प्रीतम मुंडेंना मंत्रिपद नाही म्हणून राजीनामे देणारे कार्यकर्ते भाजप निष्ठावान नाहीत : गणेश हाके
भाजप प्रवक्ते गणेश हाके यांनी प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न दिल्यानं राजीनामे देणारे भाजपचे एकनिष्ठ नसल्याचा आरोप केलाय. त्यामुळे हा वाद आणखीच पेटणार असल्याचं दिसतंय.
सांगली : भाजप खासदार प्रीतम मुंडे यांना मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात जागा न मिळाल्यानं मुंडे समर्थक चांगलेच नाराज असल्याचं स्पष्ट झालंय. बीडमध्ये अनेक मुंडे समर्थकांनी भाजपच्या पदाचा राजीनामा देत आपली उघड नाराजी व्यक्त केलीय. यानंतर कुठलीही नाराजी नसल्याचा दावा करणाऱ्या भाजप नेत्यांनी आता या राजीनामा देणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर टीका करण्यास सुरुवात केलीय. भाजप प्रवक्ते गणेश हाके यांनी प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न दिल्यानं राजीनामे देणारे भाजपचे एकनिष्ठ नसल्याचा आरोप केलाय. त्यामुळे हा वाद आणखीच पेटणार असल्याचं दिसतंय (BJP spokesperson Ganesh Hake criticize Munde supporter who resign in Beed).
भाजप नेते गणेश हाके म्हणाले, “केंद्रीय मंत्रिमंडळाची जी पुनर्रचना झालीय त्यात प्रीतम मुंडे यांचा समावेश झाला नाही. त्यानंतर पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांच्या समर्थक भाजप पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिल्याचं मी ऐकलंय. परंतु हे अत्यंत चुकीचं आहे. पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी (9 जुलै) दिलेल्या मुलाखतीत सांगितलंय की प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि अंतिमतः आपण असतो. हीच भारतीय जनता पक्षाची विचारसरणी आहे.”
“व्यक्तीला महत्त्व न देता पक्षाला महत्त्व द्यायला हवा, राजीनामे देणारे निष्ठावान नाहीत”
“भाजपचे जे पक्षांतर्गत निर्णय होतात ते पक्षाच्या हिताच्या दृष्टीकोनातून होतात. त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळात ज्या मंत्र्यांचा समावेश झालाय तो पक्षाच्या हिताच्या दृष्टीकोनातून झालाय. अशावेळी व्यक्तीला महत्त्व न देता पक्षाला महत्त्व द्यायला हवा. पक्षाने घेतलेला निर्णय योग्य आणि पक्ष हिताचा आहे असंच भाजपचे निष्ठावान समजतात. त्यामुळे राजीनामे देणार पदाधिकारी भाजपचे निष्ठावान नाहीत असं मला वाटतं. केवळ प्रीतम मुंडे यांना पद दिलं नाही म्हणून राजीनामे देणं योग्य नाही,” असं गणेश हाके यांनी सांगितलं.
हेही वाचा :
मोठी बातमी ! पंकजा मुंडेंच्या समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी, बीडमध्ये भाजपच्या सर्वच 11 तालुकाध्यक्षांचे राजीनामे
मी आणि कराडांना गोपीनाथ मुंडेंनीच घडवलं, पंकजा यांनी मांडलेली भूमिका हीच भाजपची भूमिका: फडणवीस
पंकजा मुंडेंनी ते ट्विट का केलं? नाराजीच्या बातम्या फेटाळल्या, पंकजा मुंडेची संपूर्ण पत्रकार परिषद
व्हिडीओ पाहा :
BJP spokesperson Ganesh Hake criticize Munde supporter who resign in Beed