Ambeghar landslide : 35 तासांनी दोन म्हशी बाहेर, यंत्रणा पोहोचणं अशक्य, टीव्ही 9 चा प्रतिनिधी 4 तास चालत आंबेघरमध्ये

पाटण तालुक्यातील आंबेघरमध्ये (Ambeghar landslide) दरड कोसळून 14 ते 16 लोक दबले आहेत. 23 जुलैला तुफान पावसाने आंबेघरमध्ये दरड कोसळल्याची माहिती समोर आली.

Ambeghar landslide : 35 तासांनी दोन म्हशी बाहेर, यंत्रणा पोहोचणं अशक्य, टीव्ही 9 चा प्रतिनिधी 4 तास चालत आंबेघरमध्ये
Ambeghar Satara Landslide Dinkar Thorat
Follow us
| Updated on: Jul 24, 2021 | 12:30 PM

सातारा : पाटण तालुक्यातील आंबेघरमध्ये (Ambeghar landslide) दरड कोसळून 14 ते 16 लोक दबले आहेत. 23 जुलैला तुफान पावसाने आंबेघरमध्ये दरड कोसळल्याची माहिती समोर आली. घटनेची माहिती समोर आल्यानंतर 35 तास उलटले तरीही अजून मदत आणि बचावकार्यासाठी इथे यंत्रणाच पोहोचली नाही. टीव्ही 9 मराठीचे कराडचे प्रतिनिधी दिनकर थोरात (Dinkar Thorat) हे चार तासांची पायपीट करत, डोंगर, दरे, ओढे, नाले पार करत आंबेघरमध्ये पोहोचले.

आंबेघर हा एक पाडा आहे. या गावात 8 घरं होती. यापैकी 4 घरांवर दरड कोसळून या घरातील 14 ते 16 लोक दबले आहेत. दुर्घटनेला 35 तास होऊन गेले मात्र मदत आणि बचावकार्य सुरु झालं नाही. आसपासच्या गावातील नागरिकांनी या गावात धाव घेऊन बचावकार्य सुरु केलं.

35 तासांनी दोन म्हशी

आंबेघरमधील एका घराच्या मागे गोटा होता. त्यावर दरड कोसळून दोन म्हशी दबल्या गेल्या. जवळपास 35 तासांनी या दोन म्हशी बाहेर काढल्या. या म्हशी गाळात रुतल्या होत्या. गोठ्याची उरलेली भिंत पाडून या म्हशींना आधी श्वासोश्वासाची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर गाळात रुतलेल्या म्हशी गावकऱ्यांनी कशाबशा हलवल्या. यंत्रणा नसल्याने गावकरी हाताने चिखल काढत आहेत.

आंबेघर नेमकं कुठं आहे?

आंबेघर हे पाटण तालुक्यातील गाव आहे. पाटणपासून पुढे मोरगिरी बाजारपेठ आहे, मोरगिरीपासून 10 ते 12 किमी अंतरावर आंबेघर गाव आहे. त्या गावची एक वाडी होती, त्या वाडीत 8 ते 9 घर होती. आंबेघरच्या अगदी पायथ्याशी गुरेघर हे धरण आहे. मोरणा नदीवर हे धरण बांधले आहे. आंबेघर हे अगदी डोंगरावर असणारे गाव आहे, यापूर्वी कधीही अशी घटना या भागात घडली नाही ती यंदा घडली.

टीव्ही 9 मराठीचे प्रतिनिधी चार तास, 6 किमीची पायपीट करत आंबेघरमध्ये पोहोचले. त्यांनीही वार्तांकन करत स्थानिकांना मदत कार्यात हातभार लावला. चार ओढे पार करुन, डोंगर चढून उतरणे, पायवाट आहे, अशी पायपीट दिनकर थोरात यांनी केली.

मोरणा धरणापर्यंत रस्ता होता, तो वाहून गेला. कुठलीच यंत्रणा जाणार नाही अशी परिस्थिती तिथे आहे. यंत्राशिवाय माणसांनीच मदत आणि बचावकार्य करावा लागण्याची स्थिती आंबेघरमध्ये आहे. नेहमीच्या वाटा बंद झाल्या आहेत.

आंबेघर पाडावस्ती आहे. इथे 8 घरं आहेत, त्यापैकी 4 घरं दबली आहेत. 4 घरातील 16 माणसं ढिगाऱ्याखाली दबली. या घरातील 14 लोक आणि त्यांच्या घरी भात लावणीसाठी आलेले दोन पाहुणे असे 16 लोक दबले. यामध्ये उत्तम कोळेकर यांच्या कुटुंबाचा समावेश आहे.

तीन भाऊ आणि त्यांचं कुटुंब दबलं

उत्तम कोळेकर यांचं कुटुंब चिखलात दबलं आहे. उत्तम कोळेकर आणि त्यांच्या तीन भावांचं घर मलब्याखाली दबलं. यामध्ये तीन भाऊ, त्यांच्या पत्नी आणि पाहुणे असा समावेश आहे. कोळेकर कुटुंबातील मुली पुणे आणि मुंबईला होत्या, त्या आज पाटणमधून टीव्ही 9 मराठीच्या प्रतिनिधींसोबत चालत आंबेघरमध्ये पोहोचल्या.

नेमकं काय घडलं?

रायगडमधील तळीये गावात दरड कोसळल्याची घटना घडली असताना, तसाच प्रकार साताऱ्यातील पाटण तालुक्यात घडला. आंबेघर या गावात दरड कोसळून जवळपास 15 लोक ढिगाऱ्याखाली दबले. 23 जुलैला दुपारी हा प्रकार समोर आला. गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याचं सांगण्यात येत तआहे.  आंबेघर येथील काही घरे या मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली आहेत. या घटनेची माहिती समजताच काही ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले.

साताऱ्याच्या आंबेघरमध्ये 35 तासानंतरही मदत मिळालेली नाही. अनेक लोकं आ मदतीविना आहेत. घटनेला 35 तास उलटूनही त्यांच्यापर्यंत  मदत मिळाली नाहीय. स्थानिक लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरु आहे. टीव्ही 9 ची टीम तिथे पोहोचली आहे. तिथे गेल्यानंतर प्रशासनाची टीम  पोहोचली नसल्याचं समोर आलं. प्रशासन जरी पोहोचलं नसलं तरी स्थानिकांनी बचावकार्य सुरु ठेवलं आहे. लवकरात लवकर मदत पोहोचती आहे, असं उत्तर सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिलं आहे.

VIDEO : आंबेघरमध्ये दरड कोसळली, 35 तासापासून यंत्रणाच पोहोचली नाही

संबंधित बातम्या  

Satara | देवरुखवाडीवर दरड कोसळून 5 घर मातीच्या ढिगाऱ्यात, 27 नागरिक सुखरुप बाहेर      

Satara Landslide: साताऱ्यात आंबेघर गावात दरड कोसळली, 12 जणांचा मृत्यू   

साताऱ्यात काळजाचा ठोका चुकवणाऱ्या 2 घटना, देवरुखवाडीवर दरड कोसळली, पाटणच्या आंबेकरमधील काही घरं मातीच्या ढिगाऱ्याखाली 

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.