Dhangar Reservation | गिरीश महाजन यांची शिष्टाई यशस्वी’, धनगर समाजाचं 21 दिवसांनंतर उपोषण मागे

धनगर समाजाचं गेल्या 21 दिवसांपासून अहमदनगरच्या चौंडी येथे सुरु असलेलं उपोषण अखेर मागे घेण्यात आलं आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी आज उपोषणकर्त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी उपोषणकर्त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली.

Dhangar Reservation | गिरीश महाजन यांची शिष्टाई यशस्वी', धनगर समाजाचं 21 दिवसांनंतर उपोषण मागे
Follow us
| Updated on: Sep 26, 2023 | 5:34 PM

अहमदनगर | 26 सप्टेंबर 2023 : अहमदनगरच्या चौंडी येथे गेल्या 21 दिवसांपासून धनगर समाजाचं सुरु असलेलं उपोषण आज अखेर मागे घेण्यात आलं आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं, अशी उपोषणकर्ते सुरेश बंडगर आणि अण्णासाहेब रुपनवर यांची मागणी आहे. याच मागणीसाठी गेल्या 21 दिवसांपासून त्यांचं उपोषण सुरु होतं. या दरम्यान, सरकारकडून अनेकदा चर्चेचे प्रयत्न करण्यात आले. पण या चर्चांमधून तोडगा निघत नव्हता. उपोषणकर्त्यांची या काळात प्रकृती देखील ढासळली. त्यांनी उपचार घेण्यासही नकार दिला होता. अखेर मंत्री गिरीश महाजन यांनी याप्रकरणी दुसऱ्यांदा चौंडी येथे जावून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. त्यांचा हा प्रयत्न यशस्वी ठरला आहे.

गिरीश महाजन आज चौंडीत दाखल झाले. त्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करुन उपोषणकर्ते आणि मुख्यमंत्री यांच्यात बोलणं घडवून आणलं. मुख्यमंत्र्यांनी उपोषणकर्त्यांची समजूत काढली. यावेळी उपोषणकर्त्यांनी लेखी आश्वासन मागितलं. सरकार लेखी आश्वासन देण्यास तयार झालं. त्यामुळे उपोषणकर्त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलं, अशी माहिती समोर आलीय.

’50 दिवसांत कारवाई करणार’

“धनगर समाजाचे प्रतिनिधी आणि सरकार यांच्यात 21 सप्टेंबरला सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली होती. राज्य सरकारने एकमताने त्यांना पाठिंबा दिला होता. तुमची मागणी रास्त आहे. राज्य सरकारचा निश्चितच पाठिंबा आहे. काही तांत्रिक अडचणी आहेत. काही गोष्टी न्यायप्रविष्ट आहेत. त्या अडचणी सोडवण्याच्या दृष्टीने सरकार गंभीर आणि कटिबद्ध आहे”, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली.

“या आंदोलनादरम्यान जे गुन्हे दाखल झाले आहेत ते मागे घ्यावेत, अशी मागणी आंदोलकांची होती. त्यांची मागणी मान्य करण्यात आलीय. आवश्यकता भागल्यास धनगर समाजाच्या आरक्षणासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली जाईल, असंही सांगितलं होतं. शासन आपली कारवाई पूर्ण करत आहे”, असं गिरीश महाजन म्हणाले.

“50 दिवसांच्या आत ही सर्व कारवाई पूर्ण करावी, अशी उपोषणकर्त्यांची मागणी आहे. ती मागणी मान्य केलीय. धनगर समाजाला लागू करण्यात आलेल्या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणाने लागू करण्यात आल्या आहेत”, अशी माहिती गिरीश महाजन यांनी दिली.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.