VIDEO: 2024 च्या निवडणुकीत जयंत पाटील यांना घरी पाठवू : चंद्रकांत पाटील

| Updated on: Jun 13, 2021 | 2:29 AM

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना आगामी 2024 च्या निवडणुकीत घरी पाठवू, असा दावा केलाय.

सांगली : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना आगामी 2024 च्या निवडणुकीत घरी पाठवू, असा दावा केलाय. ते सांगलीच्या इस्लामपूरमध्ये बोलत होते. चंद्रकांत पाटील यांनी इस्लामपूर येथील नानासाहेब महाडिक शैक्षणिक संकुल याठिकाणी विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांसमोर बोलताना हा दावा केलाय. जर सर्वानी एकजूट दाखवली तर जयंत पाटील यांना 2024 च्या निवडणुकीत घरी पाठवू, असा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केला (Chandrakant Patil claim will defeat Jayant Patil in 2024 election).

चंद्रकांत पाटील म्हणाले, “राहुल महाडिक आणि सम्राट महाडिक यांना छद्मीपणे बोलण्याचा परमेश्वराने एक आशिर्वाद दिलाय. पण कार्यकर्ते बरोबर असतील 2024 च्या निवडणुकीत जयंत पाटील यांना घरी पाठवू. जर आपण आपल्यात एकजुट ठेवली असती तर ते या निवडणुकीत देखील शक्य होतं. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वजण एकजुटीने काम करु.”

संभाजीराजे मान्य करत नसले तरी ऑन पेपर ते भाजप खासदार: चंद्रकांत पाटील

दरम्यान, याआधी चंद्रकांत पाटील यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती मान्य करत नसले तरी ऑन पेपर ते भाजप खासदार असल्याचं वक्तव्य केलं होतं. संभाजीराजे म्हणतात मी राष्ट्रपती नियुक्त खासदार, मी भाजप खासदार नाही. पण ऑन पेपर ते भाजपचे खासदार आहेत.  मला त्या वादात पडायचं नाही. मराठा आंदोलनात कोणी चालढकल करत असेल तर ते मान्य होणार नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

संभाजीराजे छत्रपती काय म्हणाले होते?

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या 16 तारखेला कोल्हापुरातून मोर्चाची हाक दिल्यानंतर आता संभाजीराजे छत्रपती यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये त्यांनी मराठा समाजाच्या नेत्यांना जाहीरपणे भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे. समाज बोलला, आम्ही बोललो, आता लोकप्रतिनिधींनो तुम्ही बोला आणि जबाबदारी स्वीकारा, असे संभाजीराजे यांनी या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता राज्यातील मराठा आमदार आणि खासदार मराठा आरक्षणासंदर्भात काही निर्णायक भूमिका घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित व्हिडीओ पाहा :

हेही वाचा :

VIDEO: मला कुणी शिकवण्याची गरज नाही, फडणवीस बोलले तरच उत्तर देईन; संभाजी छत्रपतींनी चंद्रकांतदादांना सुनावलं

संभाजीराजे मान्य करत नसले तरी ऑन पेपर ते भाजप खासदार: चंद्रकांत पाटील

“अजित पवारांसोबत आम्ही सरकार स्थापन केलं, त्यावेळी जेव्हढी ताकद लावली, ती आता का नाही?”

Chandrakant Patil claim will defeat Jayant Patil in 2024 election

Published on: Jun 13, 2021 02:24 AM