मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीयांना घेऊन पंतप्रधानांची भेट घ्या, केंद्र सरकार ऐकत नसेल तर फडणवीसांनाही सोबत न्या: मेटे

मराठा समाजाला आरक्षण ( Maratha Reservation) देण्यासाठी 102व्या घटनादुरुस्तीशिवाय पर्याय नाही. राज्य सरकारने विधीमंडळात एक ठराव करावा. त्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांना घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन त्यांना घटनादुरुस्ती करण्याची विनंती करावी.

मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीयांना घेऊन पंतप्रधानांची भेट घ्या, केंद्र सरकार ऐकत नसेल तर फडणवीसांनाही सोबत न्या: मेटे
विनायक मेटे, अध्यक्ष, शिवसंग्राम
Follow us
| Updated on: Jul 02, 2021 | 4:29 PM

कोल्हापूर: मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी 102व्या घटनादुरुस्तीशिवाय पर्याय नाही. राज्य सरकारने विधीमंडळात एक ठराव करावा. त्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांना घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन त्यांना घटनादुरुस्ती करण्याची विनंती करावी, असं सांगतानाच केंद्र सरकार जर ऐकत नसेल तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही सोबत न्यावं, असं आवाहन शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी आज केलं. (cm uddhav thackeray should meet pm modi again for Maratha Reservation, says vinayak mete)

विनायक मेटे यांनी पत्रकार परिषद घेऊन हे आवाहन केलं. ठाकरे सरकारने विधीमंडळात ठराव करावा. सर्व पक्षीय नेत्यांना घेऊन त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घ्यावी. सध्या संसदेचं अधिवेशन आहे. त्यात 102वी घटना दुरुस्ती करण्याची विनंती मोदींना करावी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं केंद्र सरकार ऐकत नसेल तर मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांना विनंती करावी. फडणवीसांना सोबत न्यावं. घटनादुरुस्तीसाठी प्रयत्न करावा. तसं केलं तर राज्याचे अधिकार राज्याला मिळतील. त्यानंतर राज्याला आरक्षण देण्याचा अधिकार मिळेल, असं मेटे म्हणाले.

तर अधिवेशन चालू देणार नाही

ठाकरे सरकारने आता कोणताही वेळ घालवू नये. त्यांनी त्वरित हालचाली कराव्यात. या अधिवेशनात ठराव करावा. त्यासाठी दोन दिवसांचा कालावधी पुरेसा नाही. अधिवेशनाचा कालावधी वाढवून घ्यावा, त्यामुळे मराठा आरक्षणावर चर्चा करता येईल. मात्र, तसं न झाल्यास आम्ही अधिवेशन चालू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

26 जुलै रोजी कोल्हापुरात परिषद

छत्रपती शाहू महाराज यांनी 50 टक्के आरक्षण दिलं होतं. मराठा समाजालाही त्यांनी आरक्षण दिलं होतं. त्याला आता येत्या 26 जुलैला 120 वर्ष होत आहेत. मात्र या सरकारला अजूनही जाग येत नाही. परिणामी येत्या 26 जुलै रोजी कोल्हापुरात एक परिषद घेण्यात येणार आहे. या परिषदेला अनेक मान्यवरांना बोलवण्यात येणार आहे. या परिषदेत पुढची दिशा ठरवण्यात येणार आहे, असं मेटेंनी सांगितलं.

हा तर कोल्हापूरच्या गादीचा अवमान

राज्य सरकारने सुकाणू समितीमध्ये खासदार संभाजी छत्रपती यांचा निमंत्रित सदस्य म्हणून समावेश केला आहे. हा कोल्हापूरच्या गादीचा अवमान आहे. याचा निषेध झाला पाहिजे, राज्याने आपली चूक सुधारावी, अशी मागणी त्यांनी केली. (cm uddhav thackeray should meet pm modi again for Maratha Reservation, says vinayak mete)

संबंधित बातम्या:

OBC समाजाचे नेते आरक्षणासाठी एकत्र येतात मग मराठा समाजाचे नेते का येऊ शकत नाहीत? : विनायक मेटे

ईडी म्हटलं की लोक घाबरतात, तुमचा भुजबळ करु असं सांगतात, छगन भुजबळ यांचं वक्तव्य

OBC Reservation: जिल्हा परिषद निवडणुकांसदर्भातील याचिकेवर 6 जुलै रोजी सुनावणी, सुप्रीम कोर्टाचा निर्णय

(cm uddhav thackeray should meet pm modi again for Maratha Reservation, says vinayak mete)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.