Gopichand Padalkar | ‘गोपीचंद पडळकर यांनी स्वत:ला आवर घालावा’, महसूल मंत्र्यांचा सल्ला

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अतिशय खोचक शब्दांमध्ये टीका केली. त्यांच्या या टीकेचे पडसाद राज्यभरातील अनेक भागांमध्ये बघायला मिळत आहेत. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर महसूल मंत्र्यांनी पडळकरांना सल्ला दिलाय.

Gopichand Padalkar | 'गोपीचंद पडळकर यांनी स्वत:ला आवर घालावा', महसूल मंत्र्यांचा सल्ला
Follow us
| Updated on: Sep 19, 2023 | 3:05 PM

अहमदनगर | 19 सप्टेंबर 2023 : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर खोचक टीका केली. अजित पवार हे सत्तेत सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे राज्य सरकारमधील ते महत्त्वाचे मंत्री आहेत. असं असताना सरकारमधीलच भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांच्यावर टीका केल्याने सत्ताधारी पक्षांमध्ये सारं काही आलबेल आहे ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय. असं असताना भाजप नेते आणि राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पडळकर यांना स्वत:ला आवर घालावा, असा सल्ला दिला आहे.

“गोपीचंद पडळकर आणि अजित पवार यांच्यातील राजकीय संघर्ष अनेक दिवसांपासून आहे. ते एकमेकांविरोधात निवडणुकीत उभे होते. आपण आता एकत्र असल्याने त्यांनी विधान करताना स्वतःला आवर घालावा. सरकारच्या स्थैर्यासाठी आपसातले मतभेद बाजूला ठेवावे”, असा सल्ला विखे पाटील यांनी दिला.

आनंदाचा शिधा किटमध्ये त्रुटी

दरम्यान, आनंदाचा शिधा किटमध्ये त्रुटी असल्याचे महसूलमंत्र्यांनी मान्य केलंय. “आनंदाच्या शिध्याबाबत सोलापूरसह राज्यात गंभीर तक्रारी आल्या आहेत. पाल्म ऑईल वापरू नये. मात्र तरी ते दिले जाते. पाल्म ऑईलचा दर्जा अतिशय खालावलेला आहे. शिधा किटचे वजन कमी भरतंय. याप्रकरणी चौकशी सुरू असून दोषी एजन्सीवर कारवाई करणार”, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

‘सामना’ अग्रलेखावर टीका

राधाकृष्ण विखे पाटील यांनी ‘सामना’च्या अग्रलेखावरही टीका केली. “ज्यांना पक्ष सांभाळता आला नाही त्यांनी आगोदर स्वतःची विश्वासार्हता निर्माण करावी. एखाद्या वर्तमान पत्रातून टीका म्हणजे जनमत नाही. सामनातून पूर्वग्रह दूषित लिखाण होते. जनतेचा विश्वास गमावलेल्या लोकांच्या टीकेने काहीही परिणाम होणार नाही. लोकशाही आणि सरकार अधिक मजबूत होईल”, असा दावा राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.

विखे पाटील आमदार अपात्र सुनावणीवर म्हणाले…

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बाजू खरी आहे. सत्याचा नेहमीच विजय होतो. आम्हाला विजयाची खात्री आहे. लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचाच विजय होणार”, असं विखे पाटील म्हणाले.

पाथरी विकासनिधीवर काय म्हणाले?

“पाथरीला साईबाबांची जन्मभूमी म्हणून विकास निधी दिला नाही. मागच्या वेळी वाद उपस्थित झाला तेव्हा शिर्डीकरांनी सरकारला निर्णय बदलण्यास भाग पाडले. साईबाबांच्या जन्मभूमीबद्दल कोणतेही पुरावे नाहीत. जन्मभूमीचा वाद होऊ नये. साईबाबा शिर्डीत प्रकट झाल्याचा इतिहास आहे”, असं स्पष्टीकरण विखे पाटील यांनी दिलं.

“पाथरीला साईबाबांची जन्मभूमी म्हणून निधी देण्याला विरोध आहे. पाथरी साईबाबांची जन्मभूमी नाहीच. कुणीतरी दावा केला म्हणून मान्य करायचे का? निधी नेमका कशासाठी दिला याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार”, अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.