Amol Mitkari : राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्याच्या भेटीत मुरलं पाणी, हल्लेखोरांना मिळाले अभय, अमोल मिटकरींचा गंभीर आरोप

Amol Mitkari on CM Eknath Shinde : राष्ट्रवादी काँग्रसेचे आमदार अमोल मिटकरी आणि मनसेमधील वाद उफाळला आहे. दोन्ही गोटातून हल्लाबोल सुरु आहे. त्यातच आता अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्र्यांवर पण गंभीर आरोप केला आहे.

Amol Mitkari : राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्याच्या भेटीत मुरलं पाणी, हल्लेखोरांना मिळाले अभय, अमोल मिटकरींचा गंभीर आरोप
अमोल मिटकरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Follow us
| Updated on: Aug 07, 2024 | 5:09 PM

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांच्या गाडीवरील हल्ला प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणातील आरोपींना मुख्यमंत्र्यांचं अभय आहे का?, असा प्रश्न आमदार अमोल मिटकरींनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. मुख्यमंत्री आणि राज ठाकरे याच्या दोन तासांच्या झालेल्या बैठकीत आपल्या विरोधात काही शिजलंय का? असा आरोप मिटकरी यांनी केला आहे.

मुख्यमंत्र्यांचे कर्णबाळाला अभय

कर्णबाळा अजूनही फरार आहे. राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्याच्या भेटीमध्ये कुठेतरी पाणी मुरलं. अकोला पोलीस कर्णबाळाचा शोध का घेत नाही? कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण होत आहे, तुम्हाला मुख्यमंत्र्यांचा दबाव आहे का? हे समोर आल पाहिजे.. एका आमदारावर हल्ला होतो, मुख्यमंत्री साधी विचारणा करत नाही. याचा अर्थ मुख्यमंत्र्यांचं माझ्यावर प्रेम नाही अथवा कमी झालं असं आहे.

हे सुद्धा वाचा

मुख्यमंत्री आज ठाकरेंच्या दोन तासाच्या बैठकीनंतर कुठेतरी या प्रकरणावर पाणी मुरल्या गेले, असा आरोप मिटकरींनी केला आहे. त्यामुळे त्या प्रकरणातला प्रमुख सूत्रधार कर्णबळा दुनबळेला अटक होत नाहीये, असा आरोप आमदार अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्र्यांवर केलाय. या प्रकरणानंतर मुख्यमंत्र्यांनी एकदाही आपली साधी विचारपूस केली नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

चिलेंवर आरोपांची राळ

दरम्यान, मनसे प्रवक्ते योगेश चिले यांनी केलेल्या आरोपांनाही मिटकरी यांनी उत्तर दिलं आहे. योगेश चिले हा खंडणीबहाद्दर आहे. पनवेल परिसरात चिलेंनी अनेक कंत्राटदारांकडून खंडणी वसूल केल्याचा आरोप मिटकरींनी केला आहे. योगेश चिले हा राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या नावाने राजगडावर बसून कंत्राटदारांकडून खंडण्या वसूल करत असल्याचा गंभीर आरोप आमदार मिटकरी यांनी केला आहे. या संदर्भातील अनेक ठोस पुरावे आपल्याकडे असून लवकरच पनवेल येथे जाऊन पत्रकार परिषद घेणार असल्याचं आमदार अमोल मिटकरी म्हणाले.

निलेश राणे यांच्यावर हल्ला

कोण थोबाड फोडेल, वाहन फोडाल, कपडे फाडाल, गोळ्या मारणार. तुम्ही तुमच्या पक्षाच काम करा. दुसऱ्या पक्षाचे प्रवक्ते का होता? असा टोला मिटकरी यांनी निलेश राणे यांना लगावला. जितेंद्र आव्हाड असो की.. अन्य कोणी,  रात्री 8 नंतर यांचं संतुलन जागेवर रात नाहीये, रात्रीस खेळ चाले ऊन सावल्यांचा, असा चिमटा त्यांनी काढला.

'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.