“महाराष्ट्रात फक्त छत्रपती शिवराज पॅटर्न चालतो”; देवेंद्र फडणवीस यांनी थेट भावनेलाच हात घातला…
देशात नरेंद्र मोदी यांची सत्ता आल्यानंतर येथील शेतकरी, कष्टकरी, जनसामान्य माणसांचे जीवन उंचावण्याचे काम मोदी सरकारन केले आहे असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
नांदेड : देशाचे गृहमंत्री अमित शाह यांची नांदेडमध्ये सभा होत असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे आमदार अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली. याचवेळी त्यांनी महाविकास आघाडीवरही जोरदार घणाघात घातला.यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदरा हल्लाबोल केला आहे. निवडून येणार नाहीत म्हणून भाजपला सभा घ्यावी लागते अशी टीका अशोक चव्हाण यांनी भाजपवर केली होती, त्यावरूनच त्यांनी विरोधकांवर जोरदार सडकून टीका केली आहे. अशोक चव्हाण आणि विरोधकांवर टीका करताना ते म्हणाले की, आमच्याकडे सांगण्यासारखे काम आहे, म्हणून आम्ही सभा घेत आहे असे ठणकावूनही त्यांनी सांगितले.
आम्ही ही सभा का घेतो आहे हे जर विरोधकांना पाहायचे असेल तर त्यांनी नांदेडमधील सभा त्यांनी पाहावी या शब्दात त्यांनी विरोधकांना आणि अशोक चव्हाण यांना टोला लगावला आहे. काँग्रेस पक्षाचा विजय झाला की, तो विजय त्यांच्या डोक्यात जातो.
सध्या त्यांना कर्नाटकात विजय मिळाला त्यामुळे काँग्रेसकडून आता राज्यात आम्ही कर्नाटक पॅटर्न आणणार असल्याचा विश्वास त्यांना वाटतो आहे. मात्र महाराष्ट्रात इतर कोणताही पॅटर्न चालत नाही तर राज्यात फक्त छत्रपती शिवराय पॅटर्न चालतो असा जोरदार टोला त्यांनी काँग्रेसला लगावला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे महाराष्ट्रात 2014 मध्ये विजय मिळाला, त्यानंतर 2019 मध्ये आणि आता 2024 मध्येही आता महाविजय होणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी त्यांनी सांगितले की, निवडणूका जवळ आल्या की, शरद पवार यांच्याकडून वारंवार वक्तव्य केले जाते की, नरेंद्र मोदी यांची लाट ओसरली आहे. तसेच देशात विरोधकांची हवा चालू आहे, मात्र शरद पवार यांचे एकही वक्तव्य खरे ठरले नाही असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला आहे.
देशात नरेंद्र मोदी यांची सत्ता आल्यानंतर येथील शेतकरी, कष्टकरी, जनसामान्य माणसांचे जीवन उंचावण्याचे काम मोदी सरकारन केले आहे असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.