कोल्हापूरकरांनो, आम्हाला हौस नाही, थोडं सोसा, अजित पवारांनी दरडावलं

कोल्हापुरात पॉझिटिव्हिटी रेट सर्वाधिक आहे. राज्यात सर्वात जास्त रुग्णवाढ कोल्हापुरात होत आहे. त्यामुळे कोल्हापुरात निर्बंध कमी करण्याचा अजिबात विचार नाही, उलट ते अधिक कडक केले जातील, असं अजित पवार म्हणाले.

कोल्हापूरकरांनो, आम्हाला हौस नाही, थोडं सोसा, अजित पवारांनी दरडावलं
उपमुख्यमंत्री अजित पवार
Follow us
| Updated on: Jun 14, 2021 | 12:59 PM

कोल्हापूर : “कोल्हापुरात पॉझिटिव्हिटी रेट सर्वाधिक आहे. राज्यात सर्वात जास्त रुग्णवाढ कोल्हापुरात होत आहे. त्यामुळे कोल्हापुरात निर्बंध कमी करण्याचा अजिबात विचार नाही, उलट ते अधिक कडक केले जातील. आम्हाला निर्बंध लादण्यात हौस नाही, थोडं सोसा, कोल्हापुरात निर्बंध अधिक कडक करणार. बऱ्याच लोकांच्या तोंडावर मास्क नाही, रुमाल लावतात, पोलीस आले की रुमाल वर करतात. असं करु नका, तुम्हाला कोरोना झाला की बाकीच्या निष्पाप लोकांना त्याचा फटका बसतो. निर्बंध कडक अंमलबजावणी व्हायला हवी”, असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ठणकावून सांगितलं. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोल्हापुरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन अजित पवारांनी माहिती दिली. (Ajit Pawar and Rajesh Tope visits Kolhapur, reviewed covid19 situation in city highest positivity rate in Maharashtra)

कोल्हापुरातील 12 जिल्ह्यात जिथे लसीकरण झालंय, तिथे पॉझिटिव्हिटी रेट थोडा कमी आहे. त्यामुळे लसीकरणावर भर असेल. जशी लस उपलब्ध होईल, तशी ती उपलब्ध करुन दिली जाईल, असं अजित पवार यांनी सांगितलं.

टेस्टिंग वाढवा

कोल्हापूरमधील कोरोना संसर्गाची काय कारणं आहेत याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.  गृह विलगीकरण बंद करून संस्थात्मक विलगीकरणावर भर देण्याची गरज आहे. तिसऱ्या लाटेची तयारी केली आहे. टेस्टिंगचं प्रमाण वाढवलं पाहिजे, टेस्टिंग वाढवल्यावर रुग्ण संख्या वाढलेली दिसेल, पण हरकत नाही, मात्र त्यामुळे ट्रेसिंग होऊन उपचार करणं सोपं होईल, असं अजित पवार म्हणाले.

खाजगी हॉस्पिटल्सनी चुकीची बिलं लावू नयेत. आम्हाला कोणाला त्रास द्यायचा नाही. पण बिलांवरुन तफावत नको, असं त्यांनी सांगितलं.

अधिवेशनात पुरवण्या मागण्या मंजूर करु

आरोग्य विभाग,ग्रामविकास विभागाकडे स्टाफ कमी आहे. येणाऱ्या कॅबिनेटमध्ये भरती बाबत आढावा घेऊ, असं अजित पवार म्हणाले.   दिव्यांग व्यक्तींना लसीकरण द्यायला सांगितलं आहे. दुर्गम भागातील रुग्णवाहिकांचा प्रश्न इकडे आहे त्यांना माय लॅब रुग्णवाहिका उपलब्ध होईल. 5 जुलैला पावसाळी आधिवेशन सुरू होईल. त्यात काही पुरवणी मागण्या मंजूर केल्या जातील, असं अजित पवारांनी नमूद केलं.

सध्या केंद्राकडून उपलब्ध होईल इतकीच लस दिली जातेय. काही दिवसात पुरशा लसी मिळतील. जिथे रुग्ण आहेत त्या गावात एकच वेळी टेस्टिंग करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असं अजित पवार म्हणाले.

तर कठोर कारवाई

यंत्रणा त्याच्या पातळीवर काम करत आहेत. त्यांना नाउमेद करून चालणार नाही. फरक नाही पडला तर जबाबदारी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी लागेल, असं अजित पवार म्हणाले.

15 जूननंतर इंजेक्शन वाढतील अशी आशा

जिथं रुग्ण संख्या अधिक आहे तिथे जास्त लस देण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करून निर्णय घेऊ. म्युकरमायकोसिसमध्ये मृतांची आकडेवारी वाढतेय ही वस्तूस्थिती आहे. यासाठीच इंजेक्शन केंद्राच्या ताब्यात आहेत. रुग्णाच्या प्रमाणात इंजेक्शन मिळावी ही अपेक्षा आहे. कारखान्यांना प्रोत्साहन देण्याचं काम केंद्र सरकार करतंय. 15 जूननंतर इंजेक्शन मोठ्या प्रमाणात येतील अशी अपेक्षा आहे, असं अजित पवारांनी सांगितलं.

चंद्रकांत पाटलांवर टीकास्त्र

चंद्रकांतदादा दुर्दैवाने मंत्रिमंडळात नाहीत, त्यामुळे त्यांना आकडेवारी वस्तूस्थिती माहीत नाही. विनाशकाले विपरीत बुद्धी अशी चंद्रकांतदादांची अवस्था आहे, असं टीकास्त्र अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांवर सोडलं.

चंद्रकांतदादांना जीएसटीची खरी आकडेवारी माहीत नाही. दुर्देवाने ते मंत्रिमंडळात नाहीत. त्यामुळे त्यांना आकडेवारीची वस्तुस्थिती माहीत नाही. केंद्राकडून महाराष्ट्राला जीएसटीचे 24 हजार कोटी येणे बाकी आहे. आम्ही सत्तेत आहोत. त्यामुळे आमच्याकडे ऑफिशियल आकडे आहेत. ते आकडे आम्हाला माहीत आहे. आम्ही पंतप्रधानांना भेटलो तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या सहीचं मागण्यांचं पत्रंच त्यांना दिलं आहे. त्यातही हा आकडा दिला आहे. काही लोकांना काही माहीत नसतं. काहीही बोलायची सवय असते. आपल्याकडे विनाशकाले विपरीत बुद्धी अशी एक म्हण आहे. काही लोकांची अवस्था अशीच झाली आहे, असा टोला पवार यांनी चंद्रकांतदादांना लगावला.

नाना पटोलेंना टोला

चहाच्या निमिताने शाहू महाराजांना भेटलो, वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली. निवडणुका स्वबळावर की कोणासोबत जायचं हे पक्षप्रमुख ठरवत असतात. काँग्रेसचा निर्णय सोनिया गांधी, राष्ट्रवादीचा निर्णय शरद पवार तसं शिवसेनेचा निर्णय उद्धव ठाकरे घेतील, असं म्हणत अजित पवारांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना टोला लगावला.

VIDEO अजित पवार यांची कोल्हापूरमधील पत्रकार परिषद

संबंधित बातम्या 

मोठी बातमी: कोल्हापुरात अजित पवार आणि श्रीमंत शाहू छत्रपतींची भेट; मालोजीराजेही उपस्थित

(Ajit Pawar and Rajesh Tope visits Kolhapur, reviewed covid19 situation in city highest positivity rate in Maharashtra)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.