दहावीच्या विद्यार्थ्यांची दोन गटात तुफान हाणामारी, अकोल्यात नेमकं काय घडलं?
चौकातील कटिंगच्या दुकानात होतो. आम्ही मधात होतो. माझ्या हाताला चाकू मारला. चार-पाच जण जखमी आहेत.
अकोला : अकोला जिल्ह्यातल्या मुर्तीजापूर शहरातील स्टेशन विभाग स्थित दहावीच्या सेंटरच्या जवळ दहावीच्या विद्यार्थ्यांची दोन गटात तुफान हाणामारी झाली. यामध्ये चार विद्यार्थी अति गंभीर झाले आहेत. त्यांना अकोला येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. या हाणामारीचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मुर्तीजापूर शहर पोलिसांनी याबाबत दोन्ही गटातील आठ विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आला आहे. नेमका हा वाद कशावरून झाला आणि कशावर हाणामारी झाली. याचा तपास मुर्तीजापूर शहर पोलीस करत आहे.
वाद सोडवायला गेल्यावर मारहाण
चौकातील कटिंगच्य दुकानात होतो. आम्ही मधात होतो. माझ्या हाताला चाकू मारला. चार-पाच जण जखमी आहेत. दोघांमध्ये वाद झाला. तो सोडवण्यासाठी गेलो असता आम्हालाच मारहाण झाल्याचं एका विद्यार्थ्याने सांगितले. जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर रुग्णालयात नातेवाईकांची गर्दी होती. विद्यार्थी जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या सर्व प्रकरणामुळे पालक हादरून गेले आहेत. मुलांना शिकण्यासाठी आपण शाळेत पाठवतो. ते हाणामाऱ्या करतात. हे बघून पालकांच्या पायाखालची वाळुच सरकली. पोलिसांत गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या दहावीच्या वर्षाचं काय होणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.
व्हिडीओत नेमकं काय?
परीक्षा केंद्राबाहेर हा वाद झाल्याचं व्हिडीओत दिसते. एकमेकांचा कॉलर पकडून मारहाण करण्यात येत आहे. काही विद्यार्थ्यांनी हातात काठ्या घेतल्या आहेत. तर कुणी दगड घेऊन मारायला धावताना दिसून येत आहेत. विद्यार्थी एकमेकांना शिविगाळ करत आहेत. वीस-पंचेवीस जण या जमावाद दिसत आहेत. चार-पाच च्या गृपमध्ये विद्यार्थी दिसतात. हे अतिशय हिंसक झाले आहेत. एकमेकांवर धाऊन पडत आहेत.