चंद्रपूर वीज केंद्रातील राखेचे रेल्वेद्वारा वहन, उर्जामंत्री राऊतांच्या हस्ते हिरवी झेंडी

राखेचा महत्तम विनियोग, पर्यावरणपूरक, स्वस्त आणि सुरक्षित वापर करण्याकरीता रेल्वेद्वारे राख वहन करण्याचे महानिर्मितीने उचलले पाऊल अभिनंदनीय आहे, असे प्रतिपादन ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले आहे.

चंद्रपूर वीज केंद्रातील राखेचे रेल्वेद्वारा वहन, उर्जामंत्री राऊतांच्या हस्ते हिरवी झेंडी
Nitin Raut
Follow us
| Updated on: Jul 11, 2021 | 7:04 PM

चंद्रपूर : राखेचा महत्तम विनियोग, पर्यावरणपूरक, स्वस्त आणि सुरक्षित वापर करण्याकरीता रेल्वेद्वारे राख वहन करण्याचे महानिर्मितीने उचलले पाऊल अभिनंदनीय आहे. आगामी काळात राखेचे महत्त्व वाढून आर्थिक स्त्रोत निर्माण होणार आणि इतर उद्योगांनासुध्दा उभारी मिळेल, असे प्रतिपादन ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले. चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील राखेने भरलेल्या रेल्वेला हिरवी झेंडी दाखवताना ते बोलत होते. यावेळी सुमारे 59 वॅगनमध्ये 4200 मेट्रिक टन राख रेल्वेद्वारे रवाना करण्यात आली. (Ashes from Chandrapur power station carried by train, nitin raut inaugurated event)

यावेळी बोलताना उर्जामंत्री डॉ. राऊत म्हणाले की, या प्रयोगाचे यशापयश बघून महानिर्मितीच्या कोराडी व खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रामधूनही रेल्वेद्वारे राखेची वाहतूक करण्याचे नियोजन आहे. रेल्वेद्वारे एकावेळी मोठ्या प्रमाणात राख वाहून नेता येते. शिवाय रेल्वेद्वारे राख वहन केल्यास अवजड वाहनांमुळे होणारे अपघात आणि वाहतुकीची समस्या कमी होण्यास मदत होते. महानिर्मितीच्या राख साठवण बंधाऱ्यापर्यंत राख वाहून नेण्याच्या खर्चासोबत राख साठवण बंधाऱ्याची ऊंची वाढवण्याच्या कामाच्या खर्चात देखील बचत होते. राख वाहून नेणाऱ्या बल्करमधून एका वेळेस साधारणत: 20 ते 22 मेट्रिक टन राख वाहून नेता येते. मात्र रेल्वेद्वारे एका वेळेस साधारणत: 3500 ते 4000 मेट्रिक टन राख कमी खर्चात वाहून नेता येते.

कमी खर्चात मोठ्या प्रमाणात राखेचं वहन

रेल्वेद्वारे राखेला मुंबई, पुणे तसेच सिमेंट उद्योग आणि आर. एम. सी.प्लांट असलेल्या ठिकाणी नेता येऊ शकते. बल्करसाठी सरासरी सात रुपये प्रती किलोमीटर प्रती मेट्रिक टन एवढा खर्च येतो. मुंबई बाजारपेठेत राखेचा दर अंदाजे 1800 रुपये प्रती मेट्रिक टन इतका आहे. पहिली खेप पाठविणारी एजन्सी मेसर्स अॅशटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड असून चंद्रपूर वीज केंद्रातून ए. सी. सी. अंबुजा चंद्रपूर प्लांटमध्ये रेल्वेद्वारे राख वाहतुकीचा खर्च 95 रुपये प्रती मेट्रिक टन आहे तर बल्करद्वारे हाच खर्च 300 रुपये प्रती मेट्रिक टन इतका येतो.

चंद्रपूर वीज केंद्रात दररोज 16 हजार मेट्रिक टन ओली आणि कोरडी राख तयार होते. राखेचा 100 टक्के विनियोग करण्यासंबंधी वने, पर्यावरण आणि वातावरण बदल मंत्रालयाने निकष ठरवून दिलेले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील सिमेंट उद्योग आणि लघू उद्योगांमध्ये चंद्रपूर वीज केंद्रातील राख काही प्रमाणात उपयोगात आणली जाते. परंतु कोराडी व खापरखेडा विद्युत केंद्राच्या परिसरात असे मोठ्या प्रमाणात राखेचा वापर करणारे उद्योग नसल्यामुळे तिथे राखेची विल्हेवाट लावण्याचा मोठा प्रश्न वीज प्रशासनासमोर आहे. यासाठी महानिर्मितीने राखेची गरज असलेल्या भागामध्ये रेल्वेद्वारे वाहतूक करण्याची चाचपणी ह्या निमित्ताने केली आहे.

प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करु : राऊत

मानवासाठी वीज ही अत्यावश्यक बाब आहे. विजेची आवश्यकता लक्षात घेता विजेचे दर कसे कमी करता येतील, याबाबत नियोजन करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत. येथील औष्णिक विद्युत केंद्रामुळे झालेल्या प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी नक्कीच सकारात्मक पाऊले उचलली जातील. प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न त्वरीत मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असेही त्यांनी सांगितले.

नेते आणि अधिकारी उपस्थित

या कार्यक्रमाला खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर, आभासी पद्धतीने महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे, संचालक (संचलन) चंद्रकांत थोटवे, संचालक (प्रकल्प) व्ही. थंगापांडीयन, संचालक (वित्त) बाळासाहेब थिटे तर चंद्रपूर येथून महानिर्मितीचे संचालक (खणिकर्म) पुरुषोत्तम जाधव, कार्यकारी संचालक (पर्यावरण व सुरक्षितता) डॉ. नितीन वाघ, मुख्य अभियंते पंकज सपाटे, ॲशटेक प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक संजय मानधनिया, मध्य रेल्वेचे के. एन. सिंग, अंबुजा सिमेंट कंपनीचे मुख्य वितरण अधिकारी नीरज बंसल प्रामुख्याने उपस्थित होते.

नेते आणि अधिकाऱ्यांसह चंद्रपूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, पक्षीय नेते, उपमुख्य अभियंते राजेश राजगडकर, किशोर राऊत, राजेशकुमार ओसवाल, मदन अहिरकर तसेच अधीक्षक अभियंते सुहास जाधव, भास्कर इंगळे, अनिल गंधे, अनिल पुनसे, विजया बोरकर, पुरुषोत्तम उपासे, सुनील कुळकर्णी, मिलिंद रामटेके, महेश गौरी, प्रभारी आर.के.पुरी, सराफ, महेश राजूरकर तसेच वीज केंद्र, प्रकल्प, स्थापत्य विभाग प्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते.

हेही वाचा

इरई नदीवरील सौर ऊर्जा प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यासाठी अधीक्षक अभियंत्याची नेमणूक करा; ऊर्जामंत्र्यांचे आदेश

(Ashes from Chandrapur power station carried by train, nitin raut inaugurated event)

“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर.
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?.
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी.
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?.
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?.
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.