“मी आतंकवादी, नक्षलवादी नाही, बारसूला जाणारच”; या नेत्याने सरकारला थेट इशारा दिलाय…
शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यानंतर एका दिवसात मदत देऊ असं अश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मात्र अजुन एकाही शेतकऱ्याच्या शेतीचा पंचनामा झाला नाही.
नांदेड: गेल्या काही दिवसांपासून बारसू प्रकल्पावरून राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. सत्ताधारी आणि विरोधक असे युद्ध रंगले असलेले असतानाच आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आता त्यात उडी घेतली आहे. त्यामुळे ग्रामस्थांची बाजू घेऊन त्यांनी सरकारला धारेवर धरले आहे. त्यातच राजू शेट्टी यांना रत्नागिरीली येण्यास बंदीहुकूम घालण्यात आल्याची टीकाही त्यांनी केली आहे. त्यामुळे त्यांनी थेट सरकारला इशारा देत मी काही आतंकवादी किंवा नक्षलवादी नाही, त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी मी तिथे जाणारच असा इशाराही त्यांनी दिला आहे.
माजी खासदार राजू शेट्टी यांनी बोलातना सांगितेल आहे की, रत्नागीरीत जाण्यास मला पण बंदी हुकूम बजवण्यास पोलीस शोधत आहेत, मात्र मी बारसूला जाणारच असा इशाराही त्यांनी दिला आहे.
त्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, रत्नागिरी जिल्ह्यात येण्यास बंदीहुकूम घालण्यासाठी मला देखील पोलीस शोधत आहेत. मात्र मी काही आतंकवादी, नक्षलवादी नाही. मला जेव्हा जायचं तेव्हा मी बारसूला जाणारच आहे. मला कोणताही कायदा अडवू शकत नाहीं अशी प्रतिक्रीयाही त्यांनी यावेळी दिला आहे.
प्रकल्पाला स्थानिक लोकांचा विरोध असेल तर त्यांच्यावर प्रकल्प का लादता असा सवालदेखील राजू शेट्टी यांनी सत्ताधाऱ्यांना केला आहे.
चार दोन परप्रांतीयांनी तिथे जमिनी घेतल्या आहेत. त्यांना चांगला पैसा मिळावा म्हणुन कोकणवासियांना वेठीस धरल जात आहे . तर उद्योगपतींची सुपारी घेऊन प्रकल्प लादला जात असेल तर तसं होऊ देणार नाहीं असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला .
मागील आठ दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी वादळीवाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झाली आहे. त्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यानंतर एका दिवसात मदत देऊ असं अश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मात्र अजुन एकाही शेतकऱ्याच्या शेतीचा पंचनामा झाला नाही.
सरकारकडून नुसती आश्वासन दिली जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी काहीच पडणार नाहीं अशी प्रतिक्रियाही शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी दिली आहे.
असंघटीत मजुरांना संरक्षण देण्यासाठी केंद्राने किमान वेतन कायदा केला त्याच धर्तीवर शेती मालाला हमीभाव देणारा कायदा करावा अशी मागणी शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केली आहे.
तर हमीभाव कायद्यासाठी देशातील अठरा शेतकरी संघटना एकत्र आल्या असून देशभरात याबाबत जनजागृती सुरू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना त्यांचे हक्क समजावून सांगण्यासाठी देशभर हमीभाव परिषदा घेतल्या जात असल्याचंही राजू शेट्टी यांनी सांगितले.