लोणारचा राजू केंद्रे लंडनला जाणार, प्रसिद्ध शिवेनिंग शिष्यवृत्तीसाठी निवड; बुलडाण्याचं नाव सातासमुद्रापार

लोणार सरोवराच्या भूमीतून लंडनच्या विद्यापीठात शिवेनिंग शिष्यसवृत्ती साठी निवड होण्याची संधी पिंप्री खंदारे येथील राजू केंद्रे या 23 वर्षीय तरुणाला मिळाली आहे. (Raju Kendre)

लोणारचा राजू केंद्रे लंडनला जाणार, प्रसिद्ध शिवेनिंग शिष्यवृत्तीसाठी निवड; बुलडाण्याचं नाव सातासमुद्रापार
राजू केंद्रे
Follow us
| Updated on: Jul 04, 2021 | 3:22 PM

बुलडाणा: शिक्षणाचा गंधही नसलेल्या गावाचा उंबरठा ओलांडत मजल दर मजल करत , संकटावर मात करत लोणार सरोवराच्या भूमीतून लंडनच्या विद्यापीठात शिवेनिंग शिष्यसवृत्ती साठी निवड होण्याची संधी पिंप्री खंदारे येथील राजू केंद्रे या 23 वर्षीय तरुणाला मिळाली आहे. आपण नेहमीच म्हणतो की प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे असतो त्याच्या संघर्षाचा इतिहास असतो. असाच काहीसा प्रवास राजू जिजाबाई आत्माराम केंद्रे या तरुणाचा आहे. लंडनची शिवेनिंग शिष्यवृत्ती ही अत्यंत मानाची स्कॉलरशिप मानली जाते. आणि या स्कॉलरशिप साठी राजू केंद्रे याची निवड झालीय. त्यासाठी 160 देशांतील 63 हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. (Buldana Lonar Pimpri Khandare Raju Kendre going to London for further study in Well known institute in England)

देशासह समाजात बदल घडवू पाहणाऱ्या तरुणांना इंग्लंडमध्ये उच्चं शिक्षण घेण्यासाठी जवळपास 45 लाख रुपयांची स्कॉलरशिप मिळते.. राजूला जगातील 18 नामांकित विद्यापीठाने आपल्या विद्यापीठात प्रवेश घेणयासाठी आमंत्रित केले असून , लोणार तालुक्यातील पिंप्री खंदारे ते लंडन हा शैक्षणिक प्रवासाचा टप्पा राजूनं गाठलाय. यामुळे विदर्भातील मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्याची नव्हे तर महाराष्ट्र आणि देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय.

नामांकित शिक्षण संस्थांतून शिक्षण

राजू केंद्रे चा जीवन प्रवास ही थक्क करणारा असून अवघ्या हजार बाराशे लोकसंख्या असलेल्या गावात राजू राहतोय. राजूने शिक्षण टाटा सामाजिक विज्ञान संस्थेसारख्या नामांकित संस्थेत ग्रामीण विकास विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेय. मेळघाट सारख्या दुर्गम भागात तळमळीने काम करणारा राजू आता मात्र नव्या वळणावर प्रवासाला सुरुवात करतोय. तो जगातील टॉप 100 विद्यापीठातील इंग्लंडच्या विद्यापीठात शिक्षाणासाठी निघालाय. पद्व्यूत्तर शिक्षण झाल्यावर राजुला महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री फेलोशिप सुद्धा मिळालीय. समाजकार्य महाविद्यालयात प्राध्यापक म्ह्णून काम करत असताना नेट सेट सारख्या परीक्षा ही पहिल्याच झटक्यात उत्तीर्ण केल्या. तर या तरुणाने आय – पॅक सारख्या राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या संस्थेसोबत ही काम केलेय.

राजूच्या निवडीचा आई वडिलांना आनंद

राजूच्या घरची परिस्थिती तशी जेमतेम आहे.आई – वडील शेतकरी असून त्यांचं राहणीमान अगदी साधं आहे. मात्र, आपल्या दोन्ही मुलांवर चांगले संस्कार या शेतकरी दाम्पत्यांनी केलेत. राजूचा मोठा भाऊ सुद्धा सिक्युरिटी संस्थेत नोकरीला आहे. तर, आता राजूला सुद्धा शिकवायचे आणि त्याला त्याच्या पाययावर उभे करायचे म्हणून आई वडिलांनी शेतीत काबाड कष्ट करून राजुला शिकविले. त्यामुळे राजू आज छोट्याशा गावातून लंडनला जातोय याचा त्याच्या आई वडिलांना सार्थ अभिमान आहे. शिवाय आमच्या राजू सारखे अनेक राजू तयार व्हावेत अशी इच्छा राजूचे वडील आत्माराम केंद्रे आणि आणि आई जिजाबाई केंद्रे यांनी व्यक्त केलीय.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

राजूने मागील तीन ते चार वर्षात 100 युवकांना देशातील चागंल्या कॉलेज किंवा विद्यापीठात प्रवेश मिळवण्यासाठी मार्गदर्शन ही केलेय. राजू करिअर विषयी मार्गदर्शन ही करतो. शिक्षणाच्या पारंपरिक चौकटी ओलांडून ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये नवा दृष्टिकोन आणि आत्मविश्वास निर्माण करणायचा प्रयत्न ही राजू करत असतो. आई -वडील जरी शेतकरी असले तरीही शिक्षणाच्या प्रवाहात अनेकांना आणायचे काम राजू केंद्रे यांनी केले असून त्याचा आदर्श ही इतर युवकांनी घेण्याची गरज आहे.

इतर बातम्या:

‘विद्यार्थ्यांची 50 टक्के नाही, तर संपूर्ण फी माफ करा,’ मागणीसाठी AISF विद्यार्थी संघटना मुंबईत धडकणार

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा मोठा निर्णय, प्रवेश परीक्षांसाठी अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ

(Buldana Lonar Pimpri Khandare Raju Kendre going to London for further study in Well known institute in England)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.