VIDEO: कोर्टानं जामीन फेटाळला, पोलिसांनी नितेश राणेंची गाडी अडवली, निलेश- पोलिसात फुल्ल बाचाबाची

भाजप आमदार नितेश राणे यांचा सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने जामीन नाकारला आहे. नितेश राणे यांना जामीन नाकारताच पोलिसांनी त्यांना अडवलं. त्यामुळे भाजप नेते निलेश राणे आणि पोलिसांमध्ये एकच शाब्दिक चकमक उडाली.

VIDEO: कोर्टानं जामीन फेटाळला, पोलिसांनी नितेश राणेंची गाडी अडवली, निलेश- पोलिसात फुल्ल बाचाबाची
कोर्टानं जामीन फेटाळला, पोलिसांनी नितेश राणेंची गाडी अडवली, निलेश- पोलिसात फुल्ल बाचाबाची
Follow us
| Updated on: Feb 01, 2022 | 4:32 PM

सिंधुदुर्ग: भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांचा सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने (Court) जामीन नाकारला आहे. नितेश राणे यांना जामीन नाकारताच पोलिसांनी (police) त्यांना अडवलं. त्यामुळे भाजप नेते निलेश राणे आणि पोलिसांमध्ये एकच शाब्दिक चकमक उडाली. आमची गाडी का अडवली? कोणत्या अधिकारात अडवली? तुमच्याकडे कोणती ऑर्डर आहे का? तुम्ही आम्हाला कायदा शिकवू नका?, आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा कोणताही अवमान केला नाही, अशी प्रश्नांची सरबत्ती करत निलेश राणे यांनी पोलिसांना धारेवर धरले. यावेळी पोलीस आणि निलेश राणे यांच्या शाब्दिक बाचाबाची झाली. त्यामुळे समर्थकांनाही स्फूरण चढले. राणे समर्थकही जोरजोरात घोषणाबाजी करत पोलिसांना नडताना दिसले. त्यामुळे सिंधुदुर्ग कोर्टाबाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने कोर्टाबाहेर पोलिसांची अधिक कुमक मागवण्यात आली होती.

संतोष परब यांच्यावरील हल्ला प्रकरणी आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग न्यायालयात जामीन याचिका दाखल केली होती. या याचिकेवर दोन दिवस सुनावणी झाली. त्यानंतर कोर्टाने आज नितेश राणे यांची याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे नितेश राणे यांना मोठा धक्का बसला आहे. आता राणे हे जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेणार आहेत. दरम्यान, नितेश राणेंची जामीन याचिका फेटाळल्यानंतर ते कोर्टाबाहेर आले. तेव्हा कोर्टाबाहेरून जात असताना पोलिसांनी त्यांची गाडी अडवली. ही बातमी भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांना कळताच निलेश प्रचंड भडकले. निलेश यांनी कोर्टाबाहेरच पोलिसांना फैलावर घेतले. तुम्ही गाडी अडवलीच कशी? असा सवाल करत त्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली. यावेळी कोर्टाबाहेर राणे समर्थक मोठ्या संख्येने जमले होते. तेही चांगलेच आक्रमक झाले होते. राणे समर्थकांनी घोषणाबाजी देत संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. त्यामुळे संपूर्ण परिसरात तणाव निर्माण झाला होता.

नेमक संवाद काय झाला?

दृश्य पहिले: स्थळ कोर्टाबाहेर

निलेश राणे: मला एक सांगा कुणी अटक करायला सांगितली आहे का? अटक करायला सांगितली आहे का? मला फरक पडत नाही तुम्ही कुठूनही येऊ द्या. आता कोर्टाचा कोण अपमान करत आहे ते मला सांगा फक्त. दोन मिनिटापासून नाही दहा मिनिटापासून मी उभा आहे. पोलीस: साहेब, दोन मिनिटं ऐकून घ्या. निलेश राणे: मी सहकार्य करतोय तुम्हाला. कोण आहेत तुमचे वरिष्ठ. फोन लावा. पोलीस: आम्हीही सहकार्य करत आहोत. निलेश राणे: मीही सहकार्य करतोय तुम्हाला. कोणत्या ऑर्डरखाली आमदाराला गाडीत बसवलं ते सांगा. पोलीस: मी स्वत: जातो आणि त्यांना विचारतो. निलेश राणे: कितीवेळा फोन लावायचे आम्ही? किती वेळा फोन लावायचे? राणे समर्थक: आमदार आहेत ते आमदार.. आमदार… निलेश राणे: आम्ही कशासाठी उभे आहोत इथे? आणि कोणत्या अधिकाराखाली चाललं आहे? माझ्यासमोर तुम्ही आलात आणि गेलात. कशासाठी मला थांबवलं आहे ते सांगा ना? कशासाठी थांबवलं? नाही तर गाडी सोडा आमची. राणे समर्थक: गाडी सोडा आमची. गाडी अडवू नका. निलेश राणे: प्रत्येक गोष्टीला सहकार्य करायचं. हे सहकार्य करता का? मग समोर उभे राहू नका

(तेवढ्यात दुसरे पोलीस अधिकारी आले. त्यानंतर निलेश राणे यांचा पारा अधिकच चढला. पुन्हा निलेश यांनी त्या अधिकाऱ्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली.)

निलेश राणे: कशासाठी थांबवलं आम्हाला? दोन मिनिटं… सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरपेक्षा काय महत्त्वाचे आहे? कशासाठी थांबवलं आम्हाला? ( तेवढ्यात कार्यकर्त्यांचा गोंधळ वाढतो) तुमच्याकडे अधिकार नाही तर तुम्ही का थांबवता? ओपन कोर्टात सुनावणी झाली. कायदा मला शिकवू नका. (गाडी सोडा… गाडी सोडा… राणे समर्थकांचा गोंधळ आणखी वाढतो)

दृश्य दुसरे- मीडियासोबत

त्यानंतर नितेश राणे हे निलेश राणे सोबत निघताना दिसतात. त्यावेळी नितेश राणे संतप्त होऊन मनाशीच बोलत असतात. ”उगाचची मस्ती आहे… ”असं निलेश राणे मनाशीच बोलत असतात. त्यानंतर मीडियाचे प्रतिनिधी धावतच निलेश राणेंकडे येतात. त्यांची प्रतिक्रिया विचारतात. पण निलेश राणे हे अत्यंत त्रासलेले आणि वैतागलेले असतात. ते बोलण्यास नकार देतात. “मला काही बोलायचं नाही. आता नाही. नाय… नाय… ऐ धक्का नको मारू… नंतर… नंतर… समजून घ्या प्लीज…,” असं म्हणून निलेश राणे पुढे निघून जातात.

दृश्य तिसरे- वकिलांसोबत

थोड्यावेळाने नितेश राणे यांचे वकील येतात. त्यांच्याशीही निलेश राणे तावातावाने बोलत असतात. पोलिसांना नेमकं काय सांगायचं हे ते वकिलांना समजावत असतात. पण त्यांचा समजावण्याचा सूर यावेळेला वरच्या पट्टीतला असतो. निलेश राणे वकिलांना सांगतात,

निलेश राणे: स्टे देणं म्हणजे कोर्टाचा अवमान नाही. पोलिसांना अधिकार नाही थांबवायचा. कोणताही अधिकार नाही, तुम्हाला जे करायचं ते वर करा. आम्हाला कोणताही मनाई आदेश नाही. आम्ही थांबणार नाही. हे पोलीस कशासाठी पुढेमागे ठेवलेत? (पोलिसांकडे पाहून) पोलिसांना सांगितलं का पहारा द्यायला?

संबंधित बातम्या:

नितेश राणेंना कोर्टाचा मोठा दणका, जामीन अर्ज फेटाळला, पुढे काय?

Nitesh Rane | नितेश यांचा जामीन फेटाळल्यानंतर निलेश आक्रमक; सिंधुदुर्ग कोर्टासमोर हायव्होल्टेज ड्रामा

तेजस्वी प्रकाश लोकांना आवडत नसेल पण मला आवडते : निशांत भट

सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....