चंद्रपूरच्या आदित्य जीवनेची युपीएससीत उज्वल कामगिरी, परिक्षेत 399 वे रँक मिळवले

मेकॅनिकल इंजिनियर असलेल्या आदित्यने 399 अखिल भारतीय रँकिंग मिळविले आहे. आदित्यचे वडील आनंदवन संचालित आनंद निकेतन महाविद्यालयात प्राध्यापक तर आई शिक्षिका आहे.

चंद्रपूरच्या आदित्य जीवनेची युपीएससीत उज्वल कामगिरी, परिक्षेत 399 वे रँक मिळवले
चंद्रपूरच्या आदित्य जीवनेची युपीएससीत उज्वल कामगिरी
Follow us
| Updated on: Sep 24, 2021 | 10:48 PM

चंद्रपूर : नागरी लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षा 2020 चा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनीही मोठे यश संपादन केले आहे. जिल्ह्यातील वरोरा येथील युवकाने युपीएससी परीक्षा उत्तीर्ण करत उज्ज्वल कामगिरी केली आहे. आपल्या यशाने आदित्य चंद्रभान जीवने या 25 वर्षीय युवकाने जिल्हावासियांची मान उंचावली आहे. मेकॅनिकल इंजिनियर असलेल्या आदित्यने 399 अखिल भारतीय रँकिंग मिळविले आहे. आदित्यचे वडील आनंदवन संचालित आनंद निकेतन महाविद्यालयात प्राध्यापक तर आई शिक्षिका आहे. (Chandrapur’s Aditya Jeevan’s brilliant performance with UPS, ranked 399th in the exam)

गुरुजन आणि कुटुंबियांमुळेच आपल्याला युपीएससीमध्ये हे यश मिळाल्याचे सांगत समाजासाठी उत्तम काम करण्याची इच्छा आदित्यने दर्शविली आहे. वरोरा शहरातील प्रथम युपीएससी उत्तीर्ण विद्यार्थी असा बहुमान देखील त्याने मिळविला असून त्याचे जिल्हाभरातून अभिनंदन केले जात आहे.

खुल्या प्रवर्गातून 263 उमेदवार उत्तीर्ण

नागरी लोकसेवा आयोग 2020 च्या मुख्य परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये एकूण 761 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये खुल्या प्रवर्गातून 263 तर आर्थिक मागास प्रवर्गातून 86, अन्य मागास प्रवर्गातून 229 तर अनुसूचित जाती 122, अनुसूचित जमाती 61 उमेदवारांनी परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

निकाल कसा पाहावा ?

♦ सर्वात अगोदर upsc.gov.in या वेबसाईटवर जा

♦ वेबसाईटवर जाऊन निकालाच्या लिंकवर क्लिक करा

♦ तुमच्यासमोर एक पीडीएफ येईल

♦ यामध्ये तुमचा रोल नंबर तसेच नाव सर्च करा

♦ जर तुमचे नाव आणि रोल नंबर यामध्ये असेल तर तुम्ही उत्तीर्ण आहात.

♦ हे पीडीएफ डाऊनलोड करुन सेव्ह करा

महाराष्ट्रातील यशस्वी विद्यार्थ्यांची नावे खालीलप्रमाणे

नितिषा जगताप, लातूर – रँक 199 सुदर्शन सोनावणे, नाशिक – रँक 691 प्रतिक जुईकर, रायगड – रँक 177 डॉ. दिक्षा बुवरे, नागपूर – रँक 664 अभिषेक दुधाळ, अहमदनगर – रँक 469 आदित्य जिवणे, चंद्रपूर – रँक 399 माधुरी गरुड, पुणे – रँक 561 श्रीकांत कुलकर्णी, सातारा – रँक 525 श्रीकांत विसपुते, ठाणे – रँक 335 स्नेहल ढोके, यवतमाळ – रँक 564 अर्पिता ठुबे, ठाणे – रँक 383 पियुष मडके, नागपूर – रँक 732 साईशा ओरके, मुंबई – रँक 228 किशोर देवरवडे, बीड – रँक 735 दर्शन दुगड, यवतमाळ – रँक 138 शुभम जाधव, सोलापूर – रँक 445 अमोल मुरकुट, बुलढाणा – रँक 402 नितीन पुके, परभणी – रँक 466 सूर्यभान यादव, पालघर – रँक 488 प्रणव ठाकरे, वाशिम – रँक 476 सायली गायकवाड, पुणे – रँक 641 शिवराज वाणी, जळगाव – रँक 430 विनायक नरवदे, अहमदनगर – रँक 037 विकास पालवे, अहमदनगर – रँक 587 पूजा कदम, रँक 577 निवृत्ती आव्हाड, रँक 166 गौरव साळुंखे, रँक 182 प्रतिक धुमाळ, रँक 183 प्रथमेश राजेशिर्के, रँक 236 साहिल खरे, रँक 243 संकेत वाघे, रँक 266 तुषार देसाई, रँक 224 परमानंद दराडे, रँक 312 रिचा कुलकर्णी आनंद पाटील, रँक 325 दिव्या गुंडे, रँक 338 सुहास गाडे, रँक 349 सागर मिसाळ, रँक 352 सूरज गुंजाळ, रँक 353 अनिकेत फडतरे, रँक 426 अनिल म्हस्के, रँक 361 श्रीराज वाणी, रँक 430 राकेश अकोलकर, रँक 432 वैभव बांगर, रँक 442 ओंकार पवार, रँक 455 अमर राऊत, रँक 449 शुभम नागरगोजे, रँक 453 श्रीकांत मोडक, रँक 499 यशवंत मुंडे, रँक 502 अनुजा मुसळे, रँक 511 बंकेश पवार, रँक 516 अनिकेत कुलकर्णी, रँक 517 शरण कांबळे, रँक 542 सायली म्हेत्रे, रँक 559 सचिन लांडे, रँक 566 हर्षल घोगरे, रँक 614 निलेश गायकवाड, रँक 629 हेतल पगारे, रँक 630 शिव्हार मोरे, रँक 649 सुमितकुमार धोत्रे, रँक 660 श्लोक वायकर, रँक 699 शुभम भैसारे, रँक 727 शितल भगत, रँक 743 स्वरुप दिक्षित, रँक 749

180 आयएएस तर 200 आयपीएस जागा भरल्या जाणार

केंद्रीय लोकसेवा आयोगतर्फे वेगवेगळ्या रिक्त पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. आयोगातर्फे 180 आयएएस, 36 आयएफस, 200 आयपीएस, सेंट्रल सर्व्हिस ग्रप ए 302, ग्रुप बी सर्व्हिस 118 अशा रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. एकूण 836 नुयक्त्या केल्या जाणार आहेत. (Chandrapur’s Aditya Jeevan’s brilliant performance with UPS, ranked 399th in the exam)

इतर बातम्या

health recruitment 2021 | मोठी बातमी ! आरोग्य विभागाची भरती पुढे ढकलली ! तांत्रिक अडचणींमुळे राज्य सरकारचा निर्णय, विद्यार्थांमध्ये गोंधळ

PM Modi in US : पंतप्रधान नरेंद मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांचे मानले आभार, दोन नेत्यांमध्ये चर्चा सुरु

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.