कोंबड्याना मांजर करून कोकणाचे प्रश्न सुटणार आहेत का?; अजित पवारांनी नितेश राणेंना फटकारले
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि भाजप नेते नितेश राणे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून ट्विटर वॉर सुरू आहे. प्राण्याची चित्रं ट्विटरवर पोस्ट करून दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर हल्ला चढवला आहे.
रत्नागिरी: राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि भाजप नेते नितेश राणे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून ट्विटर वॉर सुरू आहे. प्राण्याची चित्रं ट्विटरवर पोस्ट करून दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर हल्ला चढवला आहे. या वादात आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उडी घेतली आहे. कोंबड्यांना मांजर करून कोकणाचे प्रश्न सुटणार आहेत का?, असा सवाल करत अजित पवार यांनी नितेश राणे यांना फटकारले आहे.
अजित पवार आज रत्नागिरीत आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना राणे-मलिक वादावरही छेडण्यात आलं असता अजित पवार यांनी आपल्या स्टाईलने नितेश राणेंना फटकार लगावली. कोंबड्यांना मांजर केलं जात असल्याचं मी टीव्हीवर पाहत आहे. अशाने कोकणाचे प्रश्न सुटणार आहेत का? कोकणाचा विकास होणार आहे का? असा सवाल पवार यांनी केला.
हल्लेखोरांवर कारवाई करू
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्या हत्येचा कट केला गेल्याचा दावा केला आहे. त्यावरही अजित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. कायदा सुव्यवस्था राखणे हे आमचं काम आहे. मुंबईत गेल्यावर पोलीस आयुक्त आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी मी या विषयावर बोलून माहिती घेईल. कोणत्याही व्यक्तीवर हल्ले न होणं ही आमची जबाबदारी आहे. हल्ले करणं कधीही चुकीचं आहे. पण याबाबतची सर्व माहिती घेऊन बोलतो. हल्लेखोर कोणत्याही पक्षाचा असो, अशा प्रकारचे हल्लेखोर कोणत्याही पक्षाचे नसतात ही विकृती आहे. जे कोणी असेल त्यांच्यावर कारवाई करू, असं पवार म्हणाले.
पाटलांना विचारून निर्णय घेऊ
शिवसेनेचे जळगावच्या मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यातही आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. पाटील यांनी खडसेंवर गंभीर आरोप केले आहेत. त्यावरही अजितदादांनी भाष्य केलं. त्या आरोपात तथ्य आहे की नाही हे पोलीस खाते तपासेल प्रत्येक नागरीक आणि आमदारांना संरक्षण देणं हे पोलिसांचं काम आहे. ते आपलं काम करतील. काय नक्की झालं ते उद्या सभागृहात आल्यावर पाटलांना विचारेन. त्यांचं म्हणणं ऐकून पुढील निर्णय घेऊ, असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, यावेळी त्यांनी केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्यावरही टीका केली. बँक ही त्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची आर्थिक नाडी म्हणून ओळखली जाते. खरे तर इथे पीक कर्ज कमी दिलं जातं. मात्र, आमच्याकडं हजारो कोटी दिलं जात, असा टोला त्यांनी राणेंना लगावला. पूर्वी सतीश सावंत यांच्या मागे असणारी मंडळी काय काय काम सांगायची. तसं नसतं, बँक ही बँक असते, असे म्हणत त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना टोला हाणला. शिवाय फार विचारपूर्वक मतदान करा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
संबंधित बातम्या:
Salman Khan : सलमान खानला सापानं केला दंश; पनवेलच्या फार्महाऊसमधली घटना
मांडवलीसाठी नाशिकमध्ये उद्योजकाला मागितली 2 कोटींची खंडणी; भूमाफियाची तुरुंगातून उठाठेव