बुलडाण्यात कोरोना रुग्ण संख्या वाढू लागली, नागरिकांनी नियमांचं पालन करणं गरजेचं, जिल्हा हॉटस्पॉट ठरण्याची भीती

राज्यात सर्वत्र कोरोना रुग्णासंख्या कमी होताना दिसतेय , मात्र बुलडाणा जिल्ह्यात आजही कोरोना संख्या कमी झाली नाही. आजचा विचार केला तर आज पुन्हा जिल्ह्यात 35 रुग्ण कोरोनाबधित आढळलेत.

बुलडाण्यात कोरोना रुग्ण संख्या वाढू लागली, नागरिकांनी नियमांचं पालन करणं गरजेचं, जिल्हा हॉटस्पॉट ठरण्याची भीती
corona
Follow us
| Updated on: Jul 11, 2021 | 5:25 PM

बुलडाणा: राज्यात सर्वत्र कोरोना रुग्णासंख्या कमी होताना दिसतेय  मात्र बुलडाणा जिल्ह्यात आजही कोरोना संख्या कमी झाली नाही. आजचा विचार केला तर आज पुन्हा जिल्ह्यात 35 रुग्ण कोरोनाबधित आढळलेत. त्यामुळे जिल्हा भविष्यात अजूनही हॉटस्पॉट होण्याची शक्यता आहे. (Buldana Corona update corona cases increased from last five days restrictions may be imposed)

कोरोना रुग्ण वाढण्याची भीती

महाराष्ट्रात कोरोना रुग्णाची संख्या कमी झाल्याने लॉकडाऊन उठवण्यात आले आहे. बुलडाणा जिल्ह्यात ही निर्बंध उठवले गेलेत. अनलॉक नंतर इतर जिल्ह्यातील रुग्णासंख्या कमी होताना दिसतेय, मात्र बुलडाणा जिल्ह्यात रुग्णसंख्या दोन आकडी जरी असली तरी दररोज आकडेकरी पाहता ही रुग्णासंख्या भविषयत वाढू शकते. आणि जिल्हा पुन्हा हॉटस्पॉट होऊ शकतो. सध्या जिल्हा पहिल्या स्टेप मध्ये आहे.. त्यामुळे जिल्ह्यात फारसे निर्बंध नाहीत, अत्यावश्यक सेवेला 24 तास मुभा असून सर्वच दुकानांना आपली दुकाने आता 4 वाजेपर्यंत उघडी ठेवण्याची मुभा जिल्हा प्रशासनाने दिलीय.. त्यामुळे बाजारात होणारी गर्दी , कोरोना नियमाचे उल्लंघन करणे , आठवडी बाजारात मास्क न वापरणे यामुळे रुग्णासंख्या वाढतच आहे.

बुलडाणा कोरोनामुक्त कधी होणार?

बुलडाणा जिल्ह्यात आज 35 रुग्ण आढळले असून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या 87116 आढळली. तर, 86359 रुग्णांना उपचारानंतर सुटी देण्यात आलीय. जिल्ह्यात आतापर्यंत 665 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला असून जिल्ह्यात सध्या 92 अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. रुग्णासंख्या कमी करण्यासाठी आरोग्य विभाग दररोज 2 हजाराच्या वर स्वॅबची तपासणी करतेय. विविध उपपययोजना करत असताना जनजागृती सुद्धा करतेय, मात्र जिल्हा प्रशासनाला रुगणसंख्या शून्य करण्यार अद्यापही यश आले नाही.

पाच दिवसांपासून रुग्णसंख्येत वाढ

मागील 5 दिवसांची रुग्णासंख्या जरी बघितली तर त्यामध्ये 10 जुलै रोजी 77 रुग्ण आढळले, 9 जुलै रोजी 22 रुग्ण, 8 जुलै रोजी 8 रुग्ण , 7 जुलैरोजी 118 रुग्ण आढळले आहेत. 6 जुलैला 13 रुग्ण आणि 5 जुलैला 45 रुग्ण बाधित आढळले आहेत.या सगळ्या आकडेवारी चा विचार केला तर रुग्णासंख्या वाढते आहे. त्यामुळे जिल्ह्यातील निर्बंध कडक होण्याची शक्यता नाकारता येत नाही

संबंधित बातम्या

यवतमाळकरांना मोठा दिलासा, जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या एक अंकावर

कृष्णाच्या निवडणुकीचा वाळव्यातील प्रचार, नागरिकांची बेपर्वाई, सांगली पुन्हा चौथ्या स्तरात

(Buldana Corona update corona cases increased from last five days restrictions may be imposed)

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.