Breaking News | नंदुरबारमध्ये तोरणमाळ-सिंदिदिगर रस्त्यावर भीषण अपघात, बोलेरो गाडी दरीत कोसळल्यामुळे 8 जणांचा मृत्यू

तोरणमाळ-सिंदिदिगर रस्त्यावर प्रवासी वाहतूक करणारी बोलेरो गाडी दरीत कोसळून भिषण अपघात झाला आहे. या अपघातात तब्बल 8 जणांचा मृत्यू झाला.

Breaking News | नंदुरबारमध्ये तोरणमाळ-सिंदिदिगर रस्त्यावर भीषण अपघात, बोलेरो गाडी दरीत कोसळल्यामुळे 8 जणांचा मृत्यू
NANADURBAR ACCIDENT
Follow us
| Updated on: Jul 18, 2021 | 8:00 PM

नंदुरबार : तोरणमाळ-सिंदिदिगर रस्त्यावर प्रवासी वाहतूक करणारी बोलेरो गाडी दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तब्बल 8 जणांचा मृत्यू झाला असून हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. बोलेरो गाडी खोल दरीत कोसळल्यामुळे बचाव आणि मदत कार्याला मोठा अडथळा येत आहे. या भागात कोणत्याही मोबाईलला नेटवर्क नसल्यामुळे बचावकार्यासाठी संवादेखील होत नाहीये. सध्या स्थानिकांनी मदतकार्यासाठी घटानस्थळी धाव घेतली आहे. (Bolero vehicle carrying passengers crashed into ravine in Toranmal Sindidigar road inNandurbar district Eight people killed in accident)

आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी

मिळालेल्या माहितीनुसार नंदूरबार येथील तोरणमाळ-सिंदिदिगर या अतिदुर्गम भागात एका बोलेरो गाडीचा भीषण अपघात झाला. प्रवासादरम्यान ही गाडी एका दरीत कोसळली आहे. यामध्ये आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी करण्यात आली आहे. तर मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

पोलील अधिकक्षकांसह पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी रवाना

अपघात झाल्याचे समजताच घटनास्थळी नागरिकांनी धाव घेतली आहे. या अपघातामध्ये जखमी झालेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांनी बाचावकार्य सुरु केले आहे. तसेच स्थानिक पोलीस प्रशासनसुद्धा घटनास्थळी पोहोचले असून पोलिसांकडूनसुद्धा बचावकार्य केले जात आहे. ही घटना घडल्याचे समजताच पोलील अधिकक्षकांसह पोलिसांचा आणखी फौजफाटा घटनास्थळी रवाना झाला आहे. मात्र, हा भाग अतिदुर्गम असल्यामुळे येथे मोबाईलला नेटवर्क नाही. परिणामी बचावकार्य करण्यास मोठ्या अडचणी येत आहेत.

इतर बातम्या :

जगावेगळी चोरी! तलावातून चोरले तब्बल 5 लाखांचे मासे, चौघांविरोधात तक्रार, पोलीसही चक्रावले

मुंबईपाठोपाठ नवी मुंबईतही पावसाचा कहर, 12 तासात 200.88 मिमी पाऊस

तुमच्या गाडीत 100% शुद्ध पेट्रोल टाकलं जात नाही, ‘या’ गोष्टीची भेसळ! नेमकं नुकसान काय?

(Bolero vehicle carrying passengers crashed into ravine in Toranmal-Sindidigar road Eight people killed in accident)

(Bolero vehicle carrying passengers crashed into ravine in Toranmal-Sindidigar road inNandurbar district Eight people killed in accident)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.