Video | बॅनरवर फोटो नसल्यामुळे राडा, धुळ्यात रोहित पवार यांच्यासमोरच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत बाचाबाची
राष्ट्रवादीचे युवा नेते तथा आमदार रोहित पवार यांच्या समोरच राष्ट्रवादी पक्षांतील स्थानिक पुढाऱ्यांचे दोन गट आमनेसामने आले. या दोन्ही गटांमध्ये पवार यांच्यासोमर बाचबाची झाली. हा प्रकार धुळे शहरातील पारोळा रोडवरील प्रकाश टॉकीज चौकात घडला.
धुळे : राष्ट्रवादीचे युवा नेते तथा आमदार रोहित पवार यांच्या समोरच त्यांच्या पक्षातील स्थानिक पुढाऱ्यांचे दोन गट आमनेसामने आले. या दोन्ही गटांमध्ये पवार यांच्यासमोरच बाचबाची झाली. हा प्रकार धुळे शहरातील पारोळा रोडवरील प्रकाश टॉकीज चौकात घडला.
बॅनर अनिल गोटेंचा फोटो नसल्यामुळे बाचाबाची
मिळालेल्या माहितीनुसार आमदार रोहित पवार धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. धुळे शहरात पारोळा रोडवरील प्रकाश टॉकीज चौकात त्यांच्या स्वागतासाठी बॅनर लावण्याता आला होता. मात्र या बॅनवर राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांचा फोटो नव्हता. यावेळी त्यांच्या स्वागतसाठी बरेच कार्यकर्ते तसेच स्थानिक नेते जमले होते.
रोहित पवार यांच्या समोरच झाली बाचाबाची
मात्र, रोहित पवार यांच्या स्वाागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांचा फोटो नसल्याने गोटे समर्थक व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कुणाल पवार समर्थक यांच्यात बाचाबाची झाली. रोहित पवार यांच्या समोरच दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक आणि झटाटपी झाली. या घटनेचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांना अडकवण्यासाठी आठ महिन्यांपूर्वी बैठक
दरम्यान, धुळे जिल्ह्याला भेट देण्याआधी त्यांनी जळगाव जिल्ह्याला भेट दिली. या दौऱ्यात दुपारी दीड वाजता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयाला भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी “साधारण सहा ते सात महिन्यांपूर्वी भाजपच्या नेत्यांची एक मोठी बैठक झाली होती. या बैठरीत महाविकास आघाडीच्या नेत्यांवर ईडी व सीबीआयच्या माध्यमातून काय कारवाई करता येईल, याबाबत रणनीती आखण्यात आली. तसे पत्रही भाजप नेत्यांनी केंद्र सरकारला दिले होते. त्यानंतर मंत्र्यांवर ईडी व सीबीआयच्या कारवायांचे सत्र सुरू आहे,” असा गौप्यस्फोट रोहित पवार यांनी केला. तसेच केंद्र सरकारकडून राज्य सरकारचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोपदेखील त्यांनी केला.
पाहा व्हिडीओ :
इतर बातम्या :
मनसेचा मुंबई, पुण्यातील मेळावा अचानक रद्द, कारण काय?; पुढचा मेळावा कधी?
‘थोडी चाड शिल्लक असेल तर नवाब मलिकांचा राजीनामा घ्या’ राधाकृष्ण विखे यांचा घणाघात
सोन्याने कात टाकली, भाव चढणीच्या दिशेने, चांदीच्या दरांनाही वेग, वाचा औरंगाबादचे भावhttps://t.co/0xIgZtDkMb#Aurangabad| #Goldprice| #GoldSilver| #Market|
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 22, 2021
(clash between ncp activists in front of rohit pawar in dhule)