Nitesh Rane: नितेश राणेंचा रक्तदाब वाढला, ओरोसमधून कोल्हापूरला नेणार; कुणालाही भेटण्यास मनाई

| Updated on: Feb 05, 2022 | 4:07 PM

सिंधुदुर्ग न्यायालयाने भाजप नेते नितेश राणे यांना 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर नितेश राणे यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना तातडीने ओरोस येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Nitesh Rane: नितेश राणेंचा रक्तदाब वाढला, ओरोसमधून कोल्हापूरला नेणार; कुणालाही भेटण्यास मनाई
नितेश राणे
Follow us on

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग न्यायालयाने भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांना 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावली आहे. त्यानंतर नितेश राणे यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना तातडीने ओरोस येथील रुग्णालयात (oros district hospital)दाखल करण्यात आले होते. मात्र, काल रात्री नितेश राणे यांचा अचानक रक्तदाब वाढला आणि त्यांना छातीत दुखू लागल्याने ओरोस रुग्णालयातून कोल्हापूरला नेण्यात येणार आहे. ओरोस रुग्णालयात कार्डियाक रुग्णवाहिका नाही. तसेच हृदयरोग तज्ज्ञ नसल्याने नितेश यांना कोल्हापूरला नेले जात आहे. ओरोस रुग्णालयात उपचार सुरू असतानाही त्यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांना कोल्हापूरला नेण्यात येत आहे. तर, राणे यांच्या आजारावर शिवसेनेने टीका केली होती. राणे खरोखरच आजारी आहेत की हा राजकीय आजार आहे? असा सवाल शिवसेनेने केला होता.

नितेश राणे यांची दोन दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर काल त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं. यावेळी दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद झाला. त्यानंतर कोर्टाने नितेश राणे यांना 18 फेब्रुवारपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यावेळी नितेश यांच्या वकिलांनी नितेश यांची प्रकृती ठिक नसल्याचं सांगितलं होतं. नितेश राणे यांच्या विनंती नंतर त्यांना सावंतवाडी तुरुंगात नेण्याऐवजी ओरोस जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर उपचारही सुरू करण्यात आले होते. मात्र, त्यांचा रक्तदाब वाढला आणि छातीतही दुखू लागल्याचं त्यांनी सांगितलं. रुग्णालयात कार्डियाक यंत्रणा आणि हृदयरोग तज्ज्ञ नसल्याने त्यांना कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात नेण्यात येत आहे. त्यांना 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून कोल्हापूरला नेण्यात येत आहे. तसेच नितेश यांना भेटण्यास कुणालाही परवानगी दिली जात नाही.

खटला वर्ग करण्यासाठी अर्ज

दरम्यान, नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सत्र न्यायालयात सुनावणी सुरू आहे. दोन्ही बाजूचे वकील यावेळी जोरदार युक्तिवाद करत आहेत. यावेळी सरकारी वकील अॅड. प्रदीप घरत यांनी हा खटला दुसऱ्या न्यायालयात वर्ग करण्याची मागणी केली आहे. त्यावर नितेश राणे यांचे वकील सतीश मानेशिंदे यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. घरत यांना खटला वर्ग कण्याचा अधिकार नाही. कोर्टात बदमाशी सुरू आहे, असा दावा सतीश माने शिंदे यांनी केला. तर मी विशेष सरकारी वकील आहे. मी खटला वर्ग करण्यासाठी अर्ज करू शकतो, असा दावा घरत यांनी केला आहे. मेरिट ग्राऊंड वर विशेष सरकारी वकिलांचा अर्ज बरखास्त करा. रजिस्टर झालेला नंबर पडलेला अर्ज आपल्याकडे आलेला नाही. त्यामुळे तुमचा अर्ज अधिकृत नाही. त्यामुळे तो तातडीने फेकून द्या, असं मानेशिंदे म्हणाले. दरम्यान, या दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर अर्जातील त्रुटी दूर करण्यासाठी न्यायालयाने घरत यांना 15 मिनिटे दिली आहेत. त्यामुळे घरत नव्याने अर्ज सादर करणार आहे.

संबंधित बातम्या:

नितेश राणे प्रकृती बिघडली? रुग्णालयात ठेवलं जाण्याची शक्यता; तर प्रकृती अस्वास्थ्यावरुन वैभव नाईकांचा जोरदार टोला

Nashik | नाशिकमध्ये नाले गेले चोरीला, नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर, प्रकरणाचे गुपित काय?

Tadoba Tiger | कोंडेगावात अवतरले वाघोबा; ग्रामस्थांनीच बदलला मार्ग, जंगलाबाहेर येण्याचे कारण काय?