इरई नदीवरील सौर ऊर्जा प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यासाठी अधीक्षक अभियंत्याची नेमणूक करा; ऊर्जामंत्र्यांचे आदेश

ऊर्जामंत्री डॉ. राऊत म्हणाले, इरई नदीवरील सौर उर्जा प्रकल्प हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. हा प्रकल्प वेगाने कार्यान्वित होण्यासाठी पूर्णवेळ अधीक्षक अभियंत्याची तात्काळ नेमणूक करा.

इरई नदीवरील सौर ऊर्जा प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यासाठी अधीक्षक अभियंत्याची नेमणूक करा; ऊर्जामंत्र्यांचे आदेश
Nitin Raut
Follow us
| Updated on: Jul 11, 2021 | 6:25 PM

चंद्रपूर : येथील महाऔष्णिक विद्युत केंद्रातील राखेने भरलेल्या रेल्वेला हिरवी झेंडी दाखविल्यानंतर राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी वीज उत्पादन विषयक कामांचा आढावा घेतला. यावेळी खासदार बाळू धानोरकर, आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभा धानोरकर, महानिर्मितीचे संचालक (खणिकर्म) पुरुषोत्तम जाधव, कार्यकारी संचालक (पर्यावरण व सुरक्षितता) डॉ. नितीन वाघ, मुख्य अभियंते पंकज सपाटे, देशपांडे, वाळके आदी उपस्थित होते. (Appoint a superintendent engineer to complete solar energy project on Erai River; Nitin Raut Orders)

यावेळी बोलतांना ऊर्जामंत्री डॉ. राऊत म्हणाले, इरई नदीवरील सौर उर्जा प्रकल्प हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. हा प्रकल्प वेगाने कार्यान्वित होण्यासाठी पूर्णवेळ अधीक्षक अभियंत्याची तात्काळ नेमणूक करा. दर आठवड्याला तांत्रिक कामांचा आढावा कसोशीने होणे गरजेचे आहे, तसेच औष्णिक विद्युत केंद्रात संशोधन विकास विभाग सुरू करावा. तांत्रिक घटनांचे विश्लेषण, डेटाबँक विकसित करावी तसेच रोबो आणि आर्टिफिशियल इंटिलीजन्स प्रणालीचा वापर करून अत्याधुनिक नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, कार्यप्रणाली विकसीत करा, जेणेकरून अशा संशोधनामधून आणि केस स्टडीमधून कंपनीची प्रगती होण्यास मदत होईल.

ऊर्जामंत्र्यांना विद्युत केंद्राची माहिती देतांना मुख्य अभियंते पंकज सपाटे यांनी सांगितले की, मागील काही महिन्यात अनेक बाबींमध्ये प्रत्यक्ष लक्ष केंद्रित केल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक बचत झाली, वीज उत्पादनाची कार्यक्षमता वाढली. रस्ता मार्गे वाहतूक होणाऱ्या कोळशामुळे प्रदुषणाची समस्या निर्माण होते. यावर मात करण्यासाठी कोळसा वाहून नेणाऱ्या पाईप कन्व्हेयरचे काम पूर्णत्वास आले असून ऑगस्ट 2021 मध्ये या कामाचा प्रत्यक्ष शुभारंभ नियोजित आहे, असे ऊर्जामंत्र्यांनी संगितले.

बैठकीला औष्णिक विद्युत केंद्रातील विविध विभागाचे अधिकारी, अभियंते आदी उपस्थित होते. आढावा बैठकीपूर्वी ऊर्जामंत्री राऊत यांनी 500 मेगावॅट क्षमतेच्या संच क्रमांक 8 व 9 च्या नियंत्रण कक्षाला भेट दिली आणि अभियंत्यांशी संवाद साधला.

इतर बातम्या

भास्कर जाधवांनी विधानसभाध्यक्ष व्हावे, पण निष्पक्ष काम करावे! देवेंद्र फडणवीसांनी लगावला टोला

राहुल गांधींना राष्ट्रीय नेता म्हटलेलं बैलांनाही आवडलेलं दिसत नाही, देवेंद्र फडणवीसांची काँग्रेसवर खोचक टीका

निवडणुका लागेपर्यंत केंद्राने ओबीसी समाजाचा इम्पेरीकल डेटा गोळा करावा; शिवसेनेची मागणी

(Appoint a superintendent engineer to complete solar energy project on Erai River; Nitin Raut Orders)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.