Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BIG BREAKING | ‘अहमदनगरचं नाव आता….’, देवेंद्र फडणवीस यांची सर्वात मोठी घोषणा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सर्वात मोठी घोषणा केली आहे. अहमदनगर जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर व्हावं, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे. विशेष म्हणजे हिच मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आज मान्य केली आहे.

BIG BREAKING | 'अहमदनगरचं नाव आता....', देवेंद्र फडणवीस यांची सर्वात मोठी घोषणा
देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: May 31, 2023 | 5:08 PM

मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंतीनिमित्त अहमदनगरच्या चौंडी येथे भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार गोपीचंद पडळकर, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार राम शिंदे असे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. या कार्यक्रमात भाषण करताना राम शिंदे यांनी अहमदनगरचं नाव अहिल्यानगर करण्याची मागणी केली. गोपीचंद पडळकर यांनीदेखील याबाबत मागणी केली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात अहमदनगरचं नाव अहिल्यानगर होणार, अशी मोठी घोषणा केली. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील याबाबत घोषणा केली. तसेच आपल्या सरकारच्या कार्यकाळात अहिल्यानगर नाव होणं हे आमचं भाग्य आहे, असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

“राजमाता अहिल्यादेवी होळकर नसत्या तर काशी राहिली नसती. त्या नसत्या तर शिवाची मंदिरं आपल्याला दिसली नसती. त्या नसत्या तर दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत आमचा धर्म आज जीवंत आहे, तो धर्म आज जीवंत नसता. अशा प्रकारचं कार्य या राजमातेने करुन दाखवलं. त्यामुळे जी मागणी होतेय की, या जिल्ह्याला अहिल्यानगर नाव दिलं पाहिजे, मी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत विनंती करणार आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

‘अहिल्यानगर होणारच’

“आपलं सरकार हे हिंदुत्ववादी सरकार आहे. आपण छत्रपती शिवरायांचं नाव सांगणारे लोकं आहोत. आपण तुमच्याच नेतृत्वात संभाजीनगर तयार केलंय, आपण धाराशिव तयार केलंय. आता तुमच्याच नेतृत्वात मुख्यमंत्री महोदय अहिल्यानगर झालं पाहिजे. मला विश्वास आहे, छत्रपतींचा मावळा मुख्यमंत्री आहे. तर अहिल्यानगर होणारच. तुमच्या मनात शंका ठेवण्याचं कारण नाहीय”, असं मोठं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं. देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणानंतर एकनाथ शिंदे यांचं भाषण सुरु झालं. यावेळी त्यांनी अहमदनगरचं नाव अहिल्यानगर होणारच, अशी घोषणा केली. त्यामुळे टाळ्यांचा एकच गडगडाट सुरु झाला.

गोपीचंद पडळकर यांच्याकडून आणखी एक मोठी घोषणा

या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर गोपीचंद पडळकर यांनी आणखी एक मोठी घोषणा केली. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी आज अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिनाचं औचित्य साधत बारामती शासकीय मेडिकल कॉलेजचे नामांतर अहिल्याबाई होळकर मेडिकल कॉलेज बारामती करण्याचा निर्णय घेतला आहे. तसा जीआर नुकताच काढण्यात आलाय. याचबाबतची माहिती गोपीचंद पडळकर यांनी कार्यक्रमात केली.

'औरंगजेब आणि फडणवीसांचा कारभार एकसारखाच', काँग्रेसच्या नेत्याचं क्तव्य
'औरंगजेब आणि फडणवीसांचा कारभार एकसारखाच', काँग्रेसच्या नेत्याचं क्तव्य.
सुरेश धस घेणार खोक्या भोसलेच्या कुटुंबाची भेट
सुरेश धस घेणार खोक्या भोसलेच्या कुटुंबाची भेट.
शिक्षकाने FB पोस्ट लिहिली अन् संपवलं आयुष्य, कारण ऐकून बसेल धक्का
शिक्षकाने FB पोस्ट लिहिली अन् संपवलं आयुष्य, कारण ऐकून बसेल धक्का.
निवडणूक हरलो, मंत्रिपद गेलं तरी चालेल, पण. ; गडकरींचा जातीयवादावर टोला
निवडणूक हरलो, मंत्रिपद गेलं तरी चालेल, पण. ; गडकरींचा जातीयवादावर टोला.
राऊतांकडून उदय सामंतांचं तोंडभरून कौतुक, 'त्यांचं अभिनंदन, कारण..'
राऊतांकडून उदय सामंतांचं तोंडभरून कौतुक, 'त्यांचं अभिनंदन, कारण..'.
बीडचा बिहार झालाय का? संतोष देशमुख हत्येची पुनरावृत्ती
बीडचा बिहार झालाय का? संतोष देशमुख हत्येची पुनरावृत्ती.
तुमच्या कारला फास्टटॅग आहे? असेल तर हा व्हिडीओ बघा, कारण 1 एप्रिलपासून
तुमच्या कारला फास्टटॅग आहे? असेल तर हा व्हिडीओ बघा, कारण 1 एप्रिलपासून.
'बीडमध्ये चाललंय काय? सरकार काय करतंय?' दमानियांच्या डोळ्यात अश्रू अन्
'बीडमध्ये चाललंय काय? सरकार काय करतंय?' दमानियांच्या डोळ्यात अश्रू अन्.
लोकलने आज प्रवास करताय? मध्य रेल्वेच्या मेनलाईनवर असा असणार मेगाब्लॉक
लोकलने आज प्रवास करताय? मध्य रेल्वेच्या मेनलाईनवर असा असणार मेगाब्लॉक.
देशात तणाव पसरवणंच त्यांच काम; संजय राऊतांचा हल्लाबोल
देशात तणाव पसरवणंच त्यांच काम; संजय राऊतांचा हल्लाबोल.