Nanded Crime : जादूटोणा आणि उपचाराच्या नावाखाली नागरिकांना लुटणाऱ्या भोंदू बाबाचा अंनिसकडून पर्दाफाश

तौफीक बाबाचा अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि पोलिसांनी भांडाफोड केला आहे. स्टिंग ऑपरेशन केल्यानंतर या प्रकरणात भोंदू तौफीक बाबाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. कासराळी येथील दस्तगीर दर्ग्यावर तौफीक बाबाने आपले बस्तान बसविले होते.

Nanded Crime : जादूटोणा आणि उपचाराच्या नावाखाली नागरिकांना लुटणाऱ्या भोंदू बाबाचा अंनिसकडून पर्दाफाश
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Feb 08, 2022 | 5:40 PM

नांदेड : अंधश्रद्धा निर्मूलन समिती(ANNIS)ने नांदेडमध्ये स्टिंग ऑपरेशन(Sting Operation) करत एका भोंदूबाबाचे पितळ उघडे पाडलंय. बिलोली तालुक्यातील कासराळी गावातील ही घटना आहे. इथल्या एका दर्गावर वास्तवास असणाऱ्या शेख तौफिकने आपल्यात दैवी शक्ती असून रुग्णांना बरे करण्याचा दावा हा बाबा करत होता. याप्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पुढाकार घेत या तौफिक बाबांचे स्टिंग करत त्याच्या विरोधात जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. दुर्धर आजारावर उपचार करण्याच्या नावाखाली नागरिकांकडून पैसे उकळण्यासोबतच जादूटोणा आणि करणी झाल्याची भीती दाखवून गंडवत होता. (Annis exposes the fake baba who robbed the citizens in the name of witchcraft and healing)

अंगात दैवी शक्ती असल्याचे भासवत होता

तौफीक बाबाचा अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि पोलिसांनी भांडाफोड केला आहे. स्टिंग ऑपरेशन केल्यानंतर या प्रकरणात भोंदू तौफीक बाबाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. कासराळी येथील दस्तगीर दर्ग्यावर तौफीक बाबाने आपले बस्तान बसविले होते. या बाबाकडे दैनंदिन स्वरुपाच्या तक्रारी घेऊन येणाऱ्यांचे प्रमाण वाढले होते. त्यावर तो अनेकांना करणी आणि जादूटोणा केला असून तो दूर करण्यासाठी पैशांची मागणी करीत होता. तसेच दुर्धर आजारावरील उपचारासाठी 501 रुपयांपासून ते 1001 रुपये उकळत होता. त्यामुळे गावात करणी आणि जादूटोणा केल्याच्या संशयावरुन वाद होत होते. लोकांना गोळा करून आपल्या अंगात दैवी शक्ती असल्याचे भासवत होता.

कसा केला बाबाचा पर्दाफाश ?

28 जानेवारी रोजी ईरन्ना बोरोड यांचा पाय दुखत असल्यामुळे उपचारासाठी ते तौफीक बाबाकडे गेले होते. यावेळी तौफीक बाबाने अंगात आल्याचे भासवून तुमचा त्रास औषधोपचाराने नव्हे तर गावातीलच एका महिलेने करणी केली असून त्यापासून सुटका केल्याने होणार असल्याचे सांगितले. त्यामुळे गावातील नागरिक त्या महिलेकडे बाबाच्या संशयाने पाहू लागले. त्यातून गावात भांडणेही सुरू झाली होती. याबाबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे तक्रार करण्यात आली. त्यानंतर स्टिंग ऑपरेशन करून या भोंदू बाबाचा भांडाफोड करण्यात आला. (Annis exposes the fake baba who robbed the citizens in the name of witchcraft and healing)

इतर बातम्या

Nashik accident | कर्मचाऱ्याच्या अंगावर गरम डांबराचा ट्रक उलटला; नाशिकमध्ये भीषण अपघात

Pune Crime : पुण्यात येरवडा कारागृहात पोक्सो गुन्ह्यातील कैद्याची गळफास घेऊन आत्महत्या

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.