“ज्या वारकऱ्यांनी दोन डोस घेतले असतील, त्यांनाच पंढरपुरात प्रवेश द्या”

पंढरपूरच्या नगराध्यक्षांनी दोन डोस झालेल्या वारकऱ्यांना पंढरपुरात प्रवेश देण्याची मागणी केली आहे. त्यासाठी पंढरपूरमध्ये प्रवेश करताना वाखरी येथे सर्व वारकऱ्यांचे दोन डोस झालेले प्रमाणपत्र तपासूनच पंढरपूरमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.

ज्या वारकऱ्यांनी दोन डोस घेतले असतील, त्यांनाच पंढरपुरात प्रवेश द्या
Sadhana Bhosale Pandharpur
Follow us
| Updated on: Jun 14, 2021 | 11:34 AM

पंढरपूर : येत्या 20 जुलैला होणाऱ्या आषाढी एकादशीसाठी (Ashadi Ekadashi 2021) पंढरपूरला (Pandharpur) जाण्यासाठी शासनाने नियमावली जाहीर केली आहे. मात्र तरीही वारकरी पायी वारीचा आग्रह धरत आहेत. अशातच पंढरपूरच्या नगराध्यक्षांनी दोन डोस झालेल्या वारकऱ्यांना पंढरपुरात प्रवेश देण्याची मागणी केली आहे. त्यासाठी पंढरपूरमध्ये प्रवेश करताना वाखरी येथे सर्व वारकऱ्यांचे दोन डोस झालेले प्रमाणपत्र तपासूनच पंढरपूरमध्ये प्रवेश दिला जाईल, असं नगराध्यक्षा साधना भोसले (Sadhana Bhosale Pandharpur) यांनी सांगितले. (Ashadi Ekadashi 2021 Only those who took two doses of covid 19 can entered in Pandharpur said Nagaradhyaksha Sadhana Bhosale)

कोरोनाच्या संसर्गामुळे गेल्यावर्षी आषाढी वारी रद्द झाली होती. यंदाही या वारीवर कोरोनाचे सावट आहे. पालखी मार्गावर येणाऱ्या अनेक गावांनीदेखील पायी वारीला विरोध केला आहे. सगळ्यात शेवटचं गाव असलेल्या वाखरी ग्रामपंचायतीने तर चक्क पायीवारी काढल्यास वाखरी गाव बंद ठेवून निषेध व्यक्त करणार असल्याचा इशारा दिला आहे.

पंढरपुरात कोरोनाचा उद्रेक 

यानंतर आता पंढरपूरच्या नगराध्यक्ष साधनाताई भोसले यांनी शासनाकडे मागणी केली आहे की, ज्या वारकऱ्यांचे कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस पूर्ण झालेले आहेत, अशाच वारकऱ्यांना पंढरपूरमध्ये प्रवेश द्यावा. पंढरपूरमध्ये सध्या 555 जणांवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. 24 हजार 731 जणांना आजपर्यंत संसर्ग झालेला आहे. तर 480 जणांनी आतापर्यंत जीव गमावला आहे. यामुळे अद्यापही नागरिकांत कोरोनाबद्दल भीती आहे.

पालख्यांचा मुक्काम 

पंढरपुरातील अनेक महत्वाच्या मठात कोव्हिड केअर सेंटर सुरू आहेत. गेल्यावर्षी 3 दिवसात पालख्यांचा मुक्काम पंढरपुरात संपला होता. पण यंदा 6 दिवस पालख्या पंढरपुरात असणार आहेत. त्यामुळे अनेक भाविक दर्शनास येण्याची भीती आहे. पंढरपूरमधील कोरोनाचा संसर्ग वाढू द्यायचा नसेल तर शासनाने कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्या वारकऱ्यांना पंढरपुरात प्रवेश देण्याची मागणी नगराध्यक्षांनी केली आहे. आता शासन याबद्दल काय निर्णय घेईल याकडे लक्ष असणार आहे.

दहा पालख्यांना परवानगी

राज्यातील ज्या मानाच्या दहा महत्त्वाच्या पालख्या आहेत, त्यांनाच आषाढीच्या वारीसाठी परवानगी देण्यात आली आहे. या पालख्यांना बसमधून जाण्याची परवानगी देण्यात आली असून त्यांना 20 बसेस देण्यात येणार आहेत. तसा निर्णयच कॅबिनेटमध्ये घेण्यात आला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चार दिवसापूर्वी दिली होती.

संबंधित बातम्या  

मानाच्या 10 पालख्यांना आषाढी वारीसाठी परवानगी; अजित पवारांची मोठी घोषणा

(Ashadi Ekadashi 2021 Only those who took two doses of covid 19 can entered in Pandharpur said Nagaradhyaksha Sadhana Bhosale)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.