Naxal Threat : अधुरा सपना पुरा करेंगे…सरकारविरुद्ध नक्षल्यांचे पत्रक; मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांना केले टार्गेट, काय दिली धमकी

Naxal Threat : नक्षली चळवळीवर वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे नक्षलवादी आक्रमक झाले आहे. त्यांनी गडचिरोली जिल्ह्यात पत्रकं वाटली आहेत. मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री आणि अनेक मंत्र्यांना या पत्रकात टार्गेट करण्यात आले आहे. तर प्रसारमाध्यमाला धमकी देण्यात आली आहे.

Naxal Threat : अधुरा सपना पुरा करेंगे...सरकारविरुद्ध नक्षल्यांचे पत्रक; मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांना केले टार्गेट, काय दिली धमकी
नक्षलवादी पुन्हा सक्रिय, दिली ही धमकी
Follow us
| Updated on: Aug 11, 2024 | 1:48 PM

नक्षली चळवळीवर वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे नक्षलवादी आता आक्रमक झाले आहेत. अलीकडे झालेल्या एटापल्ली तालुक्यातील चकमकीत 12 माओवादी ठार झाले होते. त्यांनी गडचिरोली जिल्ह्यात पत्रकं वाटले आहेत. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्यात आले आहे. अधुरा सपना पुरा करेंगे, असा इशारा नक्षल्यांनी दिला आहे. 23 दिवसांपूर्वी एटापल्ली तालुक्यातील जारावंडी हद्दीत नक्षलवादी आणि C-60 जवानांमध्ये चकमक उडाली होती. त्यात 12  नक्षलवादी ठार झाले होते.

सरकारवर केली टीका

अलीकडे झालेल्या एटापल्ली तालुक्यातील चकमकीत 12 माओवादी ठार झाले होते. यानंतर तीन आठवड्यांनी शनिवारी माओवाद्यांनी पत्रक जारी केले आहे. जन सुरक्षा विधेयक आणि बारा नक्षलवाद्यांच्या चकमकी वरून माओवादी आक्रमक झाले असून त्यांनी पत्रकातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यावर टीका केली आहे.

हे सुद्धा वाचा

उद्योगपतींसाठी हा खटाटोप

गडचिरोली येथील खनिज संपत्ती वर सरकारचं डोळा असल्याचं सांगत गडचिरोली जिल्ह्यात असलेलं मौल्यवान खनिज उद्योगपतींना मातीमोल दराने देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा माओवाद्यांचा पत्रकातून आरोप आहे. या पत्रकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यावरही माओवाद्यांनी टीका केली आहे अलीकडे येत असलेल्या जन सुरक्षा विधेयकावरही माओवाद्यांनी टीका केली आहे.

12 नक्षलवादी ठार

17 जुलै रोजी एटापल्ली तालुक्यातील जारावंडी हद्दीत नक्षलवादी आणि C-60 जवानांमध्ये चकमक उडाली होती. वांडोली गावाजवळ दोन्ही गट भिडले होते. त्यात तीन मोठ्या माओवादी नेत्यांसह कसनसूर, कोरची, टिपागड, चातगाव दलमचे 12 नक्षलवादी ठार झाले होते. त्यानंतर आता 23 दिवसांनी पश्चिम बस सब झोनल ब्युरोचा प्रवक्ता श्रीनिवास याने शनिवारी पत्रक जारी केले आहे. त्यात त्याने या चकमकीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यात नक्षलवाद्यांचे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी सन्मानपूर्वक त्यांच्या नातेवाईकांना देण्याची मागणी केली आहे. अधुरा सपना पुरा करेंगे, आशा आशयाच्या या पत्रातून नक्षलवाद्यांनी पुन्हा आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.