संकट आलं की पॅकेजची घोषणा होते, पण पॅकेज जातं कुठे? असली थोतांडं करणार नाही: मुख्यमंत्री
संकट आलं की पॅकेज जाहीर केली जातात. ही आपली प्रथा आणि परंपरा आहे. एवढ्या हजार कोटीचं पॅकेज... कुठे जातं कुणालाच माहीत नाही... मला अशी थोतांड येत नाही. (cm uddhav thackeray reaction on relief package in sangli)
सांगली: संकट आलं की पॅकेज जाहीर केली जातात. ही आपली प्रथा आणि परंपरा आहे. एवढ्या हजार कोटीचं पॅकेज… कुठे जातं कुणालाच माहीत नाही… मला अशी थोतांड येत नाही. मला खोटं बोलता येत नाही जे करायचं ते प्रामाणिकपणे केलं जाईल. ते केल्याशिवाय राहणार नाही, अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भिलवडीकरांना दिली. (cm uddhav thackeray reaction on relief package in sangli)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पूराने प्रचंड नुकसान झालेल्या भिलवडीला भेट दिली. यावेळी छोटेखानी सभा पार पडली. या सभेला ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. या प्रसंगी मुख्यमंत्र्यांना सरपंचांच्या वतीने निवेदनही देण्यात आलं. कोरोनाचं संकट आणि पुराचं संकट या दोन्ही संकटाचा आपण सामना करत आहोत. त्यामुळे अशी गर्दी करू नका. कोरोनाचं संकट आणि कोसळलेलं दु:ख याची मला कल्पना आहे. तुमच्या व्यथा आणि वेदना आमच्यापर्यंत आलेल्या आहेत, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. सरकार तुमच्यासोबत आहे. तुमच्यासाठी जे जे करणं शक्य आहे. ते ते आम्ही करू, असं मुख्यमंत्री म्हणाले.
कटू निर्णय घ्यावे लागणार
अतिवृष्टी होणार हा अंदाज आला होता. तेव्हापासून सरकार कामाला लागलं होतं. जिथं शक्य होईल. तिथे लोकांचं स्थलांतर केलं जाईल. या पट्ट्यातील काही लाख लोकांचं स्थलांतर केलं आहे. जीवितहानी होऊ नये हे प्राधान्य होतं. अनेकांना घरं सोडून जावं लागलं. हा काही आनंदाचा भाग नाही. पण नदी कुठपर्यंत फुगली होती. अनेकांच्या घरात पाणी गेलं. संसार उद्धवस्त झाले. शेतीचं नुकसान झालं. घराचं नुकसान झालं. आर्थिक नुकसान झालं हे दरवर्षी होत आहे. त्यामुळे काही ठिकाणी कटू निर्णय घ्यावा लागेल. तुमचं पुनर्वसन करावं लागेल. त्यासाठी तुमची साथ लागेल. आपण पाण्याच्या पातळी मोजत बसण्यासाठी आपलं आयुष्य नाही. दरवर्षी पूर येतो. घरदार उद्धवस्त होतं. पुन्हा संसार उद्धवस्त आणि पुन्हा खर्च होतं… असं आपल्याच राज्यात निर्वासितासारखं राहणं योग्य नाही. पण म्हणून कायम स्वरुपी तोडगा काढू, असंही त्यांनी सांगितलं.
नुकसानीचा अंदाज घेत आहोत
तळीयेत तर डोळ्यादेखत दरड कोसळून घरातील माणसं गेली. हे संकट आपल्यावर कोसळलं. या संकटाच्या मालिका आहेत. त्यातून मार्ग काढणारच, असं सांगतानाच पूर आणि दरडीमुळे किती नुकसान झालं याचा अंदाज घेत आहोत. किती नागरिकांना मदत करायची आहे. किती घरे उद्धवस्त आहे. शेतीचं किती नुकसान झालं आहे याची माहिती घेत आहोत, असं त्यांनी सांगितलं. (cm uddhav thackeray reaction on relief package in sangli)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 2 August 2021 https://t.co/69iC03S1LQ #News #bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 2, 2021
संबंधित बातम्या:
गरीब मागासवर्गीयांना पगारातील 25 टक्के रक्कम, शिक्षणमहर्षी आलुरे गुरुजी काळाच्या पडद्याआड
निर्बंध शिथिल करण्यावर एकमत नाही; आता मुख्यमंत्रीच निर्णय घेणार: विजय वडेट्टीवार
(cm uddhav thackeray reaction on relief package in sangli)