नगरमध्ये अनोखी सामाजिक बांधिलकी, निवृत्ती घेताना कर्मचाऱ्याकडून कार्यक्रम न करता कोविड सेंटरला 11 हजारांची देणगी

कोरोना महामारीच्या काळात सामाजिक बांधिलकी जपत एका निवृत्त बँक कर्मचाऱ्याने कोविड सेंटरला 11 हजार रुपये दान केलेत.

नगरमध्ये अनोखी सामाजिक बांधिलकी, निवृत्ती घेताना कर्मचाऱ्याकडून कार्यक्रम न करता कोविड सेंटरला 11 हजारांची देणगी
Follow us
| Updated on: Jun 02, 2021 | 6:13 PM

अहमदनगर : बँक ऑफ बडोदाच्या कोपरगाव शाखेत 38 वर्षांपासून कार्यरत असणारे कर्मचारी सुरेश महादू जायकर सेवानिवृत्त झाले. मात्र, कोरोना महामारीच्या काळात त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत निवृत्तीचा कोणताही कार्यक्रम केला नाही. बँकेतील मोजक्या कर्मचाऱ्यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी जायकर परिवाराने आमदार निलेश लंके यांनी सुरू केलेल्या 1100 बेडच्या कोविड सेंटरला 11 हजार रुपयांची देणगी दिलीय (Bank of Baroda employee Suresh Jaykar donate 11 thousand to Covid Centre in Ahmednagar).

यावेळी बँकेचे व्यवस्थापक पुष्कराज गौतम म्हणाले, “कामाप्रति अत्यंत प्रामाणिक व योग्य पद्धतीने काम करण्याची हातोटी सुरेश जायकर यांच्यात आहे. ते बँकेच्या अनेक चढ उताराचे साक्षीदार आहेत. त्यांच्या कामाप्रति असलेल्या प्रामाणिकपणामुळे बँक ऑफ बडोदा पुढील वाटचाल करत आहे. सुरेश जायकर यांच्या सारख्या कुटुंबातील लोकांमुळे बँकेची आजपर्यंत भरभराट झाली आहे.”

“38 वर्षात अनेक जबाबदारीचे कागदपत्रं जपली”

बँकेचे अधिकारी द्वारकाधिश ठाकूर म्हणाले, “सुरेश जायकर यांनी निस्वार्थ 38 वर्षे बँक ऑफ बडोडात सेवा दिली. कोणालाही न दुखावता गेल्या 38 वर्षात अनेक जबाबदारीचे कागदपत्र आजपर्यंत त्यांनी योग्य नियोजनाच्या आधारे जपून ठेवलीत. त्यांच्यात हे महत्त्वाचं कौशल्य होतं.”

“केलेली सेवा सयाजीराव गायकवाड यांच्या चरणी”

आपल्या निवृत्तीच्या क्षणी बोलताना सुरेश जायकर म्हणाले, “मी जी सेवा केली ती सयाजीराव गायकवाड यांच्या चरणी अर्पण केली. मला भगवंताने भरभरून दिले. सर्व शाखेतील सर्वांनी मला सहकार्य केले आहे. बँकेचा फायदा होईल यासाठी नेहमी प्रयत्न केले आहे. बँकेतील सर्व कागदपत्रं योग्य नियोजनाच्या आधारे शाखेला फायदा होईल त्यासाठी नेहमीच प्रयत्न केले आहे. प्रयत्न केल्याने सर्व काही साध्य करता येते. त्यामुळे माझ्यानंतर देखील सर्व शाखेतील लोकांना शिकवलेले आहे.”

आमदार निलेश लंकेंच्या कोविड सेंटरला 11 हजार रुपयांची देणगी

कोरोनामुळे कोणताही मोठा कार्यक्रम न करता जायकर कुटुंबाने आमदार निलेश लंके यांच्या कोविड सेंटरला 11 हजार रुपयांचा धनादेश दिलाय. यावेळी बँक व्यवस्थापक पुष्कराज गौतम, इंद्रप्रकाश चौधरी, शंकर दिवे, उत्कर्ष शर्मा, भारत साकीया, राहुल साळवे, आशिष बोडवाडे, द्वारकाधिश ठाकूर, गयाबाई माईंडळ, राजू गाडे, ज्ञानेश्वर शिंदे, दीपक पवार, राहुल जाधव, राजेंद्र माळी, विनोद परदेशी,सागर पवार, शैलेश शिंदे, संग्राम वाणी, राहुल देवरे, विनोद शेटे, मोबिन खान, अर्चना जायकर आणि जायकर परिवार उपस्थित होते.

हेही वाचा :

‘कोणी तरी रक्ताअभावी तडफडून मरतोय, हे महाराष्ट्राला भूषणावह नाही’, जितेंद्र आव्हाड यांचं रक्तदान आवाहन

बैलांच्या जागेवर मुलींना जुंपून शेत नांगरलं, सोनू सूदकडून शेतकऱ्याला घरपोच ट्रॅक्टर

सर्वात मोठ्या सणावर पुराचे संकट; मुस्लीम बांधवांकडून बकरी ईदची कुर्बानी नाही

व्हिडीओ पाहा :

Bank of Baroda employee Suresh Jaykar donate 11 thousand to Covid Centre in Ahmednagar

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.