Chandrapur Tiger: बिथरलेल्या वाघाचा जमावावर हल्ला, चंद्रपूरच्या तोहगावात वाघाचा धुमाकूळ
गुरुवारी तोहगाव-आर्वी मार्गावरील एका पुलाखाली वाघ दडून असल्याचं माहिती मिळाली होती. त्यानंतर लोकांनी गर्दी केली. शेकडोंच्या जमानावं वाघावर दगडफेक करण्यास सुरुवात केली.
चंद्रपूर : चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यानं (Tiger Attack) एकच दहशत माजली आहे. गेल्या आठ दिवसांपासून या वाघानं तोहगावच्या पंचक्रोशीत धुमाकूळ घातलाय. सुमारे पाच पाळीव जनावरांवर (Pets) हल्ला करत वाघानं दहशत माजवली होती. वाघाच्या बंदोबस्तासाठी वन विभागानं (Forest Department in Chandrapur) पिंजरे आणि कॅमेऱ्याही लावला आहे. दरम्यान, गुरुवारी तोहगाव-आर्वी मार्गावरील एका पुलाखाली वाघ दडून असल्याचं माहिती मिळाली होती. त्यानंतर लोकांनी गर्दी केली. शेकडोंच्या जमानावं वाघावर दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यानंतर बिथरलेल्या वाघानं जमावावर हल्ला करत दोघांना जखमी केलंय. वाघाला नंतर लोकांनी पिटाळून लावलं होतं. दरम्यान, वाध सद्या गावच्या सीमेवर लपून असल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. तर वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या दोघांना तोहदाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं आहे. तसंच वाघाला तातडीनं जेरबंद करण्याची मागणीही ग्रामस्थांकडून गेली जातेय.
वाघाच्या हल्ल्यानं खळबळ!
गेल्या काही दिवसांपासून वाघाची दहशत चंद्रपुरातल्या गोंडपिपरी तालुक्यात पाहायला मिळते आहे. ग्रामस्थांकडूनही दहशत माजवणाऱ्या वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत होती.
गेल्या आठ दिवसांपासून वाघाचं वास्तव्य या भागात असल्याची भीती व्यक्त केली जात होती. तसंच तब्बल पाच पाळीव जनावरांवही वाघानं हल्ला केला होता. पाच पाळीव जनावरं वाघानं आपल्या हल्ल्यामध्ये फस्त केली होती. त्यामुळे या वाघाचा तातडीनं बंदोब्सत करावा, अशी मागणी केली जात होती.
जमावाची दगडफेक आणि वाघाचा प्रतिहल्ला!
दरम्यान, गुरुवारी तोहगाव-आर्वी मार्गावर एक वाघ पुलाखाली असल्याची बातमी पसरली. ही माहिती कळताच गावातील अनेकांनी गर्दी केली. गर्दीनं वाघ असल्याचं पाहून दगडफेक करण्यास सुरुवात केली.
यानंतर बिथरलेल्या वाघानं जमावावरच चाल केली. वाघानं केलेल्या हल्ल्यामध्ये दोघेजण जखमी झाले आहे. शरद बोपनवार आणि सुरेश मत्ते हे दोघेजण वाघाच्या हल्ल्यामध्ये जखमी झाले असून त्यांना सध्या उपचारासाठी तोहगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं आहे.
वनविभानही एक्शन मोडमध्ये!
दरम्यान, वाघानं केलेल्या हल्ल्यानंतर वनविभागाचे अधिकारीही एक्शन मोडमध्ये आलेले आहेत. वन विभागाकडून आता पिंजरे आणि कॅमेऱ्यांचा ट्रॅप लावण्यात आला आहे. आता वाघाला पकडण्यात यश येतं का, हे पाहणं महत्त्वाचंय. मात्र सध्या या गावाती दहशत संपूर्ण तालुक्यात पाहायला मिळतेय.
संबंधित बातम्या :
Video: वाघ बैलाचा फडशा पाडत होता, लोक व्हिडीओ रेकॉर्ड करत होते! वाघ अंगावर आला असता म्हणजे…?
हातात धान कापणीचं अवजार अन् समोर डरकाळी फोडणारा वाघ, गडचिरोलीत 44 वर्षांच्या वाघिणीची यशस्वी झुंज!
घराजवळ खेळताना बिबट्याची झडप, नगरमध्ये चिमुकलीचा मृत्यू