संभाजी भिडे यांच्या ‘त्या’ विधानाचे तीव्र पडसाद, कुठे जोडे मारो, तर कुठे रास्ता रोको; महाराष्ट्रभर आंदोलनाचं लोण

भिडे यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यासाठी अकोल्यातील गांधी जवाहर बाग आणि लातुरातील महात्मा गांधी पुतळ्या जवळ जोरदार आंदोलन करण्यात आलं.

संभाजी भिडे यांच्या 'त्या' विधानाचे तीव्र पडसाद, कुठे जोडे मारो, तर कुठे रास्ता रोको; महाराष्ट्रभर आंदोलनाचं लोण
Follow us
| Updated on: Jul 29, 2023 | 1:17 PM

अमरावती | 29 जुलै 2023 : शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त विधान केल्याने त्याचे राज्यभर पडसाद उमटले आहेत. भिडे यांच्या या विधानावर सर्वसामान्य जनतेतून संतापाची तीव्र भावना व्यक्त होत आहे. तर काँग्रेसने भिडे यांच्या विरोधात राज्यभर जोरदार आंदोलन केलं आहे. कुठे भिडे यांच्या फोटोला चपला मारल्या जात आहेत. तर कुठे रास्ता रोको करून रोष व्यक्त केला जात आहे. संपूर्ण महाराष्ट्रातच हे चित्र दिसत आहे. भिडे यांना तात्काळ अटक करण्याची मागणीही यावेळी करण्यात येत आहे.

संभाजी भिडे यांच्या वक्तव्याच्या विरोधात अमरावतीत काँग्रेस आक्रमक झाली आहे. काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. अमरावतीच्या राजकमल चौकात काँग्रेसने जोरदार आंदोलन केलं. गांधीजींचा फोटो घेऊन काँग्रेसने आंदोलन सुरू केलं. यावेळी संभाजी भिडें विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच भिडे यांना अटक करण्याची मागणीही लावून धरण्यात आली.

तर रस्त्यावर उतरू

धुळ्यातही भिडेंविरोधात आंदोलन करण्यात आलं. यावेळी आमदार कुणाल पाटील यांनी शहरातील महात्मा गांधी चौकात महात्मा गांधी यांच्या पूर्ण कृती पुतळ्याचा दुधाने अभिषेक केला. कुणाल पाटील यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी संभाजी भिडे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला. संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींविषयी वक्तव्य करून गांधीजींचा अवमान केला आहे. संभाजी भिडे अशी वक्तव्य करून जातीवादी रंग देण्याचा प्रयत्न करत असताना सत्तेतील मनुवादी वृत्तीचं सरकार संभाजी भिडे यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप यावेळी पाटील यांनी केला.

हे सुद्धा वाचा

संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य करून संपूर्ण देशवासीयांच्या भावना दुखावल्या आहेत. सरकारने तात्काळ त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. सरकारने भिडे यांच्यावर कारवाई न केल्यास काँग्रेस रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

अकोला, लातुरातही आंदोलन

भिडे यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यासाठी अकोल्यातील गांधी जवाहर बाग आणि लातुरातील महात्मा गांधी पुतळ्या जवळ जोरदार आंदोलन करण्यात आलं. यावेळी भिडे यांच्या फोटोला जोडे मारण्यात आले. यवतमाळ- आंबेडकरवादी महिला कार्यकर्त्यांनी संभाजी भिडे विरोधात निषेध आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी प्रमोदींनी रामटेके, संगीता पवार यांना ताब्यात घेतलं. प्रहारच्या कार्यकर्त्यांनीही भिडे यांना काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवला.

तुमचा इतिहास काढला तर

दरम्यान, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी भिडे यांच्या विधानाचा निषेध नोंदवला आहे. भिडे गुरुजी यांच्या वक्तव्याचा मी निषेध करतो. भिडे गुरुजींवर कारवाई केली जाईल. असे वक्तव्य खपवून घेणार नाही. ते नेहमी वादग्रस्त वक्तव्य करतात. मी कारवाई करण्याची मागणी करणार आहे.

भिडे गुरुजी यांचा इतिहास काढला तर त्यांना कसं वाटेल? त्यांना दाखला दिला का इतिहास काढायचा? हे महात्मा झाले का?, असा संतप्त सवाल संजय शिरसाट यांनी केला. ही भूमिका पक्षाची आहे, माझी आहे. याप्रकारे वक्तव्य कोणी करु नये, समाजामध्ये तेढ कशाला? तुम्ही बाकी समाजाचा का इतिहास काढत नाही, तिथे फाटते का तुमची, असा सवालच शिरसाट यांनी केला.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.