“खोटं कसं बोलावं हे शाखेत शिकवलं जातं”; काँग्रेस नेत्याची आरएसएससह भाजपवर सडकून टीका

हिंसा कशी करायाची, द्वेष कसा करायचा याचे प्रशिक्षणही शाखेत दिले जाते असा गंभीर आरोपही त्यांनी आरएसएसवर केला आहे. यावेळी ते म्हणाल की, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि पेशव्यांच्या इतिहासावरूनही त्यांनी जोरदार टीका केली आहे.

खोटं कसं बोलावं हे  शाखेत शिकवलं जातं; काँग्रेस नेत्याची आरएसएससह भाजपवर सडकून टीका
Follow us
| Updated on: Jul 10, 2023 | 1:51 AM

चिपळूण : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरण वेगवेगळ्या गोष्टीमुळे ढवळून निघाले आहे. कोल्हापूर शहरात औरंगजेबच्या स्टेटसवरून झालेल्या घटनेमुळे सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. त्यावरूनच जातीय आणि धार्मित ताणतणावही निर्माण झाला होता. सध्या राज्यात वेग त्यावरूनच आज काँग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाई यांनी भाजप आणि स्वयंसेवक संघावर जोरदार हल्लाबोल केला आहे. हुसेन दलवाई यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर गंभीर आरोपही केले आहेत. त्यामुळे आगामी काळात भाजप आणि काँग्रेस असा सामना रंगणार असल्याचे चिन्ह दिसत आहे.

कोल्हापूर नंतर सोलापूरातही सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजवरून अघटित घटना घडल्या होत्या. त्या घटना घडल्यानंतर काँग्रेसकडून भाजपवर सडकून टीका करण्यात आली आहे. तर आता पुन्हा एकदा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका केली आहे.

आरएसएसच्या कार्यशाळेवर हुसेन दलवाई यांनी टीका करताना त्यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. यावेळी त्यांनी भाजपवरही गंभीर आरोप करत त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली आहे.

चिपळूणमधील काँग्रेस कार्यालय उद्घाटनप्रसंगी हुसेन दलवाई यांनी निशाणा साधला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेवरती चार गोष्टी शिकवल्या जातात. त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे खोटं कसं बोलावं हे शाखेतच शिकवलं जाते.

तर हिंसा कशी करायाची, द्वेष कसा करायचा याचे प्रशिक्षणही शाखेत दिले जाते असा गंभीर आरोपही त्यांनी आरएसएसवर केला आहे. यावेळी ते म्हणाल की, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि पेशव्यांच्या इतिहासावरूनही त्यांनी जोरदार टीका केली आहे.

यावेळी हुसेन दलवाई यांनी औरंगजेबच्या फोटोवरून चाललेल्या राजकारणावरून त्यांनी जोरदार निशाणा साधला आहे. औरंगजेबच्या फोटोवरून वाद होतीस असं काही करण्याची आणि त्याच्या फोटो लावण्याच काहीच गरज नाही अशा शब्दात वाद निर्माण करणाऱ्यांना त्यांनी जोरदार टोला लगावला आहे.

यावेळी त्यांनी औरंगजेबाच्या सरदारवरूनही त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सडकून टीका केली आहे. औरंगजेबाचे सर्व सरदार हे ब्राह्मण होते मात्र इथल्या मुसलमानांना कोणी काय दिलं असेल तर ते शिवाजी महाराजांनी दिलं आहे या शब्दात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी गौरवोद्गगार काढले आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.