाट का पाहतोय, प्रत्येक गावातून 1 कोटी तरी जमा होतील”, असं एका समर्थकाने म्हटलं आहे. दरम्यान, अनेक समर्थकांनी 1 हजार पासून 11 हजार पर्यंतची मदत करायला आपण तयार असल्याचं म्हटलं आहे. विशेष म्हणजे एका समर्थकाने आपल्याकडून 5 लाखांची तरी मदत होईल, असं म्हटलं आहे.

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.