VIDEO: काळजी करू नका, तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची; मुख्यमंत्र्याकडून व्यापाऱ्यांना दिलासा

तुमचं जे नुकसान झालं आहे. त्याची काळजी करू नका. तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे. (CM Uddhav Thackeray)

VIDEO: काळजी करू नका, तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची; मुख्यमंत्र्याकडून व्यापाऱ्यांना दिलासा
Uddhav Thackeray
Follow us
| Updated on: Jul 25, 2021 | 1:47 PM

चिपळूण: तुमचं जे नुकसान झालं आहे. त्याची काळजी करू नका. तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपळूणमधील व्यापाऱ्यांना आज दिलं. (CM Uddhav Thackeray assures to full help flood affected people in chiplun)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज चिपळूणमधील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी व्यापाऱ्यांच्या व्यथा समजून घेतल्या. तसेच अधिकाऱ्यांकडून पूरपरिस्थितीचा आढावा घेतला. याप्रसंगी परिवहन मंत्री अनिल परब, मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, मिलिंद नार्वेकर आणि मुख्य सचिव सीताराम कुंटे उपस्थित होते. महापुराच्या संकटात जीवितहानी होऊ न देणं ही पहिली प्राथमिकता असते. दुर्देवाने काल दरडी कोसळल्या. त्या ठिकाणी मी गेलो होतो. उद्या पुन्हा जाणार आहे. तुमचं जे नुकसान झालं. त्याची काळजी करू नका. तुम्हाला तुमच्या पायावर कसं उभं करायचं याची जबाबदारी सरकार घेईल. तुम्हाला तुमच्या पायावर कसं उभं करायचं हे आम्ही करणार आहोत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

पूर येणारच नाही असं व्यवस्थापन करू

पाणी अचानक कसं भरलं. पूर का आला याचा आढावा घेण्यात आला आहे. पाणी, पूर तुम्हाला काही नवीन नाही हे मला कुणी तरी सांगितलं. यंदा पूर मोठ्याप्रमाणावर आला. कारण पाऊस मोठ्या प्रमाणावर पडला. त्यामुळे या पुराचं जलव्यवस्थापन करावं लागेल. तुमच्याकडे पूर येऊच नये तसं व्यवस्थापन करावं लागेल. पण त्याला थोडा अवधी लागेल, असं त्यांनी सांगितलं.

शेतकऱ्यांप्रमाणे कर्ज द्या

यावेळी एका व्यापाऱ्याने मुख्यमंत्र्यांसमोर सर्व व्यापाऱ्यांची व्यथा मांडली. पूर आला. त्यात आमचं मोठं नुकसान झालं. आमच्यावर कर्ज आहे. आम्हाला शेतकऱ्यांच्या धर्तीवर कर्जमाफी द्या. व्यापाऱ्यांना आयुष्यात एकदाच कर्जमाफी द्या. त्यानंतर आम्हाला दोन टक्क्याने कर्ज द्या. नंतर आम्ही सरकारकडे कधीही भीक मागणार नाही. तुम्हीच आमचे आईवडील आहात, आम्हाला जगवा, असा टाहोच एका व्यापाऱ्याने फोडला. त्यावर तुमच्या समस्यांवर मार्ग काढू असं मुख्यमंत्री म्हणाले.

पण मदत करा

मुख्यमंत्र्यांची व्यापाऱ्यांशी चर्चा सुरू असतानाच एका महिलेने थेट मुख्यमंत्र्यांसमोर टाहो फोडला. ही महिला प्रचंड रडत होती. माझ्या घराच्या छतापर्यंत पाणी गेलं. होतं नव्हतं. सर्व गेलं. तुम्ही काहीही करा पण आम्हाला मदत करा. साहेब, तुम्हीच मदत करू शकता. मदत केल्याशिवाय जाऊ नका हो, असं ही महिला मोठमोठ्याने रडत सांगत होती. मुख्यमंत्र्यांनीही थांबून या महिलेसमोर हात जोडत तिला मदत करण्याचं आश्वासन दिलं. (CM Uddhav Thackeray assures to full help flood affected people in chiplun)

संबंधित बातम्या:

साहेब, होतं नव्हतं सर्व गेलं, आम्हाला मदत केल्याशिवाय जाऊ नका; महिलेने फोडला मुख्यमंत्र्यांसमोरच टाहो

VIDEO: कुठलं सरकार? आता कुठं डिस्चार्ज झालाय घरातून, फिरताहेत; नारायण राणेंची मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका

मृतदेह बाहेर काढणं महत्त्वाचं, राजकारण वा टीका करण्याची वेळ नाही: देवेंद्र फडणवीस

(CM Uddhav Thackeray assures to full help flood affected people in chiplun)

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.