… तर गोप्याच्या बुडाला आग लागली म्हणून समजा; अमोल मिटकरी यांचा पडळकर यांच्यावर हल्लाबोल

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यात चांगलीच जुंपली आहे. पडळकर यांनी पवार कुटुंबावर जोरदार टीका केली. या टीकेचा मिटकरी यांनी समाचार घेतला आहे.

... तर गोप्याच्या बुडाला आग लागली म्हणून समजा; अमोल मिटकरी यांचा पडळकर यांच्यावर हल्लाबोल
amol mitkariImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 27, 2023 | 12:18 PM

अकोला : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर अत्यंत खोचक शब्दात टीका केली आहे. पडळकर यांची ही टीका राष्ट्रवादीच्या नेत्यांना चांगलीच झोंबली आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी पडळकर यांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिलं आहे. शरद पवार यांचं नुसतं नाव ऐकलं तरी गोप्याच्या बुडाला आग लागली म्हणून समजा, अशी टीकाच अमोल मिटकरी यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा

अमोल मिटकरी यांनी ट्विट करून गोपीचंद पडळकर यांच्या विधानाचा समाचार घेतला आहे. हा गोप्या म्हणजे भट्टीच्या तव्यावर बसलेल्या बाबासारखा आहे. पवारांचं नुसतं नाव जरी ऐकलं की गोप्याच्या बुडाला आग लागली म्हणून समजा… याला जास्त दिवस संन्यासी ठेवणे त्याच्या पक्षाला परवडणार नाही. हा त्याच्या पक्षाला एकदिवस आग लावून त्याच भट्टीवर बुड शेकत आनंद घेईल, अशी खोचक टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे.

पडळकर काय म्हणाले होते?

गोपीचंद पडळकर यांनी पवार घराण्यावर जोरदार टीका केली होती. भावी पंतप्रधान असा काही विषय नसतो का? ज्यांचे खासदार आहेत ते पंतप्रधान होतील का?, असा सवाल करतानाच यांना मुख्यमंत्री करायचं असेल तर महाराष्ट्राचे तीन राज्ये केली पाहिजे. एक लवासा, एक बारामती, आणि एक मगरपट्टा. मगरपट्ट्याचा मुख्यमंत्री जयंत पाटलांना करा. लवासाचे मुख्यमंत्री सुप्रिया सुळे यांना आणि बारामतीचा मुख्यमंत्री अजित पवारांना करा आणि हे तिन्ही राज्य एकत्र करून त्याचा देश करा. त्या देशाचा पंतप्रधानपदी शरद पवारांना बसवा, अशी खोचक टीका गोपीचंद पडळकर यांनी केली. बारामती लोकसभेचे तिकीट कुणाला मिळणार माहिती नाही. पण ज्याला मिळणार तो भाग्यवान असणार तो पवारांना पाडून संसदेत जाणार, असंही पडळकर म्हणाले.

आपण भाग्यवान

देवेंद्र फडणवीस हेच राज्यातील एकमेव निष्कलंक नेते आहेत. त्यांनी जो अर्थसंकल्प मांडला त्यातून ज्यांचे कुणी आमदार आणि खासदार नाहीत अशा घटकांनाही त्यांनी मदत केली. अजित पवार यांनी मांडलेला अर्थ संकल्प स्वत:ची घरभरणी करणारा होता. असा अर्थसंकल्प मांडावा असं अजित पवार यांना का वाटलं नाही? पुणे जिल्ह्यात अशी कोणतीच कंपनी नाही की ज्यात पवारांची भागिदारी नाही. अजित पवार त्यांच्या विधानसभा मतदारसंघाला पिण्याचे पाणी देऊ शकले नाहीत, असं सांगतानाच पाकिस्तानमधील तरुण म्हणतात आम्हाला मोदी सारखा नेता हवाय. मोदींच्या सत्तेत राहतोय, आपण भाग्यवान आहोत, असंही त्यांनी सांगितलं.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.