Video| बीडमध्ये आगार प्रशासनाकडून आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न; महिला कर्मचाऱ्यांना आश्रू अनावर
बीडमध्ये गेल्या 32 दिवसांपासून बसस्थानक परिसरामध्ये कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. विनंती करून देखील आंदोलन मागे घेतले जात नसल्याने, अखेर आगार प्रशासनाने हे आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न केला. प्रशासनाच्या या भूमिकेवर कामगारांनी संताप व्यक्त केला आहे.
बीड : आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा गेल्या अनेक दिवसांपासून संप सुरूच आहे. संपावर तोडगा काढण्यासाठी शासनाकडून वेतनवाढीची घोषणा करण्यात आली. या घोषणेनंतर देखील अनेक जिल्ह्यातील एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. विलिनिकरण झाल्याशिवाय संप मागे घेणार नसल्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. बीडमध्ये गेल्या 32 दिवसांपासून बसस्थानक परिसरामध्ये कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. विनंती करून देखील आंदोलन मागे घेतले जात नसल्याने, अखेर आगार प्रशासनाने हे आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न केला. प्रशासनाच्या या भूमिकेवर कामगारांनी संताप व्यक्त केला आहे.
प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी
बीडमध्ये गेल्या 32 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. जोपर्यंत विलिनिकरण होणार नाही, तोपर्यंत संप मागे घेणार नसल्याची भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. दरम्यान आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडून वेतनवाढीची घोषणा करण्यात आली, मात्र तरी देखील कर्मचारी आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. शनिवारी रात्री आगार प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांचे आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. आंदोलनासाठी एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने बीड बसस्थानक परिसरात टाकण्यात आलेला मंडप प्रशासनाने काढून टाकला. या घटनेनंतर कर्मचारी आणखी आक्रमक झाल्याचे पहयाला मिळाले. त्यांनी शासनाचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान आंदोलनाचा मंडप काढून टाकण्यात आल्याने महिला एसटी कर्मचाऱ्यांना आश्रू अनावर झाले.
काय आहेत एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या?
राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनिकरण करावे. एसटी कर्मचाऱ्यांना वर्ग कचा शासकीय दर्ज देण्यात यावा. वेतन वाढीसह वेतन वेळेत मिळावे. महागाई भत्ता आणि घरभाडे भत्त्यात वाढ करावी, अशा विविध मागण्या एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात आल्या आहेत. त्यासाठी गेल्या 32 दिवसांपासून त्यांचे आंदोलन सुरू आहे. दरम्यान या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी पगार वाढीची देखील घोषणा करण्यात आली आहे. मात्र कर्मचारी विलिनिकरणावर ठाम असल्याने अद्यापही संप मागे घेण्यात आला नाही. आजूनही जे कर्मचारी कामावर रुजू झाले नाहीत त्यांच्यावर आता प्रशासनाच्या वतीने कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
संबंधित बातम्या
omicron : जगावर दुहेरी संकट, ओमिक्रोनसोबतच डेल्टाचाही अमेरिका, युरोपात हाहा:कार
Nawab Malik: जो डर गया, वो मर गया; नवाब मलिक यांचा प्रवीण दरेकरांना टोला