Chandrapur | कोळसा वसाहतीत गटार लाईनची स्वच्छता, 2 कामगारांचा गुदमरून मृत्यू

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील सास्ती येथे गटार लाईन स्वच्छता करताना 2 कामगारांचा वायुमुळे गुदमरून मृत्यू झाला. सास्ती येथील वेस्टर्न कोल फिल्ड्स लिमिटेडच्या कोळसा कामगार वसाहत परिसरातील घटना घडली. आज सकाळी 8 ते 10 फूट खोल गटर स्वच्छतेसाठी कामगार उतरले होते. राजू जर्जुला आणि रामजी खंडारकर अशी मृतकांची नावे आहेत.

Chandrapur | कोळसा वसाहतीत गटार लाईनची स्वच्छता, 2 कामगारांचा गुदमरून मृत्यू
चंद्रपुरातील कामगारांच्या मृत्यूप्रकरणाची चौकशी करताना माजी मंत्री हंसराज अहीर.Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Mar 22, 2022 | 4:15 PM

चंद्रपूर : जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील सास्ती (Sasti in Rajura taluka) येथे गटार लाईन स्वच्छता करताना 2 कामगारांचा वायुमुळे गुदमरून मृत्यू झालाय. सास्ती-धोपटाळा येथील वेस्टर्न कोल फिल्ड्स लिमिटेडच्या (Western Coal Fields Ltd.) कोळसा कामगार वसाहत परिसरात ही घटना घडली. आज सकाळी 8 ते 10 फूट खोल गटर स्वच्छतेसाठी कामगार उतरले होते. यादरम्यान आतील वायूमुळे राजू जर्जुला आणि रामजी खंडारकर या कामगारांचा गुदमरून मृत्यू (Workers suffocated to death) झाला. दरम्यान वेकोलीच्या बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. या घटनेत सुशील कोरडे नामक अन्य बाधित कामगाराला तातडीने नागपुरात हलविण्यात आले आहे. आणखी 2 कामगारांना वायूची किरकोळ बाधा झाली आहे. त्याच्यावर चंद्रपुरात उपचार केले जात आहेत.

जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

वेकोली प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या बाधित कामगारांची माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली. या सर्व घटनेला जबाबदार वेकोली अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी पुढे रेटली. हे मृत्यू नेमके कशामुळं झाले. त्यांना याची कल्पना कशी आली नाही. आजूबाजूला असणाऱ्यांनी काय केले. या दुर्घटनेला कोण जबाबदार आहेत, असे बरेच प्रश्न या घटनेत अनुत्तरित आहेत. याचा तपास करून मृतकांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीची मागणी करण्यात आली आहे.

Chandrapur | चितळ शिकार प्रकरण; फरार आरोपीला अडीच वर्षानंतर ठोकल्या बेड्या

Bhavana Gawli या वैयक्तिक कारणाने पक्षाच्या अभियानातून बाजूला, अरविंद सावंत यांची माहिती

VIDEO: अनिल देशमुखांचा राजीनामा घेतला ही चूक होती, राऊतांची पहिल्यांदाच कबुली

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.