हृदयद्रावक! खेळताना कुलरच्या स्टँडला हात लागून 5 वर्षाच्या चिमुरड्याचा जागीच मृत्यू
Chandrapur cooler shock : ही घटना घडली आहे, चंद्रपूर शहरातील गजानन मंदिर परिसरामध्ये! युग महेश जेंगठे असं पाच वर्षांच्या मृत मुलाचं नाव आहे.
चंद्रपूर : दिवस गरमीचे आहेत. घराघरांत एसी नाहीतर कुलरची (Co0ler) गरज लागतेच आहे. मात्र कुलरचा वापर करताना काळजी घेणंही तितकंच गरजेचं आहे. विशेषकरुन घरात जर लहान मुलं असतील, तर घरातील विद्युत उपकरणांपासून त्यांना लांब ठेवणंही खबरदारीचं आहे. कारण चंद्रपुरात कुलरचा शॉक (Chandrapur Cooler Shock) लागून एका मुलाचा मृत्यू (5 year boy dead) झाला आहे. त्यामुळे या मुलाच्या कुटुंबातील सगळ्यांवर शोककळा पसरली आहे. पाच वर्षांचा चिमुरडा खेळत होता. दुपारी खेळत असतेवेळी त्याचा हात कुलरच्या स्टँडला लागला. यावेळी स्टँडला हात लागताच, त्याचा जागीच जीव गेला आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आहे. तर पाच वर्षांच्या चिमुरड्याच्या पालकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे विद्युप उपकरणांपासून लहान मुलांना लांब ठेवणं किती महत्त्वाचं आहे, हे अधोरेखित झालंय.
..आणि तो जागीच कोसळला!
ही घटना घडली आहे, चंद्रपूर शहरातील गजानन मंदिर परिसरामध्ये! युग महेश जेंगठे असं पाच वर्षांच्या मृत मुलाचं नाव आहे. युगा हा घरात खेळत होता. त्यावेळी त्याला हात कुलरच्या स्टँडला लागला आणि तो जागीच कोसळला.
कुलरचा शॉक लागून मृत्यू होण्याची ही काही पहिलीच घटना नाही. मात्र आता पाच वर्षांच्या निष्पाप चिमुरड्याचा या दुर्दैवी घटनेत मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त होते आहे. युगच्या पालकांवर यामुळे दुःखाचा डोंगर कोसळलाय. शॉक लागून चिमुरड्याचा मृत्यू झाल्याच्या या घटनेमुळं संपूर्ण जेंगठे कुटुंब हादरलेत.
चंद्रपुरात सूर्य आग ओकतोय!
चंद्रपुरात गुरुवारी 42 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे. वाढत्या तापमानानं चंद्रपुरातील लोक त्रस्त झालेत. पारा वाढलेला असलेल्यानं सध्या घराघरांत कुलरचा वापर वाढणंही स्वाभाविक आहे. मात्र कुलर वापरताना काळजीही घेणं गरजेचं आहे, हे या घटनेनं अधोरेखित केलंय.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
ईडी हा राक्षसी कायदा, अकोल्यात छगन भुजबळ यांनी व्यक्त केली चिंता
बुलडाण्यात साई मंडप डेकोरेशनच्या गोदामाला आग, आगीत लाखो रुपयांचे नुकसान
नोकरीच्या निमित्ताने शहरात आणले, बलात्कार करून देहव्यापारात ढकलले, चार आरोपी जेरबंद