AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बेंचवर बसण्याच्या वादातून कॉलेजच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण, व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल

पेट्रोल पंपा शेजारी फॅक्टरी रोड लगत असलेल्या बागेत दोघा आरोपी कॉलेज युवकाला घेऊन गेले. तिथे गेल्यावर त्यांनी युवकाला बेंचवर बसण्यावरून आमच्या मित्रांशी वाद का घातला? भांडण का केले? असा जाब विचारला. तसेच शिवीगाळ करत बाजूला पडलेल्या लाकडी काठ्या घेऊन त्यांनी कॉलेज तरुणाला मारहाण केली.

बेंचवर बसण्याच्या वादातून कॉलेजच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण, व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल
मंडप डेकोरेशनचे पैसे मागितले म्हणून एकाला बेदम मारहाण
Follow us
| Updated on: Dec 09, 2021 | 3:56 PM

अहमदनगर : कॉलेजमध्ये बेंचवर बसण्याच्या वादातून एका विद्यार्थ्याला बागेत नेऊन बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना अहमदनगरमधील श्रीगोंदा येथे घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियात व्हायरल करण्यात आलाय. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मारहाण करणाऱ्या दोन युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर दोन जण फरार आहेत.

नेमकं काय घडलं?

मारहाण करण्यात आलेला तरुण घुगल वडगाव येथील रहिवासी असून श्रीगोंदा शहरातील एका महाविद्यालयात अकरावी कला शाखेत शिकतो. या युवकाचा 27 नोव्हेंबर 2021 रोजी बाकावर बसण्याच्या किरकोळ कारणावरून वर्गातल्या इतर दोन विद्यार्थ्यांशी वाद झाला होता. सदर वाद आपापसात मिटलाही होता. मात्र 7 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 3.30 वाजता कॉलेज सुटल्यानंतर सिद्धार्थनगर येथील दोन युवक आले आणि सदर युवकाला ‘तुझ्याकडे काम आहे, आपण पेट्रोल पंपावर जाऊ’ असे सांगून त्याच्याकडे असलेल्या मोपेड गाडीवर बसून तिघे जण गेले.

पेट्रोल पंपा शेजारी फॅक्टरी रोड लगत असलेल्या बागेत दोघा आरोपी कॉलेज युवकाला घेऊन गेले. तिथे गेल्यावर त्यांनी युवकाला बेंचवर बसण्यावरून आमच्या मित्रांशी वाद का घातला? भांडण का केले? असा जाब विचारला. तसेच शिवीगाळ करत बाजूला पडलेल्या लाकडी काठ्या घेऊन त्यांनी कॉलेज तरुणाला मारहाण केली. त्यानंतर आमच्या नादी लागला तर तुला श्रीगोंद्यात येणे कठीण करून टाकू, असा दमही दिला. या मारहाणीत युवक जखमी झाला आहे. या सर्व घटनेचे चित्रीकरण तेथे उपस्थित आरोपींच्या मित्रांनी केले आणि हा मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला.

चित्रीकरण करणारे आरोपी व गाडीचा पोलीस शोध घेताहेत

याप्रकरणी कॉलेज युवकाच्या तक्रारीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी सिद्धार्थ नगर, श्रीगोंदा येथील दोन आरोपी युवकांवर भादवि कलम 324, 323, 504, 506, व 34 नुसार गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, निळ्या मोपेड गाडीवर पीडित युवकाला घेऊन गेले, ती गाडी आणि घटनास्थळी मारहाणीचे चित्रीकरण करणारे इतर आरोपी यांचा पोलीस शोध घेत आहेत.

याआधीही घडली होती अशी घटना

अहमदनगरमध्ये याआधीही अशाच प्रकारे घटना घडली होती. जामखेड तालुक्यातील खर्डा येथील कॉलेज युवक नितीन राजू आगे मारहाण राज्यात चांगलेच गाजले होते. नितीन आगेलाही अशाच प्रकारे बेदम मारहाण झाली होती. त्यात त्याचा मृत्यूही झाला होता. श्रीगोंदा शहरात टवाळखोरांचा हैदोस दिवसेंदिवस वाढत चालला आहे. (College student beaten up for arguing while sitting on a bench in Ahmednagar)

इतर बातम्या

काय घडतंय हे? भाऊच जीवावर उठला, मोबाइलसाठी विहिरीत ढकललं, कवटी फुटेपर्यंत दगडानं ठेचलं, औरंगाबादमध्ये अल्पवयीनाचं कृत्य उघड

Mumbai Murder | वादानंतर पोटच्या पोराचं डोकं हातोड्याने फोडलं, मुंबईत 52 वर्षीय आईला अटक