‘आज काळीज फाटलं, त्यानं आकाश गाठलं’; आमदार विजय रहांगडाले यांची मुलगा अविष्कारसाठी भावनिक पोस्ट

तुझी आई वाट पाहत असून तू परत येणार नाही हे तिला कसं समजावून सांगू, कुठं हरवलास पाखऱा परत येरे आमच्या लेकरा, अशी भावनिक पोस्ट विजय रहांगडाले यांनी केली आहे.

'आज काळीज फाटलं, त्यानं आकाश गाठलं'; आमदार विजय रहांगडाले यांची मुलगा अविष्कारसाठी भावनिक पोस्ट
आमदार विजय रहांगडाले यांची फेसबुक पोस्ट (Source: Facebook )
Follow us
| Updated on: Jan 27, 2022 | 8:06 AM

वर्धा : गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय रहांगडाले (Vijay Rahangdale) यांचा मुलगा अविष्कार रहागंडाले (Avishkar Rahangdale) याचा मंगळवारी मध्यरात्री वर्धा जिल्ह्यात (Wardha) झालेल्या अपघातात मृत्यू झाला होता. वर्धा जिल्ह्याच्या देवळी तालुक्यातील सेलसुरा गावातील नदीच्या पुलावरुन चारचाकी खाली कोसळल्यानं अविष्कार याच्यासह इतर सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. अविष्कार याच्यावर गोंदिया जिल्ह्यातील त्यांच्या खमारी गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. आमदार विजय रहांगडाले यांनी मुलगा अविष्कार याच्या आठवणीत एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. मुलाच्या निधनानंतर आमदार विजय रहांगडाले यांनी फेसबुकवर कविता शेयर करत आपलं दुःख व्यक्त केलंय. अविष्कार हा आमदार विजय रहांगडाले यांचा एकुलता मुलगा होता, या घटनेनंतर या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रहांगडाले यांनी सोशल मीडियावर मुलाला आज काळीज फाटलं, त्यानं आकाश गाठलं या कवितेच्या माध्यमातून श्रद्धांजली दिली आहे.

अविष्कार हा एकुलता एक मुलगा

वर्धा जिल्ह्यातील सेलसुरा येथे झालेल्या अपघातात सात वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा अपघातात निधन झाले होते. यात तिरोडा – गोरेगाव मतदारसंघातील भाजपा आमदार विजय रहांगडाले यांचा मुलगा अविष्कार याचे सुद्धा निधन झाले होते.मंगळवारी अविष्कारवर गोंदिया जिल्ह्याच्या खमारी या मुळगावात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.मुलाच्या निधनानंतर आमदार विजय रहांगडाले यांनी फेसबुकवर कविता शेयर करत आपलं दुःख व्यक्त केलंय. सोशल मीडियावर मुलाला आज काळीज फाटलं, त्यानं आकाश गाठलं या कवितेच्या माध्यमातून श्रद्धांजली दिलीय.

विजय रहांगडाले यांची फेसबुक पोस्ट

विजय रहांगडाले यांनी मुलगा अविष्कार याच्या आठवणीत केलेली फेसबुक पोस्ट

आज काळीज फाटलं, त्यानं आकाश गाठलं;

अविष्कार आमचा हिरा, होता आनंदाचा झरा;

डॉक्टर नव्हते खमारी गावात, होती खंत आणि हुरहूर आमच्या मनात;

बापाचे स्वप्न पूर्ण करण्या, गेला होता अविष्कार डॉक्टर बनण्या;

लागली कुणाची नजर, आज दगडालाही फुटली पाझर;

गेला तरुण वयात सोडून, केलेले सारे वादे तोडून;

तुझी आई आजही वाट पाही, तिला तुझ्या डॉक्टर बनण्याची घाई;

कसे समझवू तिला, तू परत येणार नाहीस मुला;

कुठे हरवलास पाखरा, परत ये रे आमच्या लेकरा;

गेलास अविष्कार आम्हाला सोडून, तुझ्यासाठी रंगविलेले सारे स्वप्न मोडून

आज आहे मातम सगळीकडे, आई बाबा संगे सारा गाव ही रडे.

विजय रहांगडाले यांनी फेसबुक पोस्टमध्ये अविष्कार याच्याविषयी भावना व्यक्त केल्या. खमारी गावात कोणी डॉक्टर नव्हतं ही हुरहूर असल्यानं माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी डॉक्टर होण्यासाठी गेलेल्या मुलाला कुणाची तरी नजर लागली. तुझी आई वाट पाहत असून तू परत येणार नाही हे तिला कसं समजावून सांगू, कुठं हरवलास पाखऱा परत येरे आमच्या लेकरा अशी भावनिक पोस्ट विजय रहांगडाले यांनी केली आहे.

इतर बातम्या:

Photo | कार थेट तब्बल 40 फूट खोल कोसळली, गाडीतलं कुणीच वाचलं नाही, सातही जणांचा जागीच मृत्यू!

आमदाराच्या मुलासह वर्धा अपघातात दगावलेले इतर 6 जण कोण? सर्वांची ओळख पटली! नावंही समोर

BJP MLA Vijay Rahangdale wrote emotional Facebook post in memory of son Avishkar Rahangdale

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.