VIDEO: मुख्यमंत्री पाहुण्यांसारखे आले आणि गेले, कोकणी माणासाला काहीच दिलं नाही; राणेंचे प्रहार सुरूच

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावरून केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी जोरदार टीका केली. (cm uddhav thackeray came and went as a guest in sindhudurg, says narayan rane)

VIDEO: मुख्यमंत्री पाहुण्यांसारखे आले आणि गेले, कोकणी माणासाला काहीच दिलं नाही; राणेंचे प्रहार सुरूच
Narayan Rane
Follow us
| Updated on: Oct 09, 2021 | 5:19 PM

सिंधुदुर्ग: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावरून केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी जोरदार टीका केली. मुख्यमंत्री पाहुण्यांसारखे आले आणि गेले. कोकणी माणसाला त्यांनी काहीच दिलं नाही, अशी टीका नारायण राणे यांनी केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते चिपी विमानतळाचं लोकार्पण करण्यात आलं. त्यानंतर मीडियाशी संवाद साधताना नारायण राणेंनी ही टीका केली. चिपी विमानतळाचं श्रेय माझं नाही तर कुणाचं आहे? पाहुणे येतात आणि जातात. पाहुणे राहतात तरी. मात्र, पाहुण्यांपेक्षा मुख्यमंत्र्यांची भूमिका भयानक आहे. मुख्यमंत्री आले आणि गेले. काही संबंध नाही. विकासावर बोलले नाही. कोकणी माणसाला काही दिलं नाही. कोकणाने शिवसेना उभी करायला त्यांना मदत केली. पण शिवसेनेने कोकणी माणसाला काही दिलं नाही, अशी टीका राणेंनी केली.

मुख्यमंत्र्यांना लिंकच लागली नाही

मुख्यमंत्र्यांनी कोणत्या माझ्या मुद्द्याला उत्तर दिलं नाही. त्यांनी माझ्या एका तरी मुद्द्याला उत्तर दिलं का? त्यांचं एक तरी वाक्य पूर्ण होतं का? पूरपरिस्थिती, वादळाची थकबाकी बाकी आहे. त्यातील एक रुपया तरी त्यांनी दिला का? त्यांनी काय दिलं ते तरी सांगा. विनायक राऊतांनी विमानतळाला विरोध केला होता. हे मी त्यांना सांगितलं. त्यावर ते काहीच बोलले नाही. त्यांच्या भाषणाला मी भाषण मानत नाही. त्यात काही मुद्देच नव्हते. त्यांना आज लिंक लागली नाही. त्यांनी थातूरमातूर भाषण केलं आणि आवरतं घेतलं, असंही ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांकडे तिळगुळ कुठे होता?

राऊतांनी मला पेढा दिला. त्यावर मी त्यांना बोललो. नुसतं गोड वाटून गोड होत नाही सगळं. आतमध्ये लागतं, असं सांगतानाच मुख्यमंत्र्यांनी तिळगुळ घ्या म्हटलं. पण त्यांच्याकडे तिळगुळ कुठे होता? त्यांनी कधी कुणाला तिळगुळ दिला का? काही नाही, असा चिमटाही त्यांनी काढला.

राणेंनी सूचवला कोकणी मेन्यू

चिपीहून सुटणाऱ्या विमानात काय द्यावं हे मी सांगितलं आहे. कोकम सरबत, नारळाची वडी, कोकणी घावणे देण्याची सूचना केली आहे, असं ते म्हणाले. सर्वांचा विमान प्रवास सुखमय होता. विमानात शिवसेनेच्या खासदारांशी बोलणं झालं. सर्व बोलले मला. माझं काही कुणाशी वैर नाही, असंही त्यांनी सांगितलं. आदित्य ठाकरेंना मी टॅक्स फ्रि जाहीर केलं. त्यांच्यावर टीका करणार नाही. त्यांना काय सल्ला देणार? मी त्यांना सूचना केली आहे, असंही त्यांनी सांगितलं.

अन् राणे भडकले

शिवसेना प्रमुखांना खोटं बोलणारी माणसं आवडत नव्हती. म्हणून त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली, असं मुख्यमंत्री म्हणाले. त्यांचा रोख तुमच्याकडे होता, त्यावर तुम्हाला काय म्हणायचे आहे? असं विचारताच राणे भडकले. माझी हकालपट्टी केली? ये उगाच काय ते मला चिडवू नको. माझं नाव नाही घेतलं त्यांनी. काय बोलतो?, असं राणे संतापून म्हणाले. त्यानंतर त्यांनी या विषयावर अधिक बोलणं टाळलं.

संबंधित बातम्या:

नारायण राणेंनी चक्क उद्धव ठाकरेंसाठी घातलं गाऱ्हाणं; म्हणाले, उद्धवजींची मनोकामान पूर्ण कर, त्यांची ईडापिडा दूर कर

माझ्यासाठी आदित्य ठाकरे टॅक्स फ्री; राणेंचे आदित्य यांना चिमटे आणि सल्ला

उद्धवजी, तुम्हाला चुकीचं ब्रीफिंग होतंय, तुमच्या लोकप्रतिनिधींची गुप्तपणे माहिती घ्या; राणेंचा स्टेजवरच दावा

(cm uddhav thackeray came and went as a guest in sindhudurg, says narayan rane)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.