द केरला स्टोरी चित्रपट महिला-मुलींना दाखवला मोफत, कर्नाटकसारखा महाराष्ट्राने निर्णय घेण्याची मागणी

हिंदू मुलींचे रक्षण करण्यासाठी जनजागृती व्हावी. या उद्देशातून निर्मात्याने द केरला स्टोरी हा चित्रपट प्रदर्शित केला आहे. या चित्रपटाला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळतो आहे.

द केरला स्टोरी चित्रपट महिला-मुलींना दाखवला मोफत, कर्नाटकसारखा महाराष्ट्राने निर्णय घेण्याची मागणी
Follow us
| Updated on: May 13, 2023 | 5:40 PM

राजीव गिरी, प्रतिनिधी, नांदेड : देशात लव्ह जिहादने हिंदू संस्कृतीला पोखरले आहे. असंख्य हिंदू मुलींचे बळी जात आहेत. असंख्य मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त केले जात आहे. अत्यंत चाणाक्ष बुद्धीचा उपयोग करत धर्मांध मुस्लिमांकडून सुरू असलेला लव्ह जिहाद भारती हिंदू संस्कृतीवर आघात आहे. हा आघात परतवून लावण्यासाठी आणि हिंदू मुलींचे रक्षण करण्यासाठी जनजागृती व्हावी. या उद्देशातून निर्मात्याने द केरला स्टोरी हा चित्रपट प्रदर्शित केला आहे. या चित्रपटाला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळतो आहे. कर्नाटक सरकारने हा चित्रपट करमुक्त केला आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारनेही द केरला स्टोरी हा चित्रपट करमुक्त करावा. अशी मागणी भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रणिताताई देवरे-चिखलीकर यांनी केली आहे.

जनजागृती करणे गरजेचे

लव्ह जिहादसारख्या घातकी प्रकाराला आळा घालण्यासाठी हिंदू धर्मात जनजागृती करणे गरजेचे आहे. द केरला स्टोरी हा चित्रपट राज्य सरकारने करमुक्त करावा. अशी मागणी प्रणिताताई देवरे-चिखलीकर यांनी आज केली.

हे सुद्धा वाचा

मोफत दाखवला द केरला स्टोरी

धर्मभूषण दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून नांदेड येथे आज लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रल आणि अमरनाथ यात्री संघ नांदेडच्या वतीने द केरला स्टोरी हा चित्रपट महिला आणि मुलींसाठी मोफत दाखविण्यात आला. या शोच्या उद्घाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या.

the kerala story 2

यावेळी धर्मभूषण अॅडव्होकेट दिलीप ठाकूर यांच्यासह शितलताई भालके, महिला मोर्चा महानगर अध्यक्ष वैशाली मिलिंद देशमुख, महादेवी मठपती, अपर्णा चितळे, सुरेश लोट, अरुण काबरा, राजेश ठाकूर, भंडारी यांच्यासह महिला आणि युती मोठ्याप्रमाणे उपस्थित होत्या.

चित्रपटाला विरोध करणाऱ्यांचा घेतला समाचार

द केरला स्टोरी या चित्रपटाला विरोध करणाऱ्या विरोधकांचाही प्रणिताताई देवरे यांनी यावेळी समाचार घेतला. भारतीय संस्कृतीचे विरोधक हेच द केरला स्टोरी या चित्रपटाला विरोध करत आहेत. ज्यांना अजूनही तुघलकी आणि मोगली सत्ता हवी आहे, अशा सत्तापिपासूंकडून हिंदू संस्कृतीचा अवमान आणि अपमान केला जात आहे.

त्यामुळे अशा नतदृष्ट्यांना आणि धर्मविरोधकांना हा समाज आणि ही संस्कृती कधी माफ करणार नाही, असा इशाराही प्रणिताताई देवरे-चिखलीकर यांनी यावेळी दिला.

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.