राज्यात ‘या’ व्हिडीओची चर्चा, रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधी परिसराचा Video व्हायरल

छत्रपती शिवाजी महाराज (Chh. Shivaji Maharaj) यांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड (Raigad) किल्ल्यावरील एक व्हिडीओ (viral video) मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतं आहे

राज्यात 'या' व्हिडीओची चर्चा, रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधी परिसराचा Video व्हायरल
रायगडावर कुणी अस्थी ठेवण्याचा प्रयत्न केला? दोन संशयीतांमुळे वाद
Follow us
| Updated on: Dec 02, 2021 | 8:49 AM

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज (Chh. Shivaji Maharaj) यांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड (Raigad) किल्ल्यावरील एक व्हिडीओ (viral video) मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतं आहे.अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं महाराष्ट्रात ठिकठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. रायगडावर देखील पावसाच्या जोरदार सरी आणि प्रचंड सोसाट्याचा वारा सुटला होता. रायगडावर शिवाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन करायला गेलेल्या शिवप्रेमीनं रायगडावरील ही दृश्य कॅमेरात टिपली आहेत. सध्या व्हाटसअ‌ॅप, फेसबूक, इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ व्हायरल होतं आहे. अनेकांच्या व्हाटसअ‌ॅप स्टेटसला हाच व्हिडीओ पाहयाला मिळत आहे.

व्हिडीओत नेमकं काय?

महाराष्ट्रात कालपासून जोरदार पाऊस सुरु आहे. रायगड जिल्ह्यातही पावसानं जोरदार हजेरी लावली. स्वराज्याची राजधानी असणाऱ्या रायगडावरील एक व्हिडीओ सोशल मीडीयावर व्हायरल होत आहे. प्रचंड सोसाट्याचा वारा आणि वरुन कोसळणाऱ्या पावसाच्या सरी या व्हिडीओत दिसून येत आहेत. या व्हिडीओत रायगडावरील राजसदरेवर पाऊस कैद झालेला आहे. राजसदरेवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवरील पुतळा अगदी मनमोहक दिसत आहे.

दे धक्का चित्रपटातील गीताचा वापर

छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी परिसरातील व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये 2008 साली प्रदर्शित झालेल्या दे धक्का चित्रपटातील वाट चालावी चालावी या गीताचा वापर करण्यात आला आहे. हे गीत सुप्रसिद्ध संगीतकार अजय- अतुल यांनी संगीतबद्ध केलं आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद 7 डिसेंबरला रायगडला भेट देणार

खासदार संभाजी छत्रपती यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना रायगड भेटीचं निमंत्रण दिलं होतं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संभाजी छत्रपती यांनी दिलेल्या निमंत्रणाचा स्वीकार केला आहे. राष्ट्रपती 7 डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी रायगडास भेट देणार आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रायगडाला भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन करणं ही आपल्या सर्वांसाठीच गौरवास्पद बाब आहे, असं खासदार संभाजी छत्रपती म्हणाले आहेत.

इतर बातम्या

नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी फलोत्पादन प्रशिक्षण, असा करा अर्ज!

राज्यातील 50 हजार खेड्यांत आरोग्य यंत्रणाच नाही, कशी थोपवणार तिसरी लाट? औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल

Chhatrapati Shivaji Maharaj Raigad Rain video viral on Social Media

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.