Chandrapur Tiger | चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात वृद्ध ठार, छिन्नविछिन्न अवस्थेत सापडला जंगलात मृतदेह
सिन्हाळा गावाला लागून असलेल्या जंगलात वाघडोह या वाघाची दहशत आहे. तो वाघ जनावरांवर तसेच माणसांवर हल्ला करतो. त्यावर वनविभाग लक्ष ठेऊन आहे. पण, तरीही त्यानं काल दशरथ यांचा बळी घेतला. त्यामुळं परिसरात दहशत पसरली आहे.
चंद्रपूर : चंद्रपूर शहराजवळ असलेल्या सिन्हाळा (Sinhala) येथील ग्रामस्थाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. दशरथ पेंदोर (Dashrath Pendor) (वय 65) असं हल्ल्यात मृत्यू झालेल्या ग्रामस्थाचं नाव आहे. बकऱ्या चारण्यासाठी गावतलावाशेजारी गेलेले दशरथ हे काल संध्याकाळी परत आले नाही. गावकरी आणि वनविभागाच्या ( Forest Department) कर्मचाऱ्यांनी शोधाशोध केली. आज सकाळी याच परिसरात छिन्न विच्छिन्न अवस्थेत मृतदेह सापडला. या परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाघडोह या ताडोबातील प्रसिध्द वाघाचा वावर आहे. अतिशय म्हातारा आणि अशक्त असलेला वाघडोह माणसं आणि पाळीव जनावरांसाठी धोकादायक ठरू शकतो ही शक्यता लक्षात घेता वनविभाग ठेवून होता वाघावर नजर आहे. मात्र वाघावर नजर ठेवूनही अखेर ग्रामस्थाचा जीव गेला. ग्रामस्थांमध्ये वनविभागाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
जंगलात काय घडलं
दशरत यांचा बकऱ्या चारण्याचा व्यवसाय आहे. ते गेल्या कित्तेक दिवसांपासून बकऱ्या चारण्यासाठी जंगलात घेऊन जातात. त्यामुळं वन्यप्राणी हे काही त्यांच्यासाठी नवीन नव्हते. पण, काल वेगळंच घडलं. दशरथ नेहमीप्रमाण जंगलात बकऱ्या चारण्यासाठी घेऊन गेले. त्याठिकाणी वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. वय 65 वर्षे झाल्यानं ते वाघाचा प्रतिकार करू शकले नाही. त्यामुळं वाघाच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. अखेर छिन्नविछिन्न अवस्थेत त्यांचा मृतदेह सापडला.
वाघडोहची दहशत
सिन्हाळा गावाला लागून असलेल्या जंगलात वाघडोह या वाघाची दहशत आहे. तो वाघ जनावरांवर तसेच माणसांवर हल्ला करतो. त्यावर वनविभाग लक्ष ठेऊन आहे. पण, तरीही त्यानं काल दशरथ यांचा बळी घेतला. त्यामुळं परिसरात दहशत पसरली आहे. वनविभागानं या वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी गावकरी करत आहेत. आता वनविभाग नागरिकांचा रोष लक्षात घेता वाघडोहवरील अधिकच जास्त नजर वनविभाग ठेवणार आहे.
वाघाला जंगलात हाकलले
प्रत्यक्षदर्शी म्हणाला, मी येथे आलो तेव्हा वाघ होता. मृतदेहाची विल्हेवाट तो लावत होता. मी आलो तेव्हा तो मृतदेहाजवळ दिसला. मी लोकांना आवाज मारला. कोणी यायला तयार नव्हते. शेवटी काही लोकं आले. वाघाला हाकललो. त्यानंतर तो वाघ मृतदेहाजवळून गेला. त्यानंतर मृतदेहवाची विल्हेवाट लावल्याचं प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं.