ठाकरे सरकार गेंड्याच्या कातडीचं झालंय, चंद्रकांत पाटलांची पूरग्रस्त पॅकेजवरुन टीका

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारनं जाहीर केलेल्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या पॅकेजवर टीका केली आहे. हे सरकार गेंड्याच्या कातडीचं असल्याची टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

ठाकरे सरकार गेंड्याच्या कातडीचं झालंय, चंद्रकांत पाटलांची पूरग्रस्त पॅकेजवरुन टीका
चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष
Follow us
| Updated on: Oct 15, 2021 | 7:27 PM

सांगली: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारनं जाहीर केलेल्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या पॅकेजवर टीका केली आहे. हे सरकार गेंड्याच्या कातडीचं असल्याची टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. आघाडी सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेलं पॅकेज हे फसवे असल्याचं टीकाही आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. ते सांगली मध्ये बोलत होते.

सांगली मध्ये अजून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये भाजपा कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार चंद्रकांत पाटील यांनी आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. शिवसेनेला दसऱ्याच्या शुभेच्छा देताना, आघाडी सरकारला मात्र आपण शुभेच्छा देणार नाही,अशी भूमिका जाहीर केली.

हे सरकार गेंड्याच्या कातडीचं झालंय

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या अटक व सुटकेवर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले,आता जितेंद्र आव्हाड हे आरोपी झाले आहेत. महाराष्ट्राचा आजपर्यंतचा इतिहास पाहिला तर आरोपी झाल्यानंतर मंत्री राजीनामे देतात,मात्र या सरकार मध्ये धनंजय मुंडे, असतील अनिल परब असतील,आव्हाड असतील त्यांचा असा समज झाला आहे,की सर्व सामान्यांना वेगळा न्याय आणि आपल्याला वेगळा न्याय आहे. त्यामुळे हे सरकार गेंड्याच्या कातडीचे झाले आहे,अशी टीका आघाडी सरकारवर केली आहे.

सरकार पंचनाम्याचं तुणतुणं वाजवतंय

राज्य सरकारकडून पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या साठी जाहीर करण्यात आलेल्या पॅकेजवरून टीका करताना चंद्रकांत पाटील म्हणाले,10 हजार कोटींचे जाहीर केलेले पॅकेज म्हणजे फसवे आहे,मुळात 2019 चा जीआर प्रमाणे मदत देण्याची सगळ्यांचीच मागणी होती.2019 मध्ये सरसकट शेतीचे नुकसान भरपाई दिली होती,पण हे सरकार अजून पंचनाम्याचे तुणतुणे वाजवत आहेत.

सरकारचे पूरग्रस्त पॅकेज फसवे

देवेंद्र फडणवीस सरकारने दुप्पट-तिप्पट भरपाई दिली मात्र या सरकार दुपटी पेक्षाही कमी मदत देत आहे. आणि या दहा हजार कोटी मध्ये रस्ते याशिवाय अनेक गोष्टींचा समावेश आहे.मात्र फडणवीस सरकारने फक्त नऊ हजार कोटी पूरग्रस्त आणि शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी दिले होते,त्यामुळे हे सरकारचे पूरग्रस्त पॅकेज फसवे आहे, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी आघाडी सरकारवर टीका केली आहे.

 हेही पाहा

इतर बातम्या:

Dussehra 2021 Live Updates | आपला आवाज दाबणारा जन्माला येऊच शकत नाही : उद्धव ठाकरे

’31 डिसेंबरपर्यंत ठाकरे सरकार आणि 40 चोरांचे घोटाळे बाहेर आले असतील’, भ्रष्टाचाराच्या रावणाचं दहन करत किरीट सोमय्यांचे गंभीर आरोप

Chandrakant Pati slam MVA Government package over flood and heavy rainfall affected farmers

मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी.
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू.
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा.
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप.
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.