“विखे कुटुंबीय ज्या पक्षात जातात, त्या पक्षाच्या विरोधात काम करतात”; भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर…

राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीका करताना राम शिंदे यांनी म्हटले आहे की, भाजप पक्षाने त्यांना आमदार, खासदार, मंत्री, महसूल मंत्री केलं मग त्यांना अजून काय पाहिजे असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

विखे कुटुंबीय ज्या पक्षात जातात, त्या पक्षाच्या विरोधात काम करतात;  भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर...
Follow us
| Updated on: May 16, 2023 | 7:46 PM

अहमदनगर : बाजार समितीच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. राज्यात एकमेकांविरोधात असणारे राजकीय पक्ष बाजार समितीच्या निवडणुकीत मात्र गळ्यात गळे घालून निवडणूक लढत आहेत. मात्र आता पक्षा-पक्षातील वाद चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. त्यामुळे आता राज्यातील राजकारणातील युती-आघाडीविषयी आता नेमकं काय होणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. सध्याच्या राजकारणात अहमदनगरमधील बाजार समितीची निवडणुकीचीही जोरदार चर्चा सुरु आहे.

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बाजार समितीच्या निवडणुकीत वेगळी खेळी खेळल्याचा आरोप केला गेल्याने आता नगर जिल्ह्यातील शिंदे आणि विखे पाटील वाद पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

अहमदनगर बाजार समितीच्या सभापती निवडणुकीनंतर भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याने त्याची आता जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

आमदार राम शिंदे आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार टीका केल्याने हा वाद आणखी उफाळून येणार असल्याचे दिसून येत आहे.

भाजपमुळे राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे चिरंजीव आमदार, खासदार आणि विखे पाटील मंत्री झाल्याचे सांग त्यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे.

विखे पाटील पिता पुत्रांवर गंभीर आरोप केले गेल्याने त्यावर आता विखे पाटील त्यावर काय प्रतिक्रिया देणार याकडेही साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

सभापती निवडीवरून विखेंनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना छुपा पाठिंबा दिला असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

त्यामुळे हा वाद आणखी चिघळणार असल्याचे दिसून येत आहे. राम शिंदे यांनी त्यांच्या आमदाराकी पासून ते अगदी त्यांच्या मंत्रीपदापर्यंत उल्लेख करून त्यांना हे फक्त भाजपमुळे मिळाले आहे असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे. तरीही त्यांनी बाजार समितीच्या राजकारणात भाजपविरोधी राजकारण केल्याचा त्यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

तसेच विखे कुटुंबीय ज्या पक्षात जातात त्या पक्षाच्या विरोधात ते काम करत असतात असा आरोपही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीका करताना राम शिंदे यांनी म्हटले आहे की, भाजप पक्षाने त्यांना आमदार, खासदार, मंत्री, महसूल मंत्री केलं मग त्यांना अजून काय पाहिजे असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

त्यामुळे आता सभापती निवडीबाबत पक्षाच्या विरोधात काम केल्याने पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार असल्याचेही राम शिंदे यांनी म्हटले आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.