Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इमारतीवरील स्लॅबचे तुकडे अंगावर पडू लागले, येथील मुख्याध्यापकांना घ्यावा लागला वर्गाबाहेर शिकवण्याचा निर्णय

या इमारतीतून विद्यार्थ्यांना अन्यत्र हलवण्याशिवाय मुख्याध्यापकांसमोर कुठलाही पर्याय उरलेला नाही. त्यामुळे चंद्रपूरचा असह्य उन्हाळा झेलत विद्यार्थी शाळा परिसरातील झाडाखाली ज्ञानार्जन करत आहेत.

इमारतीवरील स्लॅबचे तुकडे अंगावर पडू लागले, येथील मुख्याध्यापकांना घ्यावा लागला वर्गाबाहेर शिकवण्याचा निर्णय
Follow us
| Updated on: Apr 10, 2023 | 2:17 PM

चंद्रपूर : शाळेच्या सुस्थितीत असलेल्या प्रवेशद्वारावर लिहिले आहे, यावे ज्ञानासाठी निघावे सेवेसाठी. मात्र ही म्हण सार्थ ठरविण्यासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांची चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातल्या पेंढरी- कोके या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील इमारतीत वानवा आहे. या शाळेत वर्ग एक ते सातचे सुमारे विद्यार्थी आहेत. शाळेत एक कौलारू इमारत असून ती गळकी आहे. त्यामुळे तिथले विद्यार्थी या आधीच स्लॅबच्या इमारतीत हलविले होते. मात्र आता स्लॅबची इमारत देखील जीर्ण झाली आहे. त्यातून स्लॅबचे तुकडे खाली पडू लागले. त्यात एक विद्यार्थी जखमी झाला.

झाडाखाली ज्ञानार्जन

या इमारतीतून विद्यार्थ्यांना अन्यत्र हलवण्याशिवाय मुख्याध्यापकांसमोर कुठलाही पर्याय उरलेला नाही. त्यामुळे चंद्रपूरचा असह्य उन्हाळा झेलत विद्यार्थी शाळा परिसरातील झाडाखाली ज्ञानार्जन करत आहेत. किशोर बावणे आणि सावी रामटेके यांनी आपल्या शाळेची व्यथा सांगितली.

हे सुद्धा वाचा

नव्या इमारतीसाठी गावकरी आक्रमक

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पेंढरी- कोके येथील शाळा इमारती निर्लेखीत करून नव्याने बांधण्याचा प्रस्ताव ग्रामपंचायत आणि शिक्षण विभागाने जिल्हा परिषद प्रशासनाला पाठवलाय. मात्र अजूनही या प्रस्तावाला मंजुरी मिळालेली नाही. परिणामी धोका टाळण्यासाठी शिक्षकांनी झाडाखाली शिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. वारंवार पाठपुरावा करूनही नवी इमारत उभी होत नसल्याने ग्रामस्थ संतापले आहेत.

प्रशासनाने घ्यावी तातडीने दखल

शिक्षण क्षेत्रावर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात असल्याचा देखावा वारंवार प्रशासनातर्फे केला जातो. मात्र इमारती गुणवत्तापूर्ण बांधणे आणि जीर्ण झालेल्या इमारती तातडीने निर्लेखित करून विद्यार्थ्यांना उत्तम सुविधा देणे याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. पेंढरी-कोके येथील जिल्हा परिषद शाळेबाबत घडलेला प्रकार जिल्हा परिषद प्रशासनाने तातडीने दखल देत मार्गी लावावा अशीच अपेक्षा ग्रामस्थ करत आहेत.

सिंदेवाही तालुक्यातल्या पेंढरी-कोके येथील सुमारे 200 विद्यार्थी दिवाळीपासून झाडाखाली शिक्षण घेत आहेत. शाळा इमारत जीर्ण झाली आहे. अंगावर स्लॅबचे तुकडे पडू लागल्याने मुख्याध्यापकांनी हा निर्णय घेतलाय. मात्र अजूनही जिल्हा परिषद प्रशासनाला प्रस्ताव मंजूर करण्यासाठी वेळ मिळाला नाही.

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.