VIDEO: काँग्रेस नेते वेल कल्चर, ते दरोडेखोर नसतात, पण राष्ट्रवादीचा भरवसा नाही; चंद्रकांत पाटलांची टोलेबाजी

काँग्रेस नेते वेल कल्चर आहेत. ते दरोडेखोर नसतात. पण राष्ट्रवादीवर भरवसा नाही, असा जोरदार हल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. (chandrakant patil taunt to ncp over aryan khan case)

VIDEO: काँग्रेस नेते वेल कल्चर, ते दरोडेखोर नसतात, पण राष्ट्रवादीचा भरवसा नाही; चंद्रकांत पाटलांची टोलेबाजी
चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप
Follow us
| Updated on: Oct 29, 2021 | 12:16 PM

सोलापूर: काँग्रेस नेते वेल कल्चर आहेत. ते दरोडेखोर नसतात. पण राष्ट्रवादीवर भरवसा नाही, असा जोरदार हल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना हा टोला लगावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भरवशाचा नाही. त्यांचं सकाळी एक राजकारण असतं आणि रात्री दुसरंच राजकारण असतं. एक वेळ काँग्रेस परवडली. काँग्रेस नेते वेल कल्चर आहेत. ते दरोडेखोर नसतात. त्यामुळे आम्ही राष्ट्रवादीच्या सलगीला भूलणार नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

बाळासाहेबांची आठवण येणं साहजिकच

यावेळी त्यांनी अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लिहिलेल्या पत्रावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. आज पदोपदी बाळासाहेब ठाकरे यांची आठवण येते. ते म्हणायेच खोटे बोलू नका. मात्र, हे सरकार प्रत्येक ठिकाणी खोटे बोलत आहे. त्यामुळे क्रांती रेडकर असेल किंवा मी आम्हाला बाळासाहेबांची आठवण येणे साहजिकच आहे, असं ते म्हणाले.

हे सोमय्या आणि भाजपचे यश

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे हे भाजपचे पोपट असल्याची टीका केली होती. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आधी म्हणाले वाझे भाजपचे पोपट आहेत. नंतर हायकोर्टपण म्हणतील. कारण हायकोर्टाने जामीन दिला नाही. डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांनी लिहिलेली घटना सरकारला मान्य नाही. त्यामुळे त्यांनी आरोप करत राहावेत, असं ते म्हणाले. तसेच एका मंत्र्याच्या जावयाला 1500 कोटींचं कंत्राट मिळालं होतं. ते रद्द करावं लागलं. हे किरीट सोमय्या आणि भाजपचं यश आहे. 500 कोटी रुपये या कर्मचाऱ्यांना दिले असते तरी कर्मचारी खूश झाले असते. शेतकरी अडचणीत आहेत. त्यांनी दिलासा देता आला असता, असा चिमटाही त्यांनी काढला.

आंदोलनात सहभागी होणार

एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. आम्ही या आंदोलनात सहभागी होऊ. आतापर्यंत राज्यात एसटीच्या 27 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. हे सरकार गेंड्याच्या कातडीचे सरकार आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

संबंधित बातम्या:

VIDEO: राष्ट्रवादीचा पोपट रोज बोलत आहे ना?; देवेंद्र फडणवीसांचा नवाब मलिक यांना टोला

महिन्याभरात परिस्थिती बदलली, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त; नवाब मलिक यांचा इशारा

समीर वानखेडेंचे शागीर्द कोण? हिवाळी अधिवेशनात अनेक नेत्यांची नावे जाहीर करणार; नवाब मलिक यांच्या विधानाने खळबळ

(chandrakant patil taunt to ncp over aryan khan case)

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.