सांगलीत भाजपचं पालकमंत्री हटाव आंदोलन; उद्धव ठाकरेंनी पालकमंत्री पद स्वीकारण्याची मागणी
सांगली जिल्ह्यात पूरग्रस्तांना भरीव अशी मदत दिली गेली नाही. तसेच कोरोनामध्ये ही पालकमंत्री फेल ठरले आहेत. यासाठी पालकमंत्री जयंत पाटील यांच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आल्याचं भाजप नेते पृथ्वीराज पवार यांनी सांगितलं आहे.
सागंली: भाजप तर्फे आज सांगलीच्या टिळक चौकात पालकमंत्री हटाव आंदोलन करण्यात आले. सांगली जिल्ह्यात पूरग्रस्तांना भरीव अशी मदत दिली गेली नाही. तसेच कोरोनामध्ये ही पालकमंत्री फेल ठरले आहेत. यासाठी पालकमंत्री जयंत पाटील यांच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आल्याचं भाजप नेते पृथ्वीराज पवार यांनी सांगितलं आहे. आंदोलनाला प्रतिसाद मिळाला नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. गोकूळ दूध संघ आणि कृष्णा साखर कारखान्याच्या निवडणुकीमुंळं सांगलीत कोरोना वाढला.
पालकमंत्रीपद मुख्यमंत्र्यांनी स्वीकारावं
जलसंपदा विभागानं धरणातील पाण्याचं योग्य नियोजन न केल्यानं सांगली जिल्ह्याला पुराचा फटका बसला आहे. मुख्यमंत्र्यांनी या कारणामुळं जयंत पाटील यांना पालकमंत्री पदावरुन हटवावं, असं पृथ्वीराज पवार म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सागंलीचं पालकमंत्री पद स्वीकारावं, असं देखील ते म्हणाले. सागंली जिल्ह्यात कृष्णा कारखाना निवडणुकीमुळे वाळवा आणि खानापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यात लॉकडाऊन लागवण्यात आल्यानं व्यापारी, छोटे उद्योजक यांचं मोठ नुकसान झाल्याचं पृथ्वीराज पवार यांनी म्हटलं आहे.
जंयत पाटील फेल ठरल्याचा आरोप
सांगली जिल्ह्यात पाण्याचं योग्य नियोजन अभावी पूर आला. अनेकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.. छोटे मोठे व्यापारी, शेतकरी, नागरिक यांचे नुकसान झाले. पण या पूरग्रस्तांना भरीव अशी मदत महाविकास आघाडी कडून दिली गेली नाही. तसेच सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या वाढली गेली. या मध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील हे फेल ठरले आहेत. याचा निषेध करत आज भाजप ने पालकमंत्री जयंत पाटील यांच्या विरोधात आंदोलन केले.
पृथ्वीराज पवार यांनी कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्प राबवावा, दुष्काळी भागाला सायपन पद्धतीनं पाणी द्यावं, अशी मागणी केली. तर, कोल्हापूर, सागंली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्याला जयंत पाटील न्याय देऊ शकत नाहीत त्यामुळे त्यांना मुख्यमंत्र्यांनी हटवावं, अशी मागणी करत असल्यांच पवार यांनी सांगितलं. महाराष्ट्र शासनानं आंदोलनाला योग्य प्रतिसाद दिला नाही तर भविष्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पृथ्वीराज पवार यांनी दिला आहे.
इतर बातम्या:
‘भाजप-सेनेच्या भांडणात काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन कोल्हे मजा बघत आहेत’, सदाभाऊंचा जोरदार टोला
BJP Protest against Jayant Patil demanded Uddhav Thackeray should remove from Guardian Minister of Sangli