सांगली: उपमुख्यमंत्री अजित पवार भिलवडी येथे दाखल झाले. भिलवडी येथील निवारा केंद्रामध्ये येऊन त्यांनी पूरग्रस्तांची विचारपूस करत त्यांचे अश्रू पुसले. तुम्हाला जेवण मिळते का? किती वर्षानंतर तुमच्या भागात पाणी भरलं? अशी ज्येष्ठांकडे विचारपूस करताना शाळेला जाता का?, अशी चौकशीही अजितदादांनी लहानग्यांची केली. (ajit pawar reached at bhilawadi relief center in sangli)
अजित पवार आज सकाळी 11च्या सुमारास भिलवडी येथे दाखल झाले. भिलवडीत प्रचंड पूर होता. त्यामुळे या भागातील नागरिकांना निवारा केंद्रात ठेवण्यात आलं आहे. अजितदादांनी थेट या निवारा केंद्रातच जाऊन तिथल्या व्यवस्थेची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी निवारा केंद्रातील ज्येष्ठ नागरिकांची विचारपूस केली. तुम्ही जिथे राहता तिथे महापुराचं पाणी नेहमी येतं का? पहिल्यांदाच पाणी आलं का? पाणी आलं तर किती वर्षानंतर आलं? असे प्रश्न त्यांनी निवारा केंद्रातील लोकांना केले. तसेच तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला सर्व मदत देऊ, असं आश्वासनही त्यांनी दिली. निवारा केंद्रात तुम्हाला जेवण मिळतं का? केंद्रातील व्यवस्था चांगली आहे का? असे प्रश्नही त्यांनी विचारले. तसेच लहान मुलांना जवळ बोलावून तुम्ही शाळेत जाता का? अशी चौकशीही त्यांनी केली.
पाऊस होता त्यामुळे मी बायरोड सांगलीला आलो. सांगलीची पाहणी आणि बैठक करून साताऱ्याला जाणार. साताऱ्याची पाहणी आणि बैठक करून पुण्याला जाणार. पण तोपर्यंत हेलिकॉप्टर मिळालं आणि प्रशासनाने परवानगी दिली तर कोल्हापूरलाही चक्कर मारेल. कारण कोल्हापूरचा रस्ता अजूनही बंद आहे. पुलावरून पाणी ओसरलं आणि जाण्यासाठी मार्ग मिळाला तर जाईन. मी सकाळीच कोल्हापूरला जाणार होतो, असं अजित पवार म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ते सांगलीत अनेक ठिकाणी मोटारीने प्रवास करून पाहणी करणार आहेत. पलूस येथे पाहणी केल्यानंतर सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. त्यानंतर ते साताऱ्याच्या दिशेने जाणार आहेत. (ajit pawar reached at bhilawadi relief center in sangli)
VIDEO | 100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 26 July 2021 https://t.co/gFLxbyVNMB #MorningBulletin | #MorningHeadlines | #TV9Marathi | #BreakingNews | #LatestUpdates
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 26, 2021
संबंधित बातम्या:
खराब हवामानाचा फटका, अजित पवार यांचा कोल्हापूर दौरा रद्द
भाजप नेत्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधलीय, त्यांना काहीच दिसत नाही; शंभुराज देसाई यांचा हल्ला
Maharashtra Rain LIVE | सातारा जिल्ह्यात पावसाची उघडझाप, जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण
(ajit pawar reached at bhilawadi relief center in sangli)