Amol Mitkari : त्याची ओळख तर खंडणी बहाद्दर… त्या आरोपानंतर योगेश चिले यांच्यावर पलटवार, मनसे -अमोल मिटकरी यांचा वाद चिघळला

Amol Mitkari on Yogesh Chile : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांच्यात जोरदार शा‍ब्दिक धुमश्चक्री सुरु आहे. आता दोन्ही गटाने पु्न्हा एकमेकांवर शा‍ब्दिक हल्लाबोल केला आहे.

Amol Mitkari : त्याची ओळख तर खंडणी बहाद्दर... त्या आरोपानंतर योगेश चिले यांच्यावर पलटवार, मनसे -अमोल मिटकरी यांचा वाद चिघळला
आमदार अमोल मिटकरी
Follow us
| Updated on: Aug 07, 2024 | 4:41 PM

सध्या राज्यातील राजकारणात नवनवीन वाद उफाळून येत आहे. त्यात आता मनसे आणि अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्यातील शा‍ब्दिक युद्धाची भर पडली आहे. या वादात नवनवीन आरोपांची राळ उडत आहे. मनसे नेते योगेश चिले यांनी आरोप केल्यानंतर अमोल मिटकरी यांनी आता पलटवार केला आहे. दोन्ही गटातील भांडण संपण्याची कोणतीही चिन्हं नाहीत. उलट मनसे आणि अमोल मिटकरी यांच्यातील वाद चिघळला आहे.

वादाचे काय कारण

अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांचा उल्लेख सुपारीबहाद्दर असा केल्यानंतर वादाची ठिणगी पडली. अमोल मिटकरी यांची कार फोडण्यात आली. मनसेच्या एका पदाधिकाऱ्याचा मृत्यू झाला. त्यानंतर आता मनसे नेते योगेश चिले यांनी मिटकरी यांच्यावर घासलेट चोर असल्याचा आरोप केला. त्यावरुन हा वाद मिटण्याऐवजी सातत्याने चिघळत चालला आहे.

हे सुद्धा वाचा

मिटकरींचा पलटवार

चिले’चा हात काळा आहे की गोरा आहे? याचं थोबाड पाहलं नाहीये. कोणीही येतो आणि आरोप करतो.. आरोपाला तथ्य असलं पाहिजे. त्याच्याकड पत्र आहे का? तपासलं पाहिजे. राजा हरीशचंद्राच्या पोटी जन्माला आला का तसेही नाही. आज चिलेची ओळख पनवेलमध्ये खंडणी बहाद्दर म्हणून आहे. हॉटेल हयात प्रकरणावर आणखी हॉटेल काढावे. मग आम्ही पण खालच्या पातळीवर जाऊ, असा इशारा त्यांनी चिले यांना दिला. तुझा मालक दादांवर बोलला आम्ही उत्तर दिलं तर वैचारिक संघर्ष कर ना बाळा, असा पलटवार त्यांनी केला.

चिलेंवर गंभीर आरोप

योगेश चिले याचा पनवेलमध्ये व्यवसाय होता. पान टपरी चालक, गुटखा विक्रेते यांच्याकडून तो 200 रुपये खंडणी घ्यायचा. सिडको प्राधिकरणमध्ये माहिती अधिकार टाकून तो कंत्राटदार, बिल्डर यांना राज ठाकरे यांच्या अमित ठाकरे यांच्या नावाने धमकवायचा. त्यांना राजगड पक्ष कार्यलयात बोलावून खंडणी उकळायचा. अनेक कंत्राटदार समोर आले आहेत. त्यांच्याकडे याविषयीच्या व्हाईस रेकॉर्डिंग आहेत. त्यात याने कशाप्रकारे खंडणी वसूल केली, हे दिसून येते, असा गंभीर आरोप मिटकरी यांनी केला.

गावठाणची जमीन पनवेल मध्ये त्या जमिनी मध्ये कॉन्ट्रॅक्टर यांनी बिल्डिंग उभ्या केल्या त्या नंतर तिथे पैसे मागितले गेले आयुक्त मार्फत चौकशी लावावी अशी विनंती बिल्डर यांनी केली आहे. पनवेल आयुक्त, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांच्याशी याविषयीवर बोलणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

पोलीस कर्णबाळा यांच्या मागावर

अकोला पोलिसांची दोन पथकं कर्णबाळा दुनबळे याच्या शोधार्थ मुबंईत आहेत. आजचा पाचवा सहावा दिवस आहे. अद्यापही त्याचा कुठे थांबपत्ता लागत नाही. एक तर तो शिवतीर्थावर लपलेला आहे. तो जोपर्यंत पकडला जात नाही तोपर्यंत माझा पोलिसांवरचा विश्वास दृढ होणार नाही, असे मिटकरी म्हणाले.

याप्रकरणात एकूण 21 आरोपी असल्याचे समोर येत आहे. एक महिला आणि तो हे दोघजण मात्र अद्यापही फरार आहेत. दुनबळेच्या चालकाने दगड मारल्याचे सीसीटीव्हीवरुन लक्षात येत आहे. जर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला अकोला पोलीस जबाबदार असतील असा इशारा मिटकरी यांनी दिला.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.